ऑफिस किंवा रात्रीच्या वेळी अचानक आपली भूक चाळवू लागते असा अनुभव आपल्याला अनेकदा आला असेल. दिवसभर पोटभर खाऊन देखील आपल्याला पुन्हा काहीतरी खावेसे वाटते.(Late night hunger) बिस्किटं, चिप्स, वडापाव किंवा काहीतरी गोड खाण्याची इच्छा होते. सुरुवातीला ही भूक साधी वाटत असली तरी हीच सवय वजन वाढण्याचं, पोटाच्या तक्रारींचं आणि ब्लड शुगर वाढण्याचं कारण बनू शकते.(Office time cravings) ऑफिसमध्ये बसून काम करणारे लोक, नाईट शिफ्ट करणारे कर्मचारी किंवा उशिरापर्यंत जागरण करणाऱ्यांना ही समस्या जास्त जाणवते. (Healthy snacks for weight loss)
रात्रीचे व्यवस्थित जेवूनही अनेकदा आपल्याला भूक लागते. अनेकदा ही भूक मनातून, थकव्यातून किंवा तणावातून निर्माण झालेली असते.(Craving control foods) जास्त वेळ स्क्रीनसमोर बसणं, अपुरी झोप, वेळेवर न खाणं किंवा सतत चहा-कॉफी घेणं यामुळे शरीराचा सिग्रल गोंधळात पडतो. त्यामुळे अचनाक क्रेव्हिंग वाढते. काही खाल्ल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही. अशावेळी चुकीचे स्नॅक्स खाल्ले तर कॅलरीज देखील वाढतात. पचनक्रिया बिघडते आणि वजन वेगाने वाढायला सुरुवात होते. अशावेळी आपण कोणते पदार्थ खायला हवे जाणून घेऊया.
"रोहित भाऊ वडापाव खाणार का?” चालू सामन्यात चाहत्याचा प्रश्न, ‘हिटमॅन’ ची मजेशीर रिॲक्शन...
1. ग्रीक योगर्ट हा हाय प्रोटीनवाला नाश्ता आहे. हे आपण सकाळी खाल्ल्याने दीर्घकाळ पोट भरलेले राहते. तसेच अचानक क्रेव्हिंग होण्याची क्षमता देखील कमी करते. त्यात प्रोबायोटिक्स असल्यामुळे पचनही सुधारते.
2. ५ ते ६ बदाम खा. यामुळे आपल्या शरीराला मॅग्नेशियम मिळते. रक्तातील साखरेचे प्रमाण स्थिर करण्यास आणि क्रेव्हिंग कमी करण्यास मदत करते.
3. चिया सीड्समध्ये फायबर आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड भरपूर प्रमाणात असते. दूध किंवा प्लांट बेस मिल्कमध्ये चिया सीड्स भिजवा. सकाळी रिकाम्या पोटी खा. ज्यामुळे पचनास मदत होईल आणि पोट दीर्घकाळ भरलेले राहिल.
4. कोमट हळदीचे दूध हे झोपेची गुणवत्ता सुधारत नाही तर जळजळ कमी करण्यास आणि लवकर बरे होण्यास मदत करते. तणावामुळे आपल्याला अनेकदा खूप भूक लागते. अशावेळी हे फायदेशीर आहे.
5. जर आपल्याला अचानक गोड खाण्याची क्रेव्हिंग होत असेल तर सफरचंद आणि पीनट बटर खा. यातील प्रथिने गोडाची इच्छा नियंत्रित करण्याचे काम करते. तसेच ऊर्जेची पातळी स्थिर ठेवते.
6. बेरीजमध्ये साखरेचे प्रमाण कमी असते तर अँटीऑक्सिडंट्स जास्त असतात जे आपल्या शरीरातील कॅलरीज न वाढवता. क्रेव्हिंग कमी करण्याचे काम करतात.
