अनेक असे आजार आहेत ज्यांच्याबद्दल ऐकल्यावरही छातीत धडकी भरते. (Hand held test: an easy way to understand the risk of breast cancer early)फक्त आजारी व्यक्ती नाही घरातील प्रत्येक जण क्षणा-क्षणाला त्या आजाराचा सामना करत असतो. असाच एक आजार म्हणजे कर्करोग. शरीरातील पेशींची अनियंत्रित वाढ होते. सामान्यपेशींपेक्षा जरा वेगळ्या अशा पेशी शरीरात निर्माण होतात. त्यामध्ये स्टेजेस असतात एका ठराविक स्टेजला पोहचलेला पिडीत बरा होणे म्हणजे चमत्कारच मानला जातो. मात्र पहिल्या स्टेजला कळले तर कॅन्सर बरा करता येतो तो पसरणार नाही याची काळजी घेता येते. कॅन्सरचे वाढते प्रमाण फार भयंकर आहे.
कॅन्सरमध्ये बरेच प्रकार आहेत. कॅन्सर हळूहळू शरीरात पसरतो. महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण वाढत चालले आहे. (Hand held test: an easy way to understand the risk of breast cancer early)महिलांचे फारच हाल होतात. बरा होऊ शकणारा कॅन्सरही पसरतो त्याचे मुख्य कारण म्हणजे ओळखायला झालेला उशीर. एखाद्या महिलेला ब्रेस्ट कॅन्सर झाला आहे हे कळेपर्यंत ४थी स्टेज आलेली असते. कॅन्सरची लक्षणे सामान्यच असल्याने त्याकडे दुर्लक्ष केले जाते. प्रत्येक महिलेने सतत आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे. ब्रेस्ट कॅन्सरवर मात करणाऱ्या अनेक जणी आहेत. वेळीच उपाय केल्यावर पुढील धोका टाळता येतो.
डॉ. कांचन कौर या ब्रेस्ट कॅन्सर सर्जन आहेत त्यांनी महिलांना घरीच कॅन्सर आहे का नाही हे ओळखण्यासाठी काही पर्याय सांगितले आहेत. हातांचा वापर करुन कॅन्सरची तपासणी करता येते असे त्या म्हणाल्या.
१. एकदा हात वर करुन ताणून घ्या. आणि मग पोटावर हात ठेवायचा. पोटावर बोटांनी दाब द्यायचा. असे केल्यावर जर छातीचा आकार बदलला किंवा त्वचा आत गेली तर लगेच डॉक्टरांकडे जाऊन या.
२. हाताच्या बोटांनी छातीवर चोळून पाहा. जास्त दाब न देता चोळायचे. चारही बाजूंनी चोळून पाहा. हाताला काही गाठीसारखे लागले तर पुढील तपासणी करुन घ्या.
३. छाती जरा दाबून बघा. छातीतून पाणी आले किंवा रक्त आले तर गाठ असण्याची शक्यता असते. दुखले नाही तरी ही लक्षणे दुर्लक्षित करु नका.