Join us   

जेवलं की आंबट ढेकर येतात? गॅसेसचा त्रास? आयुर्वेदाचार्य सांगतात-जेवल्यानंतर करा फक्त एक काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2024 12:37 PM

Eat Elaichi Or Cardamom After Meals To Prevent Acidity : पोटाचे विकार छळू नये म्हणून, जेवल्यानंतर एक गोष्ट चावून खा; पोट राहील एकदम ओक्के..

बिघडलेली जीवनशैलीमुळे आरोग्याचं गणित बिघडत चाललं आहे. योग्य वेळी अन्न न खाल्ल्यामुळे किंवा उलट-सुलट पदार्थांचे सेवन केल्यामुळे पोटाचे विकार वाढतात. बद्धकोष्ठता, गॅस, अपचन, अॅसिडिटी यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो (Acidity Problem). पोटातील गॅसेसची समस्या कमी करण्यासाठी आपण विविध उपाय करून पाहतो, किंवा औषधोपचार घेतो. पण प्रत्येक उपाय उपयुक्त ठरतीलच असे नाही (Health Care).

जर आपल्याला वारंवार पोटाच्या विकारांचा त्रास होत असेल तर, आयुर्योग रिसर्च फाउंडेशनचे आयुर्वेदाचार्य वैद्य रितेश मिश्रा यांनी सांगितलेली एक छोटीशी गोष्ट करून पाहा. यामुळे नक्कीच फरक पडेल. शिवाय पोटाचे विकार छळणार नाही(Eat Elaichi Or Cardamom After Meals To Prevent Acidity).

जेवल्यानंतर पोटाचे विकार का छळतात?

आयुर्वेदाचार्य रितेश मिश्रा म्हणतात, लोकांमध्ये इरिटेबल बोवेल सिंड्रोमची समस्या वेगाने वाढत आहे. इरिटेबल बोवेल सिंड्रोम ही एक सामान्य समस्या आहे. यामुळे पोटात गॅस, ॲसिडीटी, आंबट ढेकर, बद्धकोष्ठता यासारख्या समस्या उद्भवू लागतात.

दंगल फेम 'बबिता'चं दुर्मिळ आजाराने निधन, डर्माटोमायोसिटिस नक्की असते काय? महिलांना असतो अधिक त्रास..

याशिवाय खाल्ल्यानंतर पोट फुगणे, भूक कमी लागणे, खाल्ल्यानंतर लगेच पोटाच्या निगडीत समस्या वाढणे. यासह इतर समस्या निर्माण होतात. मुख्य म्हणजे खाल्लेलं अन्न लवकर आणि नीट पचत नाही. यावर उपाय म्हणून आपण छोटासा घरगुती उपाय करून पाहू शकता. यामुळे नक्कीच आराम मिळेल.

वेलचीच्या बिया म्हणजे रामबाण उपाय

जेवल्यानंतर दोन लहान वेलचीची साल काढून घ्या. त्याच्या बिया तोंडात ठेवा आणि दोन ते मिनिटांसाठी चघळत बसा. आपण याचे सेवन जेवण केल्यानंतर करू शकता. यामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी-६, प्रोटीन, फायबर, रिबोफ्लेविन, नियासिन इत्यादी पोषक घटक असतात. जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात.

कानात मळ झाला आहे? पिन-इअरबड्स घालू नका, पाहा ३ उपाय- बहिरेपणाचा धोका टाळा

नियमित जेवल्यानंतर छोटीशी वेलची खाल्ल्याने पोटातील गॅस, ॲसिडिटी, अपचन आदी सर्व समस्या दूर होतात. यासह ॲसिडिटीमुळे तोंडातून येणारा दुर्गंधही निघून जातो.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य