Join us   

अंग मोडतंय? असह्य त्रास होतो? नसांचा कमकुवतपणा दुर्लक्ष करू नका, ५ व्हिटॅमिन्सचा आहारात समावेश करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2023 11:54 AM

Best Nerve Supplements: 5 Top Nerve Health Support Vitamins नसांमध्ये ताकद उरली नाही की अंग मोडून निघतं, ५ पदार्थांनी मिळवा निरोगी आयुष्य

आपल्या शरीरात नसांचे जाळे पसरले आहे. या सर्व नसा मिळून मज्जासंस्था तयार होते. ज्यामुळे रक्तपुरवठा सुरळीत होतो. जे शरीराच्या प्रत्येक हालचालींसाठी आवश्यक आहे. चांगल्या आरोग्यासाठी मजबूत नसा आवश्यक आहे. ज्यामुळे शरीराला इतर कामं करण्यासाठी ताकद मिळते. जर आपल्या नसा निरोगी असतील तर, मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉल, यांसारख्या आजारांचा धोका कमी होतो.

पण काहीवेळेला योग्य आहार न घेणे किंवा इतर कारणांमुळे नसा कमकुवत होतात. आपल्या शरीरात अनेक व्हिटॅमिन्सची कमतरता असते. ती भरून काढण्यासाठी जीवनसत्त्वांची गरज आपल्या शरीराला असते. यासंदर्भात, दिल्लीस्थित AIIMS चे न्यूरोलॉजिस्ट आणि आरोग्य प्रशिक्षक प्रियांका शेरावत यांनी, नसा मजबूत करणाऱ्या ५ जीवनसत्त्वांची नावे आणि स्रोत सांगितले आहेत(Best Nerve Supplements: 5 Top Nerve Health Support Vitamins).

५ जीवनसत्वे जे नसा मजबूत करतात

व्हिटॅमिन बी १२

आपल्या शरीरात व्हिटॅमिन्सची गरज भासते. ज्यात व्हिटॅमिन बी १२ हे जीवनसत्वे मज्जातंतूच्या बळकटीसाठी आवश्यक आहे. या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे, नसांचे कार्य कमकुवत होते. हे जीवनसत्व मिळवण्यासाठी मशरूम आणि पालक खा.

स्ट्रेस वाढल्याने खरंच वजन वाढतं का? तणाव आणि वजनाचे कनेक्शन काय? तज्ज्ञ सांगतात..

व्हिटॅमिन बी ९

व्हिटॅमिन बी ९, ज्याला फॉलिक अॅसिड दखील म्हणतात. गर्भाच्या मज्जासंस्थेच्या विकासासाठी हे आवश्यक आहे. त्यामुळे नसा कमकुवत होवू नये असं वाटत असल्यास, हिरव्या पालेभाज्या, सोयाबीन, काळे बीन्स आणि किवी खा.

​व्हिटॅमिन ई

तिसरा आवश्यक पोषक घटक म्हणजे, ​व्हिटॅमिन ई​. डॉक्टरांच्या मते, ​व्हिटॅमिन ई​च्या कमतरतेमुळे नसाही कमकुवत होऊ शकतात. शरीरात ​व्हिटॅमिन ई वनस्पती तेल, बदाम, अक्रोड, किवी खाऊन मिळवता येईल.

तरुणांचे हृदय कमकुवत होतंय? तज्ज्ञ सांगतात ६ कारणं, बघा तुमचं हार्ट धडधाकट आहे का...

​व्हिटॅमिन बी ६ आणि व्हिटॅमिन बी १

​व्हिटॅमिन बी ६ आणि व्हिटॅमिन बी १​ या पोषक तत्वांचा उपयोग, शरीरातील नसा मजबूत करण्यासाठी होतो. केळी, शेंगदाणे, हिरव्या पालेभाज्या इत्यादी व्हिटॅमिन B6 चे उत्तम स्रोत आहेत. व्हिटॅमिन बी १ च्या कमतरतेवर मात करण्यासाठी, दलिया आणि हिरव्या पालेभाज्या खा.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यलाइफस्टाइल