Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > पायांवर दिसणारे ३ बदल सांगतात, हार्ट ॲटॅकचा धोका; पाय पाहा-सावध व्हा

पायांवर दिसणारे ३ बदल सांगतात, हार्ट ॲटॅकचा धोका; पाय पाहा-सावध व्हा

Heart Attack Sign in Legs : काही हार्ट अ‍ॅटॅक अचानक आणि तीव्र असू शकतात. पण जास्तीत जास्त केसेसमध्ये हार्ट अ‍ॅटॅकची लक्षणं आधीच दिसतात. पण त्यांकडे दुर्लक्ष केलं जातं. ज्यामुळे जीवाचा धोका वाढतो.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 20:01 IST2025-05-31T10:56:59+5:302025-05-31T20:01:59+5:30

Heart Attack Sign in Legs : काही हार्ट अ‍ॅटॅक अचानक आणि तीव्र असू शकतात. पण जास्तीत जास्त केसेसमध्ये हार्ट अ‍ॅटॅकची लक्षणं आधीच दिसतात. पण त्यांकडे दुर्लक्ष केलं जातं. ज्यामुळे जीवाचा धोका वाढतो.

Dont avoid 3 early signs of heart attack in legs | पायांवर दिसणारे ३ बदल सांगतात, हार्ट ॲटॅकचा धोका; पाय पाहा-सावध व्हा

पायांवर दिसणारे ३ बदल सांगतात, हार्ट ॲटॅकचा धोका; पाय पाहा-सावध व्हा

Heart Attack Sign in Legs :  जगभरात हार्ट अ‍ॅटॅक (Heart Attack) आरोग्यासंबंधी एक गंभीर समस्या बनली आहे. फक्त वयोवृद्धच नाही तर तरूण लोकही हार्ट अ‍ॅटॅकनं आपला जीव गमावत आहेत. ही एक अशी स्थिती आहे ज्यात हृदयाचे स्नायू मरू लागतात, कारण त्यांमध्ये पुरेशा प्रमाणात रक्त पुरवठा होत नाही. धमण्यांमध्ये अडथळे याचं मुख्य कारण ठरतात.

महत्वाची बाब म्हणजे हार्ट अ‍ॅटॅक येण्याआधी शरीरात काही लक्षणं दिसतात. जर ही लक्षण वेळीच ओळखली आणि योग्य ते उपचार घेतले तर हार्ट अ‍ॅटॅकचा धोका टाळला जाऊ शकतो. काही हार्ट अ‍ॅटॅक अचानक आणि तीव्र असू शकतात. पण जास्तीत जास्त केसेसमध्ये हार्ट अ‍ॅटॅकची लक्षणं आधीच दिसतात. पण त्यांकडे दुर्लक्ष केलं जातं. ज्यामुळे जीवाचा धोका वाढतो.

हार्ट अ‍ॅटॅकची काही लक्षण पायांवरही दिसून येतात. पायांमध्ये ही लक्षणं दिसत असतील तर हृदयात काहीतरी गडबड आहे असं समजा. पायांवर सूज, सतत वेदना ही लक्षणं हृदयासंबंधी एखाद्या आजाराशी संबंधित असू शकतात. अशात पायांवर हार्ट अ‍ॅटॅकची कोणती लक्षणं दिसतात हे जाणून घेऊ.

पायांवर सूज

Medlineplus च्या रिपोर्टनुसार, जर तुमच्या पायांच्या खालच्या भागात म्हणजे गुडघ्यांपासून खाली कुठेही सूज दिसत असेल तर हा हृदयासंबंधी समस्येचा संकेत असू शकतो. जेव्हा आपलं हृदय योग्यपणे काम करत नाही तेव्हा ब्लड फ्लो स्लो होतो आणि रक्त पायांच्या नसांमध्ये परत येतं. त्यामुळे पायांच्या नसांमध्ये तरल पदार्थ जमा होतात. त्यामुळे सूज दिसू लागते.

पायांमध्ये वेदना

काही शारीरिक मेहनत केली किंवा खूप चालल्यानंतर पायात वेदना होत असेल तर आराम केल्यावर या वेदना दूर होतात. ही एक कॉमन बाब आहे. पण जर पाय सतत दुखत असतील तर वेळीच सावध होण्याची गरज आहे. कारण हा हृदयासंबंधी समस्येचा संकेत असू शकतो. ब्लड वेसल्समध्ये काही समस्या असेल तर पायांमध्ये सतत वेदना होतात. म्हणजे तुमचं हृदय योग्यपणे रक्त पंप करत नाहीये.

थंड पडणे किंवा रंग बदलणे

जर तुमच्या पायांना अचानक थंड वाटत असेल किंवा पायांच्या त्वचेचा रंग बदलून हलका जांभळा झाला असेल तर याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. कारण हा हार्ट अ‍ॅटॅक किंवा हृदयासंबंधी इतर समस्येचा संकेत असू शकतो. पायात विस्कळीत झालेला ब्लड फ्लोमुळे पाय थंड पडतात आणि त्यांचा रंग बदलतो.

इतरही काही कॉमन लक्षणं

थकवा

झोपेची समस्या

आंबट ढेकर

चिंता

हृदयाचे ठोके वाढणे

हातांमध्ये कमजोरी

विचार करण्यात बदल

दृष्टीमध्ये बदल

भूक कमी लागणे

हात-पायांमध्ये झिणझिण्या

रात्री श्वास घेण्यास समस्या

Web Title: Dont avoid 3 early signs of heart attack in legs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.