Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > Sleeping with mouth Open : तोंड उघडे ठेवून झोपण्याची सवय? असू शकतो 'हा' गंभीर आजार, वेळीच लक्ष द्या

Sleeping with mouth Open : तोंड उघडे ठेवून झोपण्याची सवय? असू शकतो 'हा' गंभीर आजार, वेळीच लक्ष द्या

Sleeping with mouth open: Mouth breathing problem: Sleep health tips: तोंड उघडे ठेवून झोपल्याने हृदयावर परिणाम होतो का? वाचा डॉक्टरांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2025 10:57 IST2025-08-15T10:57:02+5:302025-08-15T10:57:41+5:30

Sleeping with mouth open: Mouth breathing problem: Sleep health tips: तोंड उघडे ठेवून झोपल्याने हृदयावर परिणाम होतो का? वाचा डॉक्टरांचे मत

Health risks of sleeping with mouth open at night Causes and treatment of mouth breathing while sleeping | Sleeping with mouth Open : तोंड उघडे ठेवून झोपण्याची सवय? असू शकतो 'हा' गंभीर आजार, वेळीच लक्ष द्या

Sleeping with mouth Open : तोंड उघडे ठेवून झोपण्याची सवय? असू शकतो 'हा' गंभीर आजार, वेळीच लक्ष द्या

आरोग्य चांगलं आणि निरोगी राहावं यासाठी आपण पुरेसा आहार, व्यायाम करतो.(Health issue) पण धावत्या जीवनशैलीत आपल्याला पुरेशा प्रमाणात झोप घेणं देखील महत्त्वाचं आहे. दिवसभराचा थकवा आणि मेंदूला नव्याने ऊर्जा मिळण्यासाठी रात्रीची किमान ७ ते ८ तासांची झोप महत्त्वाची असते.(Sleeping with mouth open) आपली झोपण्याची स्थिती देखील महत्त्वाची आहे. चुकीच्या पद्धतीने झोपल्यास पाठीचे, मानेचे किंवा कंबरेचा त्रास जाणवू लागतो.(Mouth breathing problem)
आपल्यापैकी अनेकांना तोंड उघडे ठेवून झोपण्याची आणि घोरण्याची सवय असते.(Sleep health tips) ज्याचा आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. तोंडाने श्वास घेतल्यास अनेक समस्या उद्भवतात. सतत तोंडात कोरडेपणा जाणवतो, ज्यामुळे दात आणि आरोग्याच्या इतर समस्या होतात.(Sleep disorder symptoms) हिरड्यांचे आजर होऊन दातांवर घाण साचू लागते. 

केस फार गळतात? टक्कल पडण्यापूर्वी खा 'हा' काळा लाडू, महिन्याभरात केसांची भराभर वाढ- होतील दाट

डॉक्टर म्हणतात तोंड उघडे ठेवून झोपल्याने आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. झोपेच्या वेळी तोंड उघडे ठेवल्याने शरीराच्या आतील भागात असणाऱ्या गंभीर समस्यांकडे दुर्लक्ष केले जाते. जर एखाद्याला सर्दी, खोकला, कफ किंवा इतर कोणतीही समस्या नसेल आणि तरीही तोंड उघडे ठेवून झोपत असाल तर हे गंभीर समस्यांचे लक्षण आहे. 

झोपताना तोंड उघडे ठेवण्यामागे सेप्टम कार्टिलेज असू शकते. याला नाकाचा सेप्टम कार्टिलेज असेही म्हणतात. नाकाचा सेप्टम कार्टिलेज ही नाकाच्या आत एक पातळ लवचिक रचना आहे, जी नाकाच्या मार्गाला दोन भागांमध्ये विभाजित करते. हे आपल्या नाकाच्या छिद्रांना आधार देते. यामुळे नाकाचा एक भाग बंद होतो,ज्यामुळे आपण तोंडाने श्वास घेऊ लागतो. 

तोंड उघडे ठेवून झोपल्याने हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका जास्त प्रमाणात असतो. झोपेदरम्यान नाकाऐवजी तोंडाने श्वास घेतला जातो, ज्यामुळे शरीराला पुरेसे ऑक्सिजन मिळत नाही. ज्यामुळे रक्तवाहिन्यांमधील रक्तप्रवाहावर परिणाम होऊन थेट हृदयाचे आरोग्य बिघडते. तोंड उघडे ठेवून झोपल्याने दम्याचा धोका वाढतो. कारण यामुळे फुफ्फुसांना अधिक जोमाने काम करावे लागते. ज्याचा जोर आपल्या हृदयावर येतो. तोंड उघडे ठेवून झोपल्याने तोंडात बाहेरचे बॅक्टेरिया सहज प्रवेश करतात. जर आपल्यालाही तोंड उघडे ठेवून झोपण्याची सवय असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. 


 

Web Title: Health risks of sleeping with mouth open at night Causes and treatment of mouth breathing while sleeping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.