Join us   

Couple marriage rules : बाबौ! लग्न टिकवण्यासाठी बायकोनं बनवले ६ अजब नियम; हे भलतेच नियम वाचून लोक म्हणाले....

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2021 4:33 PM

Couple marriage rules : मॅरेज रूल्सचा हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. जास्तीत जास्त लोकांनी असं म्हटलं की हे नियम बकवास आहेत. यातून हे दोघं नवरा बायको एकमेकांबाबत किती असुरक्षित आहेत हे दिसून येतंय

जेव्हा लोक लग्न करतात तेव्हा नेहमीच एकमेकांच्या सोबत राहण्याची वचनं देतात. अनेकदा विचारांमधील मतभेद एकमेकांचे वागणं पटत नसल्यानं नाती तुटतात. सोशल मीडियावर नवरा बायकोच्या नात्याची एक घटना व्हायरल होत आहे. आपलं लग्न वाचवण्यासाठी या महिलेनं अजबच नियम काढले आहेत. सोशल मीडियावर या महिलेचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. (Husband wife couple marriage rules for making relationship work goes viral)

लग्न झालेली जोडपी आपलं नात टिकवण्यासाठी हवं ते करतात. अमेरिकेतील एका महिलेनं  आपल लग्न वाचवण्यासाठी पतीसाठी  आगळे वेगळे नियम तयार केले आहेत. या महिलेचं नाव मॅकफर्सन आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट टाकून तिनं या नियमांबाबत लोकांनाही माहिती दिली आहे. 

या पोस्टमधील नियमांनुसार 

1) तिचा पती इतर महिलांसह मैत्रीदेखील करू शकत नाही.

2) दोघांपैकी कोणीही परक्या स्त्री, पुरूषासोबत एकटे राहणार नाही. 

3) एकमेकांना सांगितल्याशिवाय कोणालाही मेसेज पाठवायचा नाही

4) पती-पत्नीनं इतर व्यक्तींसह शरीरसंबंध ठेवायचे नाहीत.

5) दोघांपैकी कोणीही पॉर्न मुव्हीज पाहणार नाही.

6) दोघांनीही आई वडिलांपेक्षाही जास्त महत्व पार्टनरला द्यायचं.

बेली आणि जॅकचं लग्न २०१८ मध्ये झाल होतं. मॅरेज रूल्सचा हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. जास्तीत जास्त लोकांनी असं म्हटलं की हे नियम बकवास आहेत. यातून हे दोघं नवरा बायको एकमेकांबाबत किती असुरक्षित आहेत हे दिसून येतंय. लोकांच्या आग्रहास्तव बेलीनं दुसऱ्या व्हिडीओत हे नियम का बनवले याबाबत सांगितलं आहे.

बेला सांगते की, ''एक विवाहित महिला म्हणून मला असं वाटतं की, माझ्या पतीला इतर  महिलांशी संबंध ठेवण्याची काही गरज नाही. आम्ही दोघं एकमेकांसाठी पुरेसे आहोत. आमचं शरीर चांगलं राहावं म्हणून पॉर्न न पाहण्याचा नियम तयार करण्यात आता आहे.  जेणेकरून भावनात्मक रूपात आम्हाला सुरक्षित वाटेल आणि इंटेमसी स्ट्रॉंग राहिल.''   

टॅग्स : रिलेशनशिपरिलेशनशिपसोशल व्हायरल