Join us

मीठ भरपूर खाता? मग ती सवय बदला.. पाहा काय दुष्परिणाम होतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2025 12:43 IST

Do you eat a lot of salt? Then change that habit : अति मीठ खाणे शरीरासाठी चांगले नाही. पाहा किती वाईट ठरु शकते.

जेवणामध्ये गरजेचे पदार्थ कोणते? असं विचारल्यावर एका कोणत्या पदार्थाचे नाव सांगता येणार नाही. मात्र एक पदार्थ आहे, जो नसेल तर जेवण फिके होते. (Do you eat a lot of salt? Then change that habit)त्या पदार्थाशिवाय जेवण तयार करताच येणार नाही. असा पदार्थ म्हणजे अर्थातच मीठ. मीठ हा असा एकच पदार्थ असेल जो प्रत्येक घरात असतोच. मीठाशिवाय अन्न तयार करणे शक्य नाही. जेवणाला काही चवच येणार नाही.(Do you eat a lot of salt? Then change that habit) अगदी रुचकर तयार केलेल्या भाजीतही मीठ कमी जास्त झाल्यावर ती खावीशी वाटत नाही. मीठाचे प्रमाण बरोबरच असायला हवे बाकी पदार्थ इकडे तिकडे चालतात. 

मीठ आपण रोज खातो. घरच्या सगळ्यांना भाजीत मीठ बरोबर लागत असताना तुम्हाला ते कमी वाटते का? काही जणांना अति मीठ खायची सवय असते. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक चांगला नाही. त्याप्रमाणे मीठही जास्त खाणे शरीरासाठी चांगले नाही. अति मीठ खाल्याने अनेक त्रास होऊ शकतात. मीठामुळे वजनही वाढते. द हेल्थसाईट या साईटवर सांगितले आहे की, जर तुम्ही खुप जास्त मीठ खात असाल तर प्रमाण कमी करा. पाहा काय दुष्परिणाम होऊ शकतात.

१. अति मीठ खाल्याने मूत्राशयाचे त्रास सुरू होतात. सारखे लघवीला जावे लागते. सहन करता येत नाही अशी कळ येते. रात्री झोपेतही त्रास सुरू होतात. पोटामध्ये दुखायला लागते. 

२. मीठातील सोडिअम शरीरावर परिणाम करते. अति मीठ खाल्याने सारखी तहान लागते. घशाला कोरड पडते. 

३. अनेकांच्या शरीराला सारखी सुज येते. हात सुजतात तसेच पाय सुजतात. चेहर्‍यालाही सारखी सुज येते. मीठ जास्त खाल्याने असे होते. बोटांना सूज येते. दुखत नाही मात्र फुगीरपणा जाणवतो.      

४.  अधूनमधून अचानक डोकं दुखतं का? काहीही कारण नसताना काही मिनिटांसाठी मध्येच डोक्यामध्ये कळ येते. मीठ जास्त खाल्याने असे होऊ शकते.

५. सकाळी उठल्यानंतर अति मीठ खाणाऱ्यांना ब्लोटिंगचा त्रास होतो. पोट साफ होत नाही. पोटाच्या कोपर्‍यामध्ये दुखते.

६. एकदा का अति मीठ खायची सवय लागली की, मग सगळ्या पदार्थांमध्ये मीठ कमी जाणवायला लागते. जि‍भेला मीठ हवेहवेसे वाटायला लागते. त्यामुळे वेळीच मीठ खाण्याचे प्रमाण आटोक्यात आणा.  

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सअन्न