Join us

महिलांमध्ये किडनी स्टोनची दिसतात 'ही' लक्षणं, जाणून घ्या कारणं आणि काही घरगुती उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 11:48 IST

Kidney Stones symptoms in Women : खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, पाणी कमी पिणं अशा वेगवेगळ्या कारणांनी किडनी स्टोनची समस्या होऊ शकते.

Kidney Stones symptoms in Women : किडनी स्टोन ही आजकाल होणारी फारच कॉमन समस्या झाली आहे. केवळ पुरूषांनाच नाही तर महिलांना देखील या समस्येचा सामना करावा लागतो. खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, पाणी कमी पिणं अशा वेगवेगळ्या कारणांनी किडनी स्टोनची समस्या होऊ शकते. अशात महिलांमध्ये किडनी स्टोनची कारणं आणि लक्षणं काय असतात हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

किडनी स्टोनची कारणं...

जसे की, आधी सांगितलं खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, लठ्ठपणा, शरीरात पाण्याची कमतरता, पचनक्रियेत समस्या, पुन्हा पुन्हा गॅस तयार होणं आणि आतड्यांच्या समस्येमुळं किडनी स्टोन होऊ शकतो.

कसा तयार होतो किडनी स्टोन?

किडनी स्टोन होण्याची कारणे वेगवेगळी आहेत. जेव्हा पोटात ऑक्जालेट, कॅल्शिअमसारखे क्रिस्टल्स जमा होतात तेव्हा एक गाठीसारखी संरचना तयार होते. ही गाठ दगडासारखी कठोर असते. यालाच किडनी स्टोन किंवा स्टोन म्हटलं जातं. स्टोन किडनीमध्ये होतो त्यामुळे याला किडनी स्टोन म्हटलं जातं.

किडनी स्टोनची लक्षणं

पाठीत दुखणं

किडनी स्टोनची समस्या झाल्यावर महिलांच्या पाठीत जोरात वेदना जाणवतात. मुख्यपणे पाठीत आणि छातीच्या ठीक खाली जोरात वेदना होतात. या स्थितीत तुम्हाला किडनी स्टोनची टेस्टची गरज पडते. जेणेकरून योग्य ते निदान करून योग्य ते उपाय करता येतील.

पोटात दुखणं

किडनी स्टोन झाल्यावर पोटातही असह्य वेदना होतात. किडनी स्टोनमध्ये मुख्यपणे पोटाच्या खालच्या भागात खूप वेदना होतात. जर तुम्हालाही असं काही लक्षण दिसत असेल तर वेळीच डॉक्टरांना दाखवा. 

लघवी करताना जळजळ

किडनीमध्ये स्टोन तयार झाल्यावर लघवी करताना खूप जळजळ जाणवते. जर तुम्हालाही अशी काही समस्या होत असेल तर वेळीच योग्य ते उपचार घ्यावे.

लघवीचा रंग बदलणं

किडनी स्टोन झाल्यावर लघवीचा रंग बदलतो. महिलांमध्ये लघवी करताना लघवीचा रंग लाल, गुलाबी किंवा गर्द पिवळा दिसू शकतो. जर तुम्हालाही लघवीच्या रंगात बदल दिसत असेल तर वेळीच सावध व्हा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या.

उलटी आणि मळमळ

किडनीमध्ये स्टोन झाल्यावर महिलांमध्ये उलटी आणि मळमळ अशा समस्या दिसतात. या समस्या समजून दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. तुमच्यावर सर्जरी करण्याची सुद्धा वेळ येऊ शकते. तसेच किडनी स्टोन झाल्यावर लघवीतून दुर्गंधी, ताप, थंडी वाजणं अशीही लक्षणं दिसतात.

किडनी स्टोन दूर करण्याचे घरगुती उपाय

किडनी स्टोनच्या उपचारासाठी अनेक प्रकारची औषधे बाजारात आहेत. त्यासोबतच ऑपरेशन करुनही यापासून सुटका मिळवली जाऊ शकते. मात्र, काही घरगुती उपायांनीही किडनी स्टोनपासून आराम मिळवू शकतात. चला जाणून घेऊया किडनी स्टोनवर काही घरगुती उपाय....

१) लिंबू आणि ऑलिव्ह ऑइल

लिंबूचा रस आणि ऑलिव्ह ऑईलचं मिश्रण किडनी स्टोनमध्येही फायदेशीर आहे. लिंबाच्या रसात असलेलं सॅट्रिक अ‍ॅसिडमध्ये कॅल्शिअम बेस असलेल्या स्टोनला तोडण्याची क्षमता असते आणि पुन्हा स्टोन तयार होऊ देत नाही. हे मिश्रण तयार करण्यासाठी लिंबाचा रस आणि ऑलिव्ह ऑईल समान प्रमाणात मिश्रित करा आणि दिवसातून तीन वेळा याचे सेवन करा. 

२) डाळिंब

डाळिंबाचा रस आणि बियांमध्ये अ‍ॅस्ट्रीजेंट गुण असतात. जे किडनी स्टोनवर उपचारासाठी फायदेशीर असतात. जर तुमच्या किडनीमध्ये स्टोन असेल तर रोज एक डाळिंब खावं किंवा त्याचा रस फायदेशीर होऊ शकतो. यासोबतच डाळिंबाला फ्रूट सॅलडमध्येही मिश्रित करुन खाऊ शकता. 

३) कलिंगड

मॅग्नेशिअम, फॉस्फेट्स, कार्बोनेट आणि कॅल्शिअमपासून तयार झालेल्या किडनी स्टोनच्या उपचारासाठी कलिंगड फारच उपयुक्त आहे. कलिंगडामध्ये मोठ्या प्रमाणात पोटॅशिअम असतं, जे किडनीसाठी फारच उपयुक्त आहे. पोटॅशिअम लघवीतील अ‍ॅसिड लेव्हल नियंत्रीत ठेवण्यासाठी मदत करतं. पोटॅशिअमसोबतच कलिंगडामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असतं, यामुळे स्टोन नैसर्गिक पद्धतीनं शरीराबाहेर काढला जाऊ शकतो.

४) राजमा

राजम्यामध्ये अधिक प्रमाणात फायबर असतात. याला किडनी बिन्स नावानेही ओळखलं जातं. राजमा किडनी आणि ब्लॅडरशी संबंधीत वेगवेगळ्या आजारांवर उपाचारासाठी फायदेशीर आहे. ज्या पाण्यात राजमा भिजवून ठेवला असेल ते पाणी प्यायल्यासही फायदा होतो. 

टॅग्स : हेल्थ टिप्सस्त्रियांचे आरोग्य