Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > एकाच जागी बसून राहिल्यानं वाढतोय गंभीर हृदयविकारांचा धोका, डॉक्टरांचा हा सल्ला आता लगेच वाचा..

एकाच जागी बसून राहिल्यानं वाढतोय गंभीर हृदयविकारांचा धोका, डॉक्टरांचा हा सल्ला आता लगेच वाचा..

Sitting Is The New Smoking : एम्सच्या एक्सपर्टनुसार, लाइफस्टाईलसंबंधी अशाच अनेक चुकांमुळे भारतीय तरूणांमध्ये अनेक गंभीर हृदयरोगांचा धोका वाढत चालला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 10:38 IST2025-04-10T10:35:54+5:302025-04-10T10:38:35+5:30

Sitting Is The New Smoking : एम्सच्या एक्सपर्टनुसार, लाइफस्टाईलसंबंधी अशाच अनेक चुकांमुळे भारतीय तरूणांमध्ये अनेक गंभीर हृदयरोगांचा धोका वाढत चालला आहे.

AIIMS doctor warns young Indian's about silent heart crisis says Sitting Is The New Smoking | एकाच जागी बसून राहिल्यानं वाढतोय गंभीर हृदयविकारांचा धोका, डॉक्टरांचा हा सल्ला आता लगेच वाचा..

एकाच जागी बसून राहिल्यानं वाढतोय गंभीर हृदयविकारांचा धोका, डॉक्टरांचा हा सल्ला आता लगेच वाचा..

Sitting Is The New Smoking: सतत वेगवेगळ्या रिसर्चमधून डॉक्टर सांगत असतात की, आजकालच्या चुकीची लाइफस्टाईल, चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयी यांमुळे हृदयरोगांचा (Heart Disease) धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. यासाठी आणखी एक मोठी बाब कारणीभूत ठरते ती म्हणजे तासंतास एकाच जागी बसून काम करण्याची सवय किंवा काही न करता एका जागी बसून राहणे. एम्सच्या एक्सपर्टनुसार, लाइफस्टाईलसंबंधी अशाच अनेक चुकांमुळे भारतीय तरूणांमध्ये अनेक गंभीर हृदयरोगांचा धोका वाढत चालला आहे. मात्र, यात आणखी एक महत्वाचं कारण समोर येत आहे. ते म्हणजे 'सिटींग इज द न्यू स्मोकिंग'.

'सिटींग इज द न्यू स्मोकिंग' म्हणजे काय?

AIIMS मध्ये कार्डिओलॉजीचे प्रोफेसर डॉ. अंबुज रॉय सांगतात की, चुकीच्या लाइफस्टाईलसोबतच 'सिटींग इज द न्यू स्मोकिंग'. त्यामुळे भारतीय लोकांना एकाच जागी तासंतास बसून काम करण्याऐवजी, अनेक तास सोफ्यावर बसून टीव्ही, लॅपटॉप बघत बसण्याऐवजी दर 30 मिनिटांनी हालचाल केली पाहिजे किंवा वॉक केला पाहिजे. 

डॉक्टर पुढे म्हणाले की, 'नियमितपणे एक्सरसाईज करणं, पौष्टिक संतुलित आहार घेणं, कोलेस्टेरॉल, ब्लड शुगर, ब्लड प्रेशरचं नियमितपणे चेकअप करणं हृदय निरोगी ठेवण्यासाठी महत्वाच्या गोष्टी आहेत. याउलट स्मोकिंग, तंबाखू, अल्कोहोल आणि सुस्त लाइफस्टाईलमुळे भारतीयांमध्ये कार्डिओवस्कुलर डिजीजचा धोका वाढवण्यास कारणीभूत ठरतात'.

जास्त वेळ बसण्याचे इतरही नुकसान

एकंदर सांगायचा मुद्दा म्हणजे एकाच जागी बसून तासंतास काम करणं आरोग्यासाठी तेवढंच नुकसानकारक आहे जेवढं स्मोकिंग करतं. इतकंच नाही तर जास्त बसून राहिल्यानं पायांची शक्ती कमी होते. तसेच कंबरदुखी, पाठदुखी, मानदुखी अशा समस्याही होतात. पुढे जाऊन शरीरातील इतर अवयवही प्रभावित होतात.

काय करू शकता उपाय?

जसे की, डॉक्टरांनी वर सांगितलं एकाच जागी बसून राहण्याचं काम असेल तर दर 30 मिनिटांनी जागेवरून उठा आणि 3 मिनिटं वॉक करा किंवा उभे रहा.

दिवसभर हालचाल करत रहा. कोणत्याही प्रकारची अॅक्टिविटी तुम्ही करू शकता. पायांची हालचाल किंवा बसल्याजागी हलक्या एक्सरसाईज करा.

ऑफिसमध्ये जाण्यासाठी लिफ्टऐवजी पायऱ्यांनी चढा आणि उतरा.
तुम्हाला जवळच कुठे जायचे असेल तर गाडीऐवजी पायी चाला.

Web Title: AIIMS doctor warns young Indian's about silent heart crisis says Sitting Is The New Smoking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.