Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > हृदयाच्या रक्तवाहिन्यात का होतात ब्लॉक, वाढतो हार्ट ॲटॅकचा धोका, तज्ज्ञांनी सांगितली कारणं...

हृदयाच्या रक्तवाहिन्यात का होतात ब्लॉक, वाढतो हार्ट ॲटॅकचा धोका, तज्ज्ञांनी सांगितली कारणं...

Coronary artery disease : धमण्यांमध्ये जमा झालेलं कोलेस्टेरॉल आणि चरबी याची मुख्य कारणं सांगितली जातात. ज्यामुळे रक्त पुरवठा सुरळीत होत नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 19:09 IST2025-06-06T15:18:40+5:302025-06-06T19:09:12+5:30

Coronary artery disease : धमण्यांमध्ये जमा झालेलं कोलेस्टेरॉल आणि चरबी याची मुख्य कारणं सांगितली जातात. ज्यामुळे रक्त पुरवठा सुरळीत होत नाही.

Coronary artery disease increases the risk of heart attack | हृदयाच्या रक्तवाहिन्यात का होतात ब्लॉक, वाढतो हार्ट ॲटॅकचा धोका, तज्ज्ञांनी सांगितली कारणं...

हृदयाच्या रक्तवाहिन्यात का होतात ब्लॉक, वाढतो हार्ट ॲटॅकचा धोका, तज्ज्ञांनी सांगितली कारणं...

Coronary artery disease : रोज हृदयरोगांमुळे जीव गेल्याच्या कितीतरी घटना समोर येत असतात. जगभरात हृदयरोगांमुळेच सगळ्यात जास्त जीव जात असल्याचं अनेक रिपोर्टमध्ये सांगण्यात येतं. हृदयरोग वेगवेगळ्या प्रकारचे असतात. यातीलच एक म्हणजे कोरोनरी आर्टरी डिजीज. हृदयाला रक्त पोहोचवणाऱ्या धमण्या आतून आकुंचन पावतात तेव्हा हा आजार होतो. ही समस्या हळूहळू वाढत जाते. धमण्यांमध्ये जमा झालेलं कोलेस्टेरॉल आणि चरबी याची मुख्य कारणं सांगितली जातात. ज्यामुळे रक्त पुरवठा सुरळीत होत नाही.

कार्डियोलॉजीस्ट डॉ. रवि प्रकाश यांनी Indiatv.in ला सांगितलं की, जेव्हा धमण्या आकुंचन बारीक होतात किंवा आकुंचन पावतात तेव्हा हृदयाला पुरेसं ऑक्सीजन आणि पोषक तत्व मिळत नाहीत. त्यामुळे छातीत वेदना, श्वास भरून येणे आणि सतत थकवा अशा समस्या होतात. पुढे जाऊन हार्ट अॅटॅकही येऊ शकतो.

कोरोनरी आर्टरी डिजीजची कारणं

हाय ब्लड प्रेशर आणि डायबिटीस

धुम्रपान आणि मद्यसेवन

जास्त फॅट आणि कोलेस्टेरॉलयुक्त जेवण

लठ्ठपणा

तणाव आणि झोपेची कमतरता

आनुवांशिकता

कोरोनरी आर्टरी डिजीजची सुरूवात झाल्यावर बऱ्याच केसेसमध्ये लक्षणं दिसत नाहीत. जसजशा धमण्या अधिक बारीक होतात, तेव्हा याची लक्षणं दिसू लागतात. जेव्हा व्यक्ती एखादं मेहनतीचं काम करते, धावते किंवा मानसिक तणावात असते तेव्हा हृदयाला जास्त ऑक्सीजनची गरज असते. या स्थितीत जर धमण्या मोकळ्या नसल्या तर पुरेसं ऑक्सीजन हृदयाला मिळू शकत नाही. याच कारणानं हार्ट अॅटॅकचा धोका वाढतो.

बचाव आणि उपाय

कोरोनरी आर्टरी डिजीजचा धोका टाळण्यासाठी लाइफस्टाईलमध्ये बदल करणं सगळ्यात महत्वाचं ठरतं. संतुलित आहार, नियमित व्यायाम, तणाव कमी घेणे, धूम्रपान बंद करणे आणि वेळोवेळी तपासणी करणे फायदेशीर ठरेल. जर कोरोनरी आर्टरी डिजीजचं आधीच निदान झालं असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानं योग्य उपचार घ्या. कोरोनरी आर्टरी डिजीज एक गंभीर, पण नियंत्रित केली जाऊ शकणारी स्थिती आहे. पण जर याकडे दुर्लक्ष केलं तर हार्ट अॅटॅकचा धोका वाढतो. 

Web Title: Coronary artery disease increases the risk of heart attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.