Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > बाम औषधांपेक्षा असरदार रामदेव बाबांनी सांगितला कंबरदुखी-पाठदुखीवर उपाय, दुखणं होईल छुमंतर

बाम औषधांपेक्षा असरदार रामदेव बाबांनी सांगितला कंबरदुखी-पाठदुखीवर उपाय, दुखणं होईल छुमंतर

Back pain relief: Lower back pain treatment: सतत एकाच जागी बसून राहता? पाठदुखी-कंबरदुखीचा त्रास वाढला? ही योगासने करा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2025 16:31 IST2025-11-21T16:30:01+5:302025-11-21T16:31:05+5:30

Back pain relief: Lower back pain treatment: सतत एकाच जागी बसून राहता? पाठदुखी-कंबरदुखीचा त्रास वाढला? ही योगासने करा.

Best natural home remedies for back pain recommended by Ramdev Baba Ayurvedic treatment for lower back pain without medicine How to cure chronic back pain naturally at Home | बाम औषधांपेक्षा असरदार रामदेव बाबांनी सांगितला कंबरदुखी-पाठदुखीवर उपाय, दुखणं होईल छुमंतर

बाम औषधांपेक्षा असरदार रामदेव बाबांनी सांगितला कंबरदुखी-पाठदुखीवर उपाय, दुखणं होईल छुमंतर

हिवाळा सुरु झाला की अनेक जुनी दुखणे नव्याने पुन्हा वर येतात. कंबरदुखी, पाठदुखी, स्नायूंचा ताण, सांधेदुखी हे सगळे त्रास वाढतात.(Home remedies for back pain) थंड वाऱ्यामुळे स्नायूंमध्ये कडकपणा येतो. शरीराची हालचाल कमी होते. ज्यामुळे वेदनांचा सामना करावा लागतो.(Ayurvedic remedy for back pain) अशावेळी आपल्यापैकी अनेकजण बाम, पेनकिलर, हीट जेल, स्प्रे किंवा औषधांचा आधार घेतात. पण हे उपाय तात्पुरतेच असतात.(Natural pain relief) दुखणं पुन्हा काही तासांनी डोके वर काढतं. त्यामुळे शरीराला अशा उपायांची गरज असते की ते मुळापासून आपल्याला आराम देतील. (Yoga for back pain)
आयुर्वेदात कंबरदुखी आणि पाठदुखीसाठी अनेक सोपे, घरगुती आणि नैसर्गिक उपाय सांगितले गेले आहेत. यामध्ये  योग गुरु रामदेव बाबा यांनीही काही अतिशय प्रभावी टिप्स आणि उपाय सुचवले आहेत. जे आपल्या शरीरातील वेदना कमी करण्यास, स्नायूंना सैल करण्यास आणि रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करतात. अनेक वेळा कंबरदुखीची मुख्य कारणे चुकीची बसण्याची पद्धत, सतत स्क्रीनसमोर बसणे, व्यायामाचा अभावा, कमजोर स्नायू आणि शरीरातील वातदोष. यावर उपाय केला तर दुखणं मोठ्या प्रमाणात कमी करता येतं तेही बाम, औषधं किंवा महागडे उपचार न करता.

पालकची भजी तेलकट-कडक होतात? सोपी ट्रिक- १० मिनिटांत होतील पालकची कुरकुरीत-खमंग भजी, सोपी रेसिपी

1. कंबरदुखी असो किंवा पाठदुखी ही समस्या सामान्य बनली आहे. जास्त वेळ एकाच जागी बसणे, चुकीची बसण्याची स्थिती किंवा थकवा हे त्याचे मुख्य कारण आहेत. बहुतेक लोक वेदना कमी करण्यासाठी बाम किंवा औषधांचा वापर करतात. दररोज काही मिनिटे योगा करुन आपण पाठदुखी आणि कंबरदुखीची समस्या कमी करु शकतो.

2. ताडासनामुळे पाठीच्या खालचे स्नायू ताणले जातात. त्यामुळे पाठीच्या कण्यातील लवचिकता सुधारते आणि वेदना कमी होतात. सरळ उभे राहून दोन्ही हात वर करा आणि हळूहळू पाठीचा कणा ताणा. दिवसातून ५ ते १० वेळा असेल केल्याने पाठदुखी कमी होते. 

3. भुजंगासनामुळे पाठीचे स्नायू बळकट होतात. पोट जमिनीवर ठेवून हळूहळू ते वर उचला आणि पाठ ताणा. या आसनामुळे केवळ वेदना कमी होतात. पचन आणि तणातणाव कमी होण्यासही मदत होते. त्यासाठी दररोज २ ते ३ मिनिटे सराव करा. 

4. शलभासनमुळे कंबर आणि मांड्यांचे स्नायू सक्रिय होतात. पोटावर झोपा आणि पाय वर करा. काही सेकंद धरून ठेवा. या व्यायामामुळे पाठीचा कणा मजबूत होतो आणि वेदनांपासून आराम मिळतो. ही योगासने रोज ५ ते १० मिनिटे केल्याने आपल्याला औषधांची गरज पडणार नाही. तसेच पाठदुखी, कंबरदुखीपासून आराम मिळेल. 

Web Title : बाम से ज़्यादा असरदार, रामदेव बाबा के कमर दर्द के उपाय।

Web Summary : योग गुरु रामदेव बाबा ने कमर दर्द के लिए आसान घरेलू उपाय बताए हैं, जिनमें गलत मुद्रा और व्यायाम की कमी जैसे कारणों को संबोधित किया गया है। ताड़ासन, भुजंगासन और शलभासन जैसे कुछ योगासन मांसपेशियों को मजबूत कर सकते हैं, लचीलापन बढ़ा सकते हैं और बाम या दवा पर निर्भर हुए बिना दर्द से राहत दिला सकते हैं।

Web Title : Ramdev Baba's effective remedies for back pain, better than balms.

Web Summary : Yoga guru Ramdev Baba suggests simple home remedies for back pain, addressing causes like poor posture and lack of exercise. Specific yoga poses like Tadasana, Bhujangasana, and Shalabhasana can strengthen muscles, improve flexibility, and alleviate pain without relying on balms or medication.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.