सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत आरोग्याची काळजी घेणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. यात आपल्याला हृदयाची पुरेशा प्रमाणात काळजी घ्यायला हवी.(best tea for heart health) आपले हृदय जेव्हा निरोगी असते, तेव्हा ते योग्य पद्धतीने काम करते.(herbal tea for heart) पण तणाव, चुकीचा आहार आणि व्यायामाची कमतरता हृदयाच्या आरोग्यावर परिणाम करतात.(green tea for heart disease)
आपल्यापैकी अनेकांच्या दिवसाची सुरुवात ही चहा, कॉफी, गरम पाणी किंवा ग्रीन टी, हर्बल टी सारख्या पेयांनी होते.(antioxidants in green tea) पण या रोजच्या सवयी आपल्या शरीरासाठी किती चांगल्या आहेत याचा अंदाज कुणालाच बांधता येत नाही.(herbal tea benefits for heart) दररोज ग्रीन टी किंवा हर्बल टी पिणं किती चांगले आहे. आरोग्याची काळजी घेण्यासाठी अनेकजण ग्रीन टी ला प्राधान्य देतात तर काही जण हर्बल टी ला.(healthy drinks for heart) पण हृदयासाठी सगळ्यात जास्त कोणता चहा फायदेशीर आहे जाणून घेऊया.
गरबा खेळताना घामाच्या धारा-मेकअप जातो वाहून? ५ टिप्स- रात्रभर मेकअप राहील जसाच्या तसा-नो टेंशन
ग्रीन टी चे फायदे
ग्रीन टीमध्ये कॅटेचिन आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. जे चयापचय वाढवून वजन कमी करण्यास मदत करतात. यामुळे आपल्या शरीरातील कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहून हृदयविकाराचा धोका टाळता येतो. तसेच नियमितपणे ग्रीन टी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यास मदत होते. ग्रीन टीमध्ये थोड्या प्रमाणात कॅफिन असते, जे मनाला तीक्ष्ण करण्यास आणि मेंदूचे आरोग्य सुधारण्यास मदत करते.
हर्बल टी चे फायदे
हर्बल टी ही कॅमोमाइल आणि लैव्हेंडर सारख्या औषधी वनस्पती ताण कमी करतात आणि आपल्या झोपेची गुणवत्ता सुधारतात. आले, पुदिना आणि तुळस यासारख्या औषधी वनस्पती बद्धकोष्ठता आणि अपचन कमी करतात. हर्बल टीमध्ये नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी- बॅक्टेरियल गुणधर्म असतात. ज्यांना शरीरातील कॅफिनचे प्रमाण कमी करायचे आहे त्यांनी हर्बल टी प्यायला हवी.
शरीरासाठी चांगला चहा कोणता?
आपल्याला दिवस फ्रेश किंवा अधिक ऊर्जावान हवा असेल तर सुरुवात ग्रीन टी ने करा. रात्रीच्या वेळी झोप शांत लागावी आणि ताण कमी व्हावा असं वाटतं असेल तर हर्बल टी प्या. जर आपल्याला दोन्ही चहा प्यावेसे वाटत असतील तर दिवसा ग्रीन टी आणि रात्री हर्बल टी प्या. हृदयाची काळजी घेणं म्हणजे फक्त व्यायाम किंवा औषधोपचार करणं नव्हे, तर आपल्या रोजच्या सवयी, आहार आणि योग्य पेयांवरही अवलंबून असतं.