Join us   

नाश्त्यासह- दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणाची योग्य वेळ कोणती? होमिओपॅथिक डॉक्टर सांगतात 'या' वेळेत जेवा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2024 3:49 PM

Best time for breakfast, lunch and dinner according to Homeopathy : आरोग्याला मिळतील फायदेच फायदे; फक्त 'ही' जेवणाची वेळ अजिबात टाळू नका..

डॉक्टरांचे असे अनेक सल्ले आहेत (Health Tips). जे आपण पाळल्याने आपल्यालाच फायदे होतील. पण धावपळ आणि बिघडलेल्या जीवनशैलीमुळे आपले दुर्लक्ष होते. ज्यामुळे गंभीर आजारांचा धोका वाढतो (Eating Habits). खाण्या-पिण्याच्या योग्य वेळेचा शरीरावर महत्वाचा परिणाम होत असतो. मुख्य म्हणजे अनेकदा हेल्दी खाऊनही, खाण्याच्या वेळा बदलल्याने लठ्ठपणा यासह धोकादायक आजारांचा धोका वाढतो. शिवाय वात, पित्त आणि कफावर परिणाम होऊन त्यांचे संतुलन बिघडते. त्यामुळे फक्त हेल्दी खाऊन चालणार नाही, वेळेत खाणं गरजेचं आहे.

होमिओपॅथिक डॉक्टर वंदना गुलाटी यांनी ३ टिप्स शेअर केल्या आहेत. या जेवणाच्या ३ वेळा पाळल्याने लठ्ठपणा, मधुमेह, हृदयविकार किंवा पोटाच्या आजाराचा धोका कमी होतो. शिवाय आपले आरोग्य सुदृढ राहील(Best time for breakfast, lunch and dinner according to Homeopathy).

होमिओपॅथिक डॉक्टरांच्या ३ महत्वाच्या टिप्स

नाश्ता कधी करावा?

डॉ. वंदना गुलाटी यांच्या मते, सकाळी ७ ते ८ च्या दरम्यान, नाश्ता करणे उत्तम ठरू शकते. त्याचबरोबर सकाळी १० नंतर नाश्ता खाऊ नये. शिवाय सकाळी उठल्यानंतर ३० मिनिटांच्या आत काहीतरी खाणे आवश्यक आहे.

मुलाने शेअर केली वडिलांची दहावीची मार्कशीट, 'सगळ्या विषयात झाले फेल आणि म्हणे आम्हाला'..

दुपारचे जेवण कधी करावे?

दुपारचे जेवण १२ : ३० ते २ च्या दरम्यान घ्यावे. त्याच वेळी, ४ वाजल्यानंतर खाणे शरीरासाठी हानिकारक ठरते. त्यामुळे या वेळेत खाणं गरजेचं आहे. मुख्य म्हणजे, नाश्ता आणि रात्रीचे जेवण यामध्ये ४ तासांचे अंतर असावे. त्यामुळे पचनक्रिया उत्तम राहते.

रात्रीच्या जेवणाची वेळ कोणती?

ना गॅस- ना झंझट; चटकमटक चवीचे करा कैरीचे लोणचे; पारंपारिक पद्धत-लोणचे टिकेल वर्षभर

रात्रीचे जेवण सायंकाळी ६ ते ८ च्या दरम्यान करणे आरोग्यासाठी उत्तम ठरू शकते. रात्रीचे जेवण ९ वाजल्यानंतर कधीही खाऊ नये. मुख्य म्हणजे, आपण झोपण्याच्या ३ तास आधी अन्न खावे. शिवाय रात्रीचे जेवण केल्यानंतर शतपावली करणे गरजेचं आहे. यामुळे खाल्लेल्या अन्नाचा दुष्परिणाम शरीराला सहन करावा लागणार नाही. व्यवस्थित पचनक्रिया होईल.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य