गॅस, पचनक्रियेचा त्रास हल्ली अनेकांमध्ये पाहायला मिळत आहे. त्यात बद्धकोष्ठतेची समस्या सध्या वाढताना दिसत आहे.(Natural remedies for bloating) चुकीची जीवनशैली, अनियमित खाण्याच्या सवयी, ताणतणाव आणि फायबरच्या कमतरतेमुळे आपल्याला बद्धकोष्ठतेच्या समस्येचा सामना करावा लागतो. (How to cleanse stomach naturally)
ॲसिडीटी- गॅसमुळे आपल्याला अस्वस्थता जाणवू लागते.(Home remedy for gas and bloating) सतत छातीत जळजळ होत राहाते. त्यामुळे कोणत्याही पदार्थ खाताना आपल्या अधिक विचार करावा लागतो.(Ayurvedic remedies for constipation) आयुर्वेदामध्ये बद्धकोष्ठता ही अनेक रोगांचे मूळ मानण्यात आली आहे.(Best way to drink Triphala at night) जर आपल्याला देखील वारंवार बद्धकोष्ठतेच्या समस्येला सामोरे जावे लागत असेल तर सोपा उपाय करुन पाहा. (Ayurvedic tips for gas and bloating)
वर्कआउटनंतर शरीरात एनर्जी राहात नाही? व्यायाम करण्यापूर्वी प्या 'हे' ५ ड्रिंक्स, थकवा होईल दूर
प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टर सलीम झैदी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकांऊटवरुन एक व्हिडिओ शेअर केला ते म्हणतात जर आपल्याला सतत बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल आणि नियमितपणे पोट साफ होत नसेल तर आयुर्वेदातील हा बहुगुणी काढा प्या. ज्यामुळे बद्धकोष्ठताच नाही तर आपली पचनसंस्था देखील मजबूत होईल.
आयुर्वेदात त्रिफळाला अधिक महत्त्व आहे. हे फळ तीन आयुर्वेदिक पदार्थांपासून बनलेले आहे. हिरडा, बहेडा आणि आवळा. या तिन्ही गोष्टी शरीराला डिटॉक्सिफाय करतात. तसेच पोटात जमा झालेले विषारी पदार्थ हळूहळू काढून टाकतात. ज्यामुळे बद्धकोष्ठता तसेच गॅस, अपचन आणि आम्लता यांसारख्या समस्यांपासून आराम मिळतो.
तज्ज्ञ म्हणतात की, रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास पाण्यात १ चमचा त्रिफळा पावडर मिसळून प्यायाल्याने पोट साफ होण्यास मदत होते. हा काढा आपण रात्री झोपण्यापूर्वी नियमितपणे प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतील. वारंवार औषधे खाल्ल्याने आपल्याला ॲसिडीटीची समस्या उद्भवते. त्यासाठी आयुर्वेदातील हा प्रभावी उपाय करुन पाहा.