Join us   

गुळासोबत खा एक लसणाची पाकळी, बॅड कोलेस्टेरॉल होईल कमी - रक्तही होईल पातळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2024 5:21 PM

Does Garlic and Jaggery Lower Cholesterol? : बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी एक सोपा घरगुती उपाय, तज्ज्ञ सांगतात..

आजकाल बिघडलेल्या जीवनशैलीमुळे गंभीर आजारांचा धोका वाढतो. मुख्य म्हणजे सध्या अनेक जण बॅड कोलेस्टेरॉलने (Bad Cholesterol) त्रस्त आहे. रक्तवाहिन्यांमध्ये बॅड कोलेस्टेरॉल जमा झाल्याने नसा ब्लॉक होतात आणि रक्तप्रवाह हळुवार होतो. ज्यामुळे हार्ट अटॅकसोबतच इतरही गंभीर समस्यांचा धोका वाढतो. अशात बॅड कोलेस्ट्रोल नष्ट करण्यासाठी आपण गुळासोबत लसूण खाऊ शकता.

गुळ आणि लसणाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत (Health Tips). पण नसांमधून बॅड कोलेस्टेरॉल काढण्यासाठी गुळ आणि लसूण कधी आणि कशापद्धतीने खावे याची माहिती आयुर्वेद तज्ज्ञ मिहीर खत्री यांनी दिली आहे(Does Garlic and Jaggery Lower Cholesterol?).

यासंदर्भात आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात, 'हृदयाचे विकार टाळण्यासाठी उत्तम आयुर्वेदिक उपाय म्हणजे लसूण आणि गुळाची चटणी खाणे. आपण ही चटणी नाश्त्यासोबत किंवा दुपारच्या जेवणासोबत खाऊ शकता. लसूण आणि गुळातील गुणधर्म बॅड कोलेस्ट्रोल कमी करण्यास मदत करते. यासह पोटाचे विकार दूर करतात.'

माठातले पाणी गारच होत नाही? २ युक्त्या, पाणी होईल गार नेहमी, मिळेल नैसर्गिक थंडावा

गुळ आणि लसूण खाण्याचे फायदे

- लसणामध्ये ॲलिसिन नावाचे संयुगे आढळते. यामध्ये फॉस्फरस, झिंक, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम सारख्या खनिजे भरपूर प्रमाणात असतात. यासह त्यात व्हिटॅमिन सी, के, फोलेट, नियासिन आणि थायामिन देखील असते. जर आपण लसूण आणि गुळ एकत्र करून खाल्ले तर, नक्कीच बॅड कोलेस्टेरॉल बाहेर पडेल.

- लसूण गुळासोबत खाल्ल्यास वजन कमी होण्यास मदत होते. लसणातील गुणधर्म चयापचय वाढवतात. यामुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी होते. यामुळे रक्ताची कमतरताही दूर होते. मुख्य म्हणजे लसूण हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्याचे काम करते.

हॉटेलस्टाइल परफेक्ट मोकळा जीरा राईस करण्याची ही घ्या रेसिपी, घरीच करा १५ मिनिटांत

- लसणाचा आहारात समावेश केल्याने पचनाच्या समस्या सुटतात.

- लसणात मोठ्या प्रमाणात झिंक आढळते. ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. शिवाय त्यात व्हिटॅमिन सी असते. जे संसर्गाशी लढण्यास मदत करते.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य