Join us
Daily Top 2 Weekly Top 5

तुम्हीही चहा-कॉफीसाठी डिस्पोजेबल कप वापरता? न्यूट्रिशनिस्टचा सल्ला- हे कप आरोग्यासाठी घातक, कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2025 12:32 IST

disposable cups health risk: paper cups harmful: डिस्पोजेबल कपमध्ये कॉफी किंवा चहा पिणं आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकत.

चहा किंवा कॉफी हे अनेकांसाठी अमृतासमान आहे. कागदी किंवा प्लास्टिकच्या कपमध्ये चहा-कॉफी पिणं आजच्या धावपळीच्या जगात अगदी सर्वसामान्य झालं आहे.(disposable cups health risk) ऑफिसमध्ये, कॉलेजमध्ये, प्रवासात, मीटिंगमध्ये किंवा छोट्या-छोट्या गाठीभेटीत हातातला डिस्पोजेबल कप हा जणू आपल्या रोजच्या जीवनाचा भागच झाला आहे.(paper cups harmful) आपल्याला हा कप वापरून फेकून देता येतो, स्वस्त असतो आणि कुठेही सहज उपलब्ध होतो, त्यामुळे त्याचा वापर झपाट्याने वाढत चालला आहे.(plastic cups side effects) पण या कपमध्ये कॉफी किंवा चहा पिणं आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकत.  प्रसिद्ध पोषणतज्ज्ञ शुखी छाब्रा यांनी याविषयी माहिती दिली.(tea coffee disposable cup dangers) हा कप कागदाचा बनलेला असला तरी यावर प्लास्टिकचा थर असतो. ज्यामुळे त्यातून लवकर लिक्विड गळू नये. पण यात गरम कॉफी किंवा चहा ओतल्याने यातील प्लास्टिक वितळू लागते, ज्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. 

वयाच्या चाळिशीतही दिसाल मॉर्डन अन् ट्रेंडी! प्रत्येक महिलेकडे हव्याच ५ साड्या, दिसाल एकदम क्लासिक

गरम पेय हे प्लास्टिकला लगेच प्रतिक्रिया देतात. या कपच्या आतून हजारो मायक्रोप्लास्टिक्स पेयाच्या मार्फत आपल्या शरीरात प्रवेश करतात. ज्यामुळे आरोग्याच्या अनेक तक्रारी वाढू शकतात. पोषणतज्ज्ञांच्या मते मायक्रोप्लास्टिक्स फक्त पोटातच जात नाहीत तर रक्तप्रवाहात थेट प्रवेश करतात. ज्यामुळे आपल्याला हार्मोनल असंतुलन, महिलांमध्ये इस्ट्रोजनची पातळी वाढणं, शरीरात जळजळ वाढणं, आतड्यांचे आरोग्य बिघडते. ज्यामुळे पचनशक्ती कमकुवत होते. यामुळे आपली दीर्घकाळ चयापचय प्रभावित होते, ज्यामुळे वजन वाढणे किंवा कमी ऊर्जा यासारख्या समस्या उद्भवतात. 

कमी दर्जाच्या प्लास्टिकमध्ये BPA, स्टायरीन, फ्थॅलेट्स सारखी विषारी संयुगे असतात, जे आपल्या आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. यामुळे आपल्या रोजच्या वापरातील एका सवयीमुळे आपण नकळत शरीराला विष देत असतो. आपण काचेचा ग्लास, कप किंवा स्टीलच्या कपात कॉफी- चहा प्यायला हवी. 

English
हिंदी सारांश
Web Title : Disposable cups for tea, coffee? Nutritionist warns of health risks.

Web Summary : Disposable cups, lined with plastic, release microplastics into hot drinks, posing health risks. These microplastics can disrupt hormones, cause inflammation, and impair digestion. Nutritionists advise using glass or steel cups instead to avoid ingesting harmful toxins like BPA found in low-quality plastics.
टॅग्स : आरोग्य