Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > मोदक खा पोटभर, लक्षात ठेवा ३ टिप्स जेवण अंगावर येणार नाही-पदार्थांचा घ्या भरपूर आस्वाद

मोदक खा पोटभर, लक्षात ठेवा ३ टिप्स जेवण अंगावर येणार नाही-पदार्थांचा घ्या भरपूर आस्वाद

Eat sweets do not hesitate, see what to do before eating sweets, health tips : गोडाचे पदार्थ खाण्याआधी लक्षात ठेवा या टिप्स. अजिबात त्रास नाही होणार.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2025 15:19 IST2025-08-26T15:16:09+5:302025-08-26T15:19:28+5:30

Eat sweets do not hesitate, see what to do before eating sweets, health tips : गोडाचे पदार्थ खाण्याआधी लक्षात ठेवा या टिप्स. अजिबात त्रास नाही होणार.

Eat sweets do not hesitate, see what to do before eating sweets , health tips | मोदक खा पोटभर, लक्षात ठेवा ३ टिप्स जेवण अंगावर येणार नाही-पदार्थांचा घ्या भरपूर आस्वाद

मोदक खा पोटभर, लक्षात ठेवा ३ टिप्स जेवण अंगावर येणार नाही-पदार्थांचा घ्या भरपूर आस्वाद

गणपतीचा सण म्हणजे फक्त उत्साहच नाही तर जि‍भेचेही भरपूर चोचले पुरवले जातात. कोणताही सण आला की घरोघरी गोडधोड पदार्थांची चंगळ असते. गणपतीत तर मोदक, लाडू, खीर, पुरणपोळी असे स्वादिष्ट गोड पदार्थ पाहून कोणालाही ते खावेसे वाटतीलच. (Eat sweets do not hesitate, see what to do before eating sweets , health tips   )वजनाचा, पचनाचा कशाचाच विचार न करता मनसोक्त गोड पदार्थ खायची तुम्हालाही इच्छा होते का? गोडाचे पदार्थ खाताना जरा भान मात्र ठेवायलाच हवे. एकदम पोटभर गोड खाल्लं तर पचनावर ताण येतो आणि गोडाचं जेवण उलट त्रासदायक ठरू शकतं. त्यामुळे गोड खाण्याआधी काही सोप्या टिप्स लक्षात ठेवणं गरजेचं आहे. या गोष्टी ध्यानात ठेवा आणि मग गोड पदार्थ खा. म्हणजे ते बाधण्याची शक्यता कमी असते. 

१. गोड पदार्थ खाण्याआधी एक ग्लास कोमट पाणी प्यावं, त्यामुळे पोट थोडं हलकं होतं. जेवणाआधी पाणी प्यायल्याने जेवण अति होत नाही. आणि पचनाचा त्रास होत नाही. काही जण जेवताना पाणी पित नाहीत. त्यामुळे जेवणाआधी पाणी प्या.  

२. जेवणाआधी थोडा आलं-लिंबाचा रस पिणे फायद्याचे ठरते. त्यामुळे गॅसेस होण्याची शक्यता कमी होते. तसेच पुदिन्याची पाने खाणे फायद्याचे ठरते. पुदिना पचनासाठी एकदम उत्तम असतो. पाचक असल्यामुळे पुदिना जेवणानंतरही खा. गोड सहज पचतं. 

३.  गोडाच्या पदार्थांवर तूप घालण्याची पद्धत आहे. त्यामागे कारणेही तशीच आहेत. तुपाची धार गोड पदार्थांवर सोडल्यावर त्याची चव छान होतेच आणि पचनासाठी मदत होते. तुपामुळे जड पदार्थ पचवताना सोपे जातात. त्यामुळे मसालेदार आणि गोड दोन्ही पदार्थ करताना त्यात तूप वापरले जाते. 


  
गणपतीत पोटभर मोदक खायचे असतील तर आधीच काळजी घ्या. म्हणजे नंतर त्रास होणार नाही. कोणत्याही सणाला मनसोक्त जेवताना आणि आवडीच्या पदार्थांवर ताव मारताना काही टिप्स लक्षात ठेवणे कधीही फायद्याचेच. 

Web Title: Eat sweets do not hesitate, see what to do before eating sweets , health tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.