Join us

रोज सकाळी गरम पाण्यात १ चमचा तूप घालून प्या, वाचा फायदे! चेहऱ्यावर चमक आणि पचनही सुधारते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2025 16:03 IST

Drink 1 teaspoon of ghee in hot water every morning, read the benefits : आरोग्यासाठी फार चांगले असते हे पाणी. पाहा काय फायदे आहेत.

आयुर्वेदिक गुणधर्म असलेले अधिकतर पदार्थ आपल्या स्वयंपाकघरातच असतात. घरगुती उपायांसाठी त्यांचा वापर आपण करतो. काही उपाय असेही असतात जे आपल्याला माहिती नाहीत. (Drink 1 teaspoon of ghee in hot water every morning, read the benefits)किंवा माहिती असतात मात्र कधी करुन पाहत नाही कारण ते ऐकायला विचित्र वाटतात. जसे की पाण्यातून तूप घेणे. पाणी व तूप एकत्र फारच विचित्र लागेल हाच विचार पहिले डोक्यात येतो. मात्र हे कॉम्बिनेशन फार गुणकारी असते. तुपाचे फायदे आपण जाणून आहोत. आहारामध्ये तूप असायलाच हवे. तूप फार पौष्टिक असते. रोज सकाळी रिकाम्या पोटी तूप पाणी प्यायल्याने अनेक फायदे मिळतात. पाहा कसे प्यायचे.

एका ग्लासमध्ये कोमट पाणी घ्या. त्यामध्ये चमचाभर चांगले साजुक तूप घाला. ते ढवळा आणि मग ते पाणी पिऊन टाका. लहान भांडे प्यायले तरी चालेल. चव अगदीच वाईट लागत नाही. त्यामुळे हे पाणी पिणे नक्कीच त्रासाचे नाही.

वजन कमी करण्यासाठी अनेक उपाय करत असाल तर मग हा एक उपाय कराच. नक्की फरक जाणवेल. रोज सकाळी गरम पाण्यातून तूप घ्यायचे. वजन कमी करण्यासाठी त्याचा फायदा होतो. मात्र त्यासोबत चांगला आहार घ्यायला हवा. व्यायामही करायला हवा. इतरही गोष्टी चांगल्या हव्यात. न चुकता रोज असे पाणी प्यायल्यावर हळूहळू फरक जाणवायला लागेल. 

गरम पाणी व तुपाचे मिश्रण आतड्यांसाठी वंगणाचे काम करते. (Drink 1 teaspoon of ghee in hot water every morning, read the benefits)पचनाचे काही त्रास असतील तर त्यावर तूप पाणी पिणे हा मस्त उपाय आहे. पचन क्रिया सुधारते तसेच जर पोट साफ होत असेल तर त्या समस्येचेही निवारण होते. पोटाच्या त्रासांवर हे पाणी अगदी गुणकारी आहे.

हार्मोनल बदलांसाठी तसेच हार्मोंन्सचे संतुलन चांगले ठेवण्यासाठी तूप पाणी उपयुक्त ठरते. पाळीचे काही त्रास असतील तर ते ही बरे होतात. 

त्वचेसाठी असे पाणी फार फायदेशीर ठरते. मुळात त्वचेसाठी तूप चांगले असते. त्वचा छान मऊ मुलायम होते. तसेच काही डाग फोड राहत नाहीत. त्वचाच नाही तर केसही चांगले मऊ व छान होतात. 

शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यासाठी हे पाणी मदत करते. 

  

टॅग्स : हेल्थ टिप्सहोम रेमेडीघरगुती उपाय