कामाच्या गडबडीत, घर, ऑफिस आणि इतर गोष्टींमुळे महिलांना स्वत:च्या आरोग्याकडे हवं तसं लक्ष देता येत नाही.(women urinary health tip) त्याचं आरोग्य राखणं हे फक्त झोप, आहार किंवा व्यायामावर अवलंबून नसतं.(urination mistakes women) शरीराच्या प्रत्येक क्रियेबद्दल तितकंच काळजी घेणे देखील गरजेच आहे. अनेकदा कामाच्या गडबडीत, प्रवासात अनेक स्त्रिया लघवी दाबून ठेवतात.(urinary tract infection prevention) काहींना पब्लिक टॉयलेटची भीती वाटते, तर काहींना झोप मोडू नये म्हणून या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. (female hygiene tips)
पण ही साधी वाटणारी सवय आपल्या मूत्रपिंड आणि गर्भाशयाशी संबंधित गंभीर आजारांचं कारण ठरू शकते. डॉक्टरांच्या मते, वारंवार लघवी दाबून ठेवणं हे मूत्राशयावर ताण आणतं आणि जंतू वाढीस पोषक वातावरण निर्माण करतं.(how to maintain female urinary health easily) परिणामी संसर्ग वाढून शरीरात विषारी घटक साचतात. इतकेच नाही तर अनेकजण बाथरुममध्ये जातात आणि काही सेकंदात बाहेर येतात.(mistakes while peeing that increase infection risk) यामुळे लवकर लघवी करण्यासाठी त्यांना अतिरिक्त शक्ती वापरावी लागते. या अतिरिक्त ताणामुळे आपलं नुकसान होऊ शकतं.
केसगळती थांबवण्यासाठी शेवग्याची पावडर की ज्यूस? जाणून घ्या लांबसडक केसांचं जबरदस्त ब्यूटी सिक्रेट!
आपल्याला पॉवर पीईंगसारख्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं. डॉक्टर सांगतात पॉवर पीईंग हे पेल्विक फ्लोअर कमकुवतपणा आणि मूत्र गळतीची मुख्य समस्या आहे. यामुळे आपल्याला लघवी करताना ताण येतो. लघवी थांबवून ठेवल्याने आपल्या पेल्विकवर ताण पडतो. ज्यामुळे काही वेळा आपल्याला दुखायला लागते. लघवी करताना अनेकजण जास्त जोर लावतात. यामुळे आपल्याला लघवीच्या ठिकाणी जळजळ किंवा आग होते. पेल्विक फ्लोर स्नायू आणि लिगामेंटवर ताण येतो, ज्यामुळे आपल्याला मूत्रगळतीचा सामना करावा लागू शकतो.
आपल्याला लघवी आल्यानंतर ताबडतोब वॉशरुममध्ये जायला हवे. त्यानंतर मूत्राशय पूर्णपणे रिकामे झाल्यानंतरच वॉशरुमच्या बाहेर या. खूप घाईत लघवी करु नका. आपले मूत्राशयाची जागा व्यवस्थित स्वच्छ करा, यामुळे जळजळ आणि आग होणार नाही. आपल्याला शरीर वारंवार संकेत देत असतं. लघवी लागणे, जळजळ किंवा खालच्या पोटात वेदना जाणवणं ही सुरुवातीची लक्षणं असतात. त्याकडे दुर्लक्ष करु नका. महिलांनी फक्त बाह्य सौंदर्यच नाही तर स्वच्छता आणि योग्य पद्धतीने लघवी करण्याच्या सवयींवरही लक्ष द्यावं.