गव्हाचं पीठ हे दैनंदिन आहाराचा महत्त्वाचा भाग. रोजच्या पोळीपासून ते पराठा, थालीपीठ, भाकरीपासून इतर अनेक पदार्थांमध्ये याचा वापर केला जातो.(Vitamin D foods) सध्याच्या अनेक रासायनिक घटकांमुळे काही महत्त्वाचे पोषकतत्व कमी होत चालले आहे. त्यात विशेषत: Vitamin D आणि Vitamin B12 हे दोन घटक बहुतेक भारतीय घरांमध्ये कमी प्रमाणात आढळतात.(Vitamin B12 foods) हाडांना, स्नायूंना आणि गट हेल्थला आवश्यक असलेली ही व्हिटॅमिन्स शरीराला रोजच्या आहारातून मिळावीत, यासाठी सोपी आणि घरच्या घरी करता येणारी ट्रिक पाहूया. ज्यामुळे गव्हाच्या पीठात दोन नैसर्गिक आणि पोषणसमृद्ध गोष्टी मिळू शकतात.(Wheat flour health benefits) शरीरात Vitamin B12 कमी झालं तर अशक्तपणा दिसून येतो. ज्यामध्ये स्नायू आणि सांधेदुखी, हातपाय सुन्न होणे, संतुलन बिघडणे, स्मरणशक्ती कमी होणे, वारंवार आजारी पडणे आणि झोपेचा त्रास सतावू लागतो. अनेकदा आपण या लक्षणांकडे दुर्लक्ष करतो. (Gut health improvement)
ढाबा स्टाईल दाल तडका - जीरा राईस, फक्त १५ मिनिटांत, मऊ-मोकळा भात करण्यासाठी टिप्स
व्हिटॅमिन डी हे सूर्यप्रकाशातील जीवनसत्त्व म्हणून ओळखले जाते. हे जीवनसत्त्व हाडे आणि दातांचे संरक्षण करते. रोगप्रतिकारशक्ती सक्रिय करुन मानसिक आरोग्य सुधारते. या सर्व कमतरता दूर करण्यासाठी गव्हाच्या पिठामध्ये दोन पदार्थ मिसळून आपण त्याची चपाती खाऊ शकतो.
पोषणतज्ज्ञ संदीप गुप्ता म्हणतात व्हिटॅमिन डी आणि बी १२ ची नैसर्गिक कमतरता भरून काढण्यासाठी आपण गव्हाच्या पिठामध्ये भाज्यांची पेस्ट आणि दही घालू शकतो. हे पीठ रात्रभर झाकून ठेवा आणि सकाळी याच्या चपात्या करुन खा. ज्यामुळे आपल्या शरीराला भरपूर व्हिटॅमिन डी आणि बी १२ मिळेल.
पालक, भोपळा आणि दह्याचे मिश्रण एकत्र करुन हे गव्हाच्या पीठात घाला. रात्रभर हे पीठ तसेच ठेवून सकाळी या पिठाच्या पोळ्या बनवा. यामुळे शरीरात व्हिटॅमिन बी १२ आणि डी सगळ्यात जास्त मिळेल. तसेच हे आपल्या आतड्यांच्या आरोग्यासाठी देखील चांगले आहे. ज्यामुळे गट हेल्थही सुधारेल.
Web Summary : Enhance wheat flour with vegetable paste and yogurt to boost Vitamin D and B12. This strengthens bones, improves gut health, and combats deficiencies. Using spinach, pumpkin, and yogurt mixture ensures optimal nutrient absorption. Let the dough sit overnight for best results.
Web Summary : विटामिन डी और बी12 बढ़ाने के लिए गेहूं के आटे में सब्जियों का पेस्ट और दही मिलाएं। इससे हड्डियां मजबूत होती हैं, गट हेल्थ सुधरता है और कमियों से मुकाबला होता है। पालक, कद्दू और दही का मिश्रण पोषक तत्वों का अवशोषण सुनिश्चित करता है। सर्वोत्तम परिणामों के लिए आटे को रात भर रखें।