Join us   

Advantages Of Drinking Water Without Brushing : सकाळी उठल्यावर ब्रश न करता पाणी प्यावं का? तज्ज्ञ सांगतात ४ फायदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2022 5:17 PM

Advantages Of Drinking Water Without Brushing : उठल्यावर ब्रश करुन पाणी प्यावे की ब्रश न करता पाणी प्यावे असा प्रश्न आपल्यातील अनेकांना असतो, त्याविषयी...

ठळक मुद्दे तोंडाच्या दुर्गंधीची समस्या आहे, अशा लोकांनी सकाळी उठून ब्रश न करता एक ग्लास कोमट पाणी प्यावे.ब्रश न करता काही खाऊ किंवा पिऊ नये असा आपल्याकडे चुकीचा समज आहे, पण उलट ब्रश न करता तोंडातील लाळ पोटात घेतल्यास त्याचा आरोग्याला फायदा होतो.

झोपेतून उठल्यावर आपण सगळ्यात आधी ब्रश करतो आणि मगच पाणी पितो. सकाळी उठल्यावर आपल्या तोंडाला एकप्रकारचा वास येत असतो. हा वास जाण्यासाठी आपण सगळ्यात आधी ब्रश करतो. पण अशाप्रकारे ब्रश केल्यामुळे तोंडात रात्रभर असलेली लाळ आणि त्यातील जीवाणू मरतात. ही लाळ आपल्या आरोग्यासाठी अतिशय चांगली असते असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. परदेशात काही ठिकाणी लोक सकाळी उठल्यावर ब्रश न करता पाणी तर पितातच पण नाश्ताही करतात. या लाळेचा आरोग्याला फायदा होत असल्याने ती वाया घालवण्यापेक्षा गिळणे आपल्या फायद्याचे असते. (Advantages Of Drinking Water Without Brushing) त्यामुळे झोपेतून उठल्या उठल्या तुम्हालाही आधी ब्रश करायची सवय असले तर त्याआधी ग्लासभर पाणी प्या आणि मगच ब्रश करा. असे करण्याचे काय फायदे होतात पाहूया...

(Image : Google)

१. पचनशक्ती सुधारते

सकाळी ब्रश न करता पाणी प्यायल्याने आपली पचनशक्ती वाढते, त्यामुळे आपण दिवसभरात खाल्लेले अन्न चांगल्या पद्धतीने पचण्यास मदत होते. याशिवाय सकाळी ब्रश न करता पाणी प्यायल्याने शरीरातील अनेक प्रकारचे आजार दूर होतात. असं केल्याने बॉडी डीटॉक्स व्हायला मदत होते आणि शरीरातील विषारी किंवा अनावश्यक घटक बाहेर पडण्यास मदत होते. 

२. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त 

सकाळी ब्रश न करता पाणी प्यायल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. हिवाळ्यात, खोकला किंवा सर्दी यांसारख्या आजारांची लक्षणे दिसू लागतात. अशावेळी घशातील विषाणू घशात न राहता खाली जाऊन त्यांचा निचरा होण्यासाठी सकाळी उठल्या उठल्या आधी कोमट पाणी प्यावे म्हणजे व्हायरल इन्फेक्शनपासून आपली सुटका होऊ शकते. 

३. त्वचा चमकदार होते तर केसांचा पोतही सुधारतो

रिकाम्या पोटी पाणी प्यायाल्याने केसांच्या मूळांतील रक्तप्रवाह वाढतो, यामुळे केस वाढण्यास मदत होते. सकाळी पाणी प्यायल्याने पचनसंस्था स्वच्छ होण्यास मदत होते. पोट साफ असेल तर साहजिकच मुरुमांचा त्रास होत नाही. पाण्यामुळे शरीरातील अनावश्यक घटक बाहेर पडतात आणि त्वचा चांगली राहण्यास मदत होते.  

(Image : Google)

४. तोंडाची दुर्गंधी दूर होते

ज्या लोकांना तोंडाच्या दुर्गंधीची समस्या आहे, अशा लोकांनी सकाळी उठून ब्रश न करता एक ग्लास कोमट पाणी प्यावे. रात्रभर तोंडात लाळेची निर्मिती तुलनेने कमी होते. त्यामुळे आपले तोंड पूर्णपणे कोरडे होते. तोंडात लाळेच्या कमतरतेमुळे जीवाणू तयार होतात आणि तोंडाला वास येतो. त्यामुळे सकाळी उठून एक ग्लास कोमट पाणी प्यायल्यास या समस्येपासून सुटका मिळेल.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सलाइफस्टाइल