Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > पनीरसोबत चुकूनही खाऊ नका ३ गोष्टी, पोट इतकं दुखतं की गाठावा लागतो थेट दवाखानाच

पनीरसोबत चुकूनही खाऊ नका ३ गोष्टी, पोट इतकं दुखतं की गाठावा लागतो थेट दवाखानाच

Paneer side effects: Foods to avoid with paneer: Paneer digestion problems: आयुर्वेद आणि आधुनिक न्यूट्रिशनिस्टच्या मते, पनीर हे एक जड अन्नपदार्थ आहे. जर ते चुकीच्या पदार्थांसोबत खाल्ले, तर पचनसंस्थेवर प्रचंड ताण पडतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2026 15:59 IST2026-01-30T15:58:56+5:302026-01-30T15:59:48+5:30

Paneer side effects: Foods to avoid with paneer: Paneer digestion problems: आयुर्वेद आणि आधुनिक न्यूट्रिशनिस्टच्या मते, पनीर हे एक जड अन्नपदार्थ आहे. जर ते चुकीच्या पदार्थांसोबत खाल्ले, तर पचनसंस्थेवर प्रचंड ताण पडतो.

Foods you should never eat with paneer Wrong food combinations with paneer Why paneer causes stomach pain Paneer digestion problems in adults Paneer food combinations to avoid at night Is paneer bad for digestion | पनीरसोबत चुकूनही खाऊ नका ३ गोष्टी, पोट इतकं दुखतं की गाठावा लागतो थेट दवाखानाच

पनीरसोबत चुकूनही खाऊ नका ३ गोष्टी, पोट इतकं दुखतं की गाठावा लागतो थेट दवाखानाच

पनीर हा अनेकांचा आवडता पदार्थ. शाही पनीर, पनीर बटर मसाला, पनीर टिक्का किंवा सलादमधील कच्चं पनीर.(Paneer side effects) चवीला जितकं छान, तितकंच प्रथिनांनी समृद्ध. पण केवळ चव पाहून पनीर चुकीच्या पदार्थांसोबत खाल्लं तर आपलं पोट बिघडू शकतं. पनीर पकोडा असो, पनीर राईस असो किंवा मटार पनीर, या पदार्थांचे नाव काढताच तोंडाला पाणी सुटते. मात्र, चवीच्या नादात आपण अनेकदा एका गोष्टीकडे दुर्लक्ष करतो, ती म्हणजे 'विरुद्ध आहार'. (Foods to avoid with paneer)
आयुर्वेद आणि आधुनिक न्यूट्रिशनिस्टच्या मते, पनीर हे एक जड अन्नपदार्थ आहे. जर ते चुकीच्या पदार्थांसोबत खाल्ले, तर पचनसंस्थेवर प्रचंड ताण पडतो. यामुळे पोटदुखी, अपचन होते. पनीरसोबत कोणते पदार्थ खाणं टाळायला हवं पाहूया. 

६ महिन्यांत पांढरे केस होतील कायमचे काळे! ‘या’ हिरव्या पानांचा हेअर मास्क लावा, डाय कलरची गरजच संपेल

पनीर हे दुधापासून बनलेला पदार्थ असल्यामुळे जड असतो. अनेकदा सॅलडमध्ये किंवा फ्यूजन फूडच्या नावाखाली पनीरसोबत संत्री, लिंबू किंवा अननस यांसारखी आंबट फळे यात वापरली जातात. पण हे कॉम्बिनेशन पोटासाठी अत्यंत घातक आहे. पनीर हा डेअर प्रोडक्ट असल्यामुळे आंबट फळांमधील सायट्रिक अॅसिड पोटात गेल्यावर पनीरमधील प्रथिनांशी ते सक्रिय होतात. ज्यामुळे पोटात गॅस होणे, छातीत जळजळ आणि पोट फुगण्याची समस्या होते. 

अनेकांना पनीर आणि मासे एकत्र खाण्याची सवय असते. हे दोन्ही पदार्थात हाय प्रोटीन आहेत. पचायला खूप वेळ घेतात, ज्यामुळे पचनसंस्था मंदावते. अपचनामुळे त्वचेवर पुरळ येणे ॲलर्जी होण्याचा धोकाही वाढतो. पोटाच्या विकारांपासून वाचायचे असेल, तर हे दोन प्रोटीन्स कधीही एकत्र करू नका.

पनीर स्वतः दुधापासून बनलेले असले तरी, पनीर आणि दूध एकाच वेळी सेवन करणे टाळावे.यामुळे मळमळणे, उलट्या होणे आणि दीर्घकाळ पोट जड राहणे यांसारखे त्रास होतात. पनीर पकोडा खाल्ल्यानंतर लगेच चहा किंवा दूध पिणे ही सवय तुमची पचनसंस्था पूर्णपणे बिघडवू शकते.

आपण पनीर पकोडा किंवा पनीरचे पदार्थ खाल्ल्यानंतर कोमट पाणी प्या. यामुळे पचन क्रियेला मदत होते. तसेच, पनीर बनवताना त्यात जिरे, मिरी किंवा ओवा यांसारख्या पाचक मसाल्यांचा वापर करा.
 

Web Title : पनीर के साथ इन चीजों से करें परहेज, पेट की समस्याएँ रोकें।

Web Summary : पनीर, प्रोटीन से भरपूर होने के बावजूद, कुछ खाद्य पदार्थों जैसे खट्टे फल, मछली या दूध के साथ मिलाने पर पाचन संबंधी समस्याएँ पैदा कर सकता है। ये संयोजन एसिडिटी, अपच और एलर्जी का कारण बन सकते हैं। पनीर खाने के बाद गर्म पानी पिएं और पाचक मसालों का प्रयोग करें।

Web Title : Avoid these foods with paneer to prevent stomach problems.

Web Summary : Paneer, though protein-rich, can cause digestive issues when combined with certain foods like citrus fruits, fish, or milk. These combinations can lead to acidity, indigestion, and allergies. Drink warm water after eating paneer and use digestive spices.