सध्याच्या धावपळीच्या आणि तणावग्रस्त जीवनशैलीमुळे आपण आहाराकडे दुर्लक्ष करतो.(Vitamin B12 deficiency) जंक फूड, खाण्यापिण्याची चुकीची पद्धत, सतत प्रोसेस्ड फूड्सवर अवलंबून राहिल्यामुळे आपल्या शरीराला पुरेशा प्रमाणात पोषण मिळत नाही.(Vitamin B12 symptoms) या कारणांमुळे शरीरात जीवनसत्त्व बी १२ ची कमतरता जाणवू लागते. काही औषधांमुळे किंवा काही वेळा वयोमानानुसार आपल्या शरीरातील जीवनसत्त्व कमी होतं. ज्याचा परिणाम थेट आपल्या नसांवर होतो. (Vitamin B12 deficiency signs) आपल्या शरीराला जीवनसत्त्व आणि मिनरल्स मिळणं अधिक महत्त्वाच आहे. आपल्या संपूर्ण शरीराला व्हिटॅमिन बी १२ ची सगळ्यात जास्त आवश्यकता असते.(Nerve damage due to B12 deficiency) हे पाण्यात विरघळणारं जीवनसत्त्व शरीरातील प्रत्येक पेशीच्या कार्यासाठी उपयोगी पडतं.(Low B12 effects on body) व्हिटॅमिन बी१२ची पातळी सतत घटत राहिली तर थेट नसांवर परिणाम होतो. शरीरात व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता झाल्यावर काय होतं पाहूया. (Vitamin B12 health problems)
ना लाटण्याची झंझट ना कणिक मळण्याचं टेंशन, मोजून १० मिनिटांत पराठे करण्याची एक सोपी ट्रिक
1. व्हिटॅमिन बी १२ हे आपल्या नसाभोवती मायलिन आवरणाच्या निर्मितीसाठी आवश्यक आहे. जे एक संरक्षक थर तयार करते. याचा कमतरतेमुळे नसांचे नुकसान होते. ज्यामुळे हात, पाय किंवा संपूर्ण शरीरात मुंग्या येतात. जळजळ होणे किंवा बधीरपणा येऊ शकतो.
2. व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेमुळे शरीरात लाल रक्तपेशी तयार होण्यास अडथळा येतो. ज्यामुळे अशक्तपणा येऊ शकतो. लाल-रक्तपेशी संपूर्ण शरीरात ऑक्सिजन वाहून नेतात. या कमतरतेमुळे शरीराच्या विविध भागांमध्ये पुरेसे ऑक्सिजन पोहोचू शकत नाही. ज्यामुळे सतत थकवा, आळस किंवा अशक्तपणा जाणवतो.
कणिक मळताना ‘हा’ एक सोपा उपाय करा, चपाती कडक अजिबात होणार नाही-पहिल्यांदा करत असाल तरीही..
3. या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे आपल्या मज्जासंस्थेचे नुकसान होते. खराब मज्जातंतूंच्या कार्यामुळे चालण्यात अडचण येऊ शकते. अडखळणे किंवा संतुलन राखण्यात अडचण येऊ शकते. हे लक्षण विशेषत: वयोवृद्धांमध्ये पाहायला मिळते.
4. या जीवनसत्त्वाचा मेंदूच्या कार्याशी थेट संबंध आहे. दीर्घाकाळापर्यंतच्या कमतरतेमुळे स्मरणशक्ती कमी होते. लक्ष लागत नाही, गोंधळ होतो. लक्ष केंद्रित करण्यास अडचण येते. डिमेंशियाचे लक्षण मानले जाते. पण याचे कारण व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता असू शकते.
5. मज्जासंस्थेवरील परिणाम आपल्या मानसिक आरोग्यावर देखील परिणाम करतात. व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरेतमुळे मू़ड स्विंग, चिडचिड, दु:ख आणि नैराश्य देखील होऊ शकते. हे मेंदूमध्ये सेरोटोनिन आणि डोपामाइन सारख्या आनंदी संप्रेरकांच्या निर्मितीमध्ये बिघाड झाल्यामुळे होते.
Web Summary : Ignoring diet leads to Vitamin B-12 deficiency, causing nerve damage and various health issues. Symptoms include tingling, fatigue, walking difficulties, memory problems, and mood swings. Timely care is essential.
Web Summary : आहार पर ध्यान न देने से विटामिन बी-12 की कमी हो जाती है, जिससे तंत्रिका क्षति और विभिन्न स्वास्थ्य समस्याएं होती हैं। लक्षणों में झुनझुनी, थकान, चलने में कठिनाई, स्मृति समस्याएं और मनोदशा में बदलाव शामिल हैं। समय पर देखभाल जरूरी है।