Join us

सोयाबीनमुळे खरंच ब्रेस्ट कॅन्सर होतो का? डॉक्टर सांगतात, आहार आणि कॅन्सरचा संबंध

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 16:22 IST

Soybean Connection Breast Cancer : खरंच यात काही तथ्य आहे का? की ही केवळ एक अफवा आहे किंवा ही चर्चा का केली जात आहे? याबाबत आपण पाहणार आहोत.

Soybean Connection Breast Cancer : खाण्या-पिण्याच्या गोष्टींबाबत रोजच काहीना काही ऐकायला मिळतं. काही जास्त खाल्लं तर काय होईल किंवा काही कमी खाल्लं तर काय होईल. तसेच काय खाऊ नये किंवा काय खावं. यातीलच एक चर्चा म्हणजे सोयाबीन आणि ब्रेस्ट कॅन्सरमधील कनेक्शन. अनेकांना असं वाटतं की, सोयाबीन खाल्ल्यानं ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढू शकतो(Does Soybean Cause Breast Cancer). पण खरंच यात काही तथ्य आहे का? की ही केवळ एक अफवा आहे किंवा ही चर्चा का केली जात आहे? याबाबत आपण पाहणार आहोत. कॅन्सर सर्जन डॉक्टर जयेश शर्मा यांनी याबाबत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

सोयाबीन आणि अ‍ॅस्ट्रोजनचं कनेक्शन

डॉक्टर सांगतात की, अ‍ॅस्ट्रोजन हे आपल्या शरीरातील एक नॅचरल हार्मोन असतं. याचा सेल्सवर प्रभाव पडतो आणि त्यांमध्ये बदल करतं. हाच बदल कधी कधी कॅन्सरचं कारण ठरू शकतो.

सोयाबीनमध्ये अ‍ॅस्ट्रोजन असतं. पण यातील अ‍ॅस्ट्रोजन हे मानवी शरीरात असलेल्या अ‍ॅस्ट्रोजनपेक्षा अनेक पटीने कमजोर असतं. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर सोयाबीनमधील अ‍ॅस्ट्रोजन सेल्ससोबत जुळलेलं तर असतं, पण त्याने कॅन्सर होईल इतके ते मजबूत नसतात. 

काय सांगतो रिसर्च?

काही रिसर्चमधून समोर आलं आहे की, ज्या महिलांना आधी ब्रेस्ट कॅन्सर झाला आहे, त्या जर नियमितपणे सोयाबीन खात असतील तर त्यांना पुन्हा कॅन्सर होण्याचा धोका 25 ते 30 टक्के कमी असतो. म्हणजे सोयाबीन त्यांच्यासाठी सुरक्षा कवचासारखं काम करतं.

सोयाबीनमधील पोषक तत्व

सोयाबीनला 'व्हेजिटेरियन प्रोटीनचा राजा' म्हटलं जातं. कारण यात 52 टक्के प्रोटीन असतं. जे चिकनमधील प्रोटीनपेक्षा अधिक जास्त आहे. त्याशिवाय यात भरपूर फायबर असतं आणि इतरही मिनरल्स असतात. ज्यामुळे शरीराला अनेक फायदे मिळतात.

सोयाबीनबाबत जी भिती लोकांच्या मनात आहे ती गैरसमजांच्या आधारावर आहे. यानं ब्रेस्ट कॅन्सर होत नाही. उलट त्यापासून बचाव करण्यास मदत मिळू शकते. डॉक्टरांच्या सल्ल्यानं याचा आहारात संतुलित प्रमाणात समावेश केला तर फायदेशीर ठरू शकतात.

टॅग्स : स्तनाचा कर्करोगकॅन्सर जनजागृतीस्त्रियांचे आरोग्य