Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > भाजलेले, पोळलेले चटके बसलेले त्वचेवरचे डाग होतील गायब, करा हे सोपे उपाय

भाजलेले, पोळलेले चटके बसलेले त्वचेवरचे डाग होतील गायब, करा हे सोपे उपाय

Burnt, cracked skin spots will disappear, follow this simple home remedies : त्वचेची काळजी घ्या. करा घरगुती सोपे उपाय.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2025 10:03 IST2025-10-23T10:02:48+5:302025-10-23T10:03:48+5:30

Burnt, cracked skin spots will disappear, follow this simple home remedies : त्वचेची काळजी घ्या. करा घरगुती सोपे उपाय.

Burnt, cracked skin spots will disappear, follow this simple home remedies | भाजलेले, पोळलेले चटके बसलेले त्वचेवरचे डाग होतील गायब, करा हे सोपे उपाय

भाजलेले, पोळलेले चटके बसलेले त्वचेवरचे डाग होतील गायब, करा हे सोपे उपाय

दिवाळी हा सण प्रकाशाचा, आनंदाचा आणि उत्साहाचा असतो. घरात साफसफाई, सजावट, फटाके आणि स्वादिष्ट पदार्थांच्या तयारीत सगळे रमलेले असतात. पण या आनंदाच्या गडबडीत अनेकदा हाताला किंवा पायाला चटके लागतात, कधी गरम तेल उडते, कधी सजावट करताना खरचटते. (Burnt, cracked skin spots will disappear, follow this simple home remedies )हे प्रसंग छोटे असले तरी त्यांचे डाग मात्र बराच काळ त्वचेवर दिसत राहतात. त्यामुळे दिवाळीनंतर त्वचेची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे ठरते.

चटका लागला की सर्वप्रथम त्या जागी थंड पाणी लावावे. त्यामुळे त्वचेचे तापमान कमी होते आणि सूज येण्याची शक्यता कमी होते. त्यानंतर काही नैसर्गिक उपाय केल्यास डाग लवकर कमी होतात. कोरफड हा सर्वात प्रभावी उपाय मानला जातो. ताजा कोरफडीचा अर्क लावल्यास त्वचेला थंडावा मिळतो आणि जखम भरुन येण्यास मदत होते. दिवसातून दोनदा हा उपाय केल्यास फरक दिसू लागतो.

मध हे ही उत्कृष्ट नैसर्गिक औषध आहे. त्यात जंतुनाशक गुणधर्म असल्याने जखम संसर्गापासून वाचते आणि डाग फिकट होतात. थोडा शुद्ध मध चटका बसलेल्या जागी हलक्या हाताने लावावा आणि  काही वेळाने धुऊन टाका. रोज एकदा हा उपाय केल्यास परिणाम चांगले दिसतात. हळद  आणि दुधाचा लेपही अशावेळी उपयुक्त ठरतो. हळद ही जंतुनाशक तर दूध त्वचा मऊ ठेवते. एक चमचा हळद आणि दोन चमचे दूध एकत्र करून त्याची पेस्ट तयार करावी. ही पेस्ट त्या जागी लावून पंधरा मिनिटांनी धुवावी. काही दिवसांत त्वचेचा रंग समान दिसू लागतो आणि डागही कमी होतात.

खोबरेल तेल हा आणखी एक उत्तम घरगुती उपाय आहे. ते त्वचेला पोषण देते आणि जखमेवरचा कोरडेपणा कमी करते. रात्री झोपण्यापूर्वी त्या जागी हलक्या हाताने तेलाने मालीश केल्यास त्वचा मऊ आणि सुंदर होते. काही दिवसांनी डाग हळूहळू नाहीसे होतात. जखम पूर्ण भरल्यावर गुलाबपाणी लावायचे. डाग कमी करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. कापसाच्या बोळ्यावर थोडे गुलाब पाणी घ्यायचे आणि ते त्वचेवर फिरवायचे. नक्की फायदा मिळतो. 

या सर्व उपायांसोबत थोडी काळजीही आवश्यक आहे. भाजल्यावर त्या जागी बर्फ थेट ठेवू नये, त्यामुळे त्वचेचे आणखी नुकसान होऊ शकते. जखम कोरडी राहू देऊ नका आणि फोड आल्यास ते फोडू नका. पाण्याचे फोड फोडल्यामुळे डाग तसेच राहतात. खम मोठी असेल किंवा वेदना वाढत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे.
 

Web Title : दिवाली के बाद त्वचा से जलने के निशान हटाने के सरल उपाय

Web Summary : जले हुए भाग को ठंडे पानी से धोएं। एलोवेरा, शहद, हल्दी और नारियल का तेल निशानों को मिटाने में मदद करते हैं। जलन को साफ रखें और गंभीर मामलों के लिए डॉक्टर से सलाह लें।

Web Title : Simple remedies to vanish burn marks from skin after Diwali.

Web Summary : Treat burns with cold water. Aloe vera, honey, turmeric, and coconut oil help fade scars. Keep burns clean and consult a doctor for severe cases.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.