जरा काही खाल्ले की आपले पोट फुगते किंवा गॅसेसच्या समस्या होतात. अपचनाची समस्या ही सामान्य असली तरी सतत असं होणं आरोग्यासाठी त्रासदायक ठरतं.(Ayurvedic drink for gas and bloating) या समस्यांमुळे आपल्याला अनेकदा खाण्याची इच्छा होत नाही. कधीकधी समस्या इतकी वाढते की, आपल्याला श्वास घ्यायला देखील त्रास होतो. (Home remedies for acidity)
वारंवार पोट फुगण्याची समस्या किंवा गॅसेस होत असेल तर आपण आरोग्याकडे लक्ष द्यायला हवे.(Instant relief from gas and bloating) बदलेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, अपुरी झोप, जंक फूड आणि वेळवर न खाणे यामुळे आपल्याला अपचनाचा- गॅसेसचा त्रास होतो.(Natural remedies for indigestion) या समस्या टाळण्यासाठी आपण वेळेवर जेवायला हवे.(Ayurvedic home remedies for bloating after eating) तसेच आपल्या खाण्याच्या प्रमाणाकडे देखील लक्ष द्यायला हवे. सतत बाहेरचे पदार्थ खाल्ल्याने आपल्या पोटावर त्याचा नकारात्मक परिणाम होतो.(How to get instant relief from stomach gas) जर आपल्यालाही वारंवार पोटदुखी, बद्धकोष्ठता किंवा गॅसेसचा त्रास होत असेल तर आयुर्वेदिक ड्रिंक प्या, ज्यामुळे रोजचा त्रास कमी होण्यास मदत होईल.
शेवग्याची शेंगच नाही तर सालं देखील फायदेशीर! रोज प्या शेवग्याचा चहा, वजन होईल भरभर कमी
प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टर सलीम झैदी यांनी त्यांच्या युट्यूब चॅनेलवर व्हिडिओ शेअर केला आहेत. ते म्हणतात की, गॅस- अपचन सारख्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आपण अनेक औषधे खातो. परंतु, यामुळे आपल्याला आराम मिळत नाही. या समस्येवर आपण नैसर्गिक पद्धतीने आराम मिळवू शकतो. त्यासाठी एक खास आयुर्वेदिक पेय बनवून पिऊ शकता.
पेय कसे बनवाल?
1. हे पेय बनवण्यासाठी आपल्याला ४ हिरवी वेलची, १ चमचा बेडीशेप आणि १ चमचा जिरे घ्यावं लागेल.
2. हे तिन्ही पदार्थ पाण्यात उकळवून घ्या. पाणी अर्धे झाले की, गाळून घ्या आणि कोमट झाल्यावर प्या.
आयुर्वेदिक ड्रिंकचे फायदे
1. बडीशेपमध्ये आढळणारे संयुगे हे गॅस्ट्रिक एंजाइम्स्ना चालना देण्यास मदत करतात. यामुळे पचन सुधारते आणि पोट फुगण्याच्या समस्येपासून आराम मिळतो.
2. वेलची खाल्ल्याने अन्न लवकर पचते. यामुळे आपल्याला पोटदुखी, गॅस, अपचन आणि ॲसिडीटी सारख्या समस्यांपासून आराम मिळतो.
3. जिरे हे चांगले पचन होण्यासाठी सुपरफूड आहे. हे आपल्या पाचक एंजाइम्सच्या स्त्रावाला उत्तेजित करते. ज्यामुळे पोट फुगण्याच्या समस्येपासून आराम मिळतो.