Join us   

दृष्टी सुधारते-कोलेस्टेरॉल कमी करते! रोज खा काळे मनुके; आरोग्य सुधारेल-हाडंही मजबूत होतील..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2024 2:08 PM

6 Health Benefits of Black Raisins : काळे मनुके खा गंभीर आजारांचा धोका टाळा, पण मनुके कधी खावे?

ड्रायफ्रुट्स खाल्ल्याने आरोग्याला बराच फायदा होतो. बदाम, काजू, पिस्ता यासह काळे मनुक्यांमधील पौष्टीक घटक गंभीर आजारांचा धोका कमी करतात. मनुक्यांमध्येही दोन प्रकार आहेत (Black Raisins). त्यातील काळे मनुके खाण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञ देतात. विशेषतः महिलांचे अनेक आरोग्याच्या निगडीत समस्या सोडवण्यास काळे मनुके मदत करतात (Health Benefits).

त्यात आयर्न, पोटॅशियम, कॅल्शियम आणि फायबर यांसारखे गुणधर्म आढळतात. जे हाडं आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी पुरेपुरे फायदेशीर ठरते. शिवाय त्यात अँटी-ऑक्सिडेंट, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-व्हायरल गुणधर्म मुबलक प्रमाणात असते. पण काळ्या मनुक्यांचा आहारात समावेश कसा करावा? काळे मनुके खाल्ल्याने आरोग्याला किती फायदा होतो? पाहूयात(6 Health Benefits of Black Raisins).

काळे मनुके खाण्याचे फायदे

रोगप्रतिकारशक्ती मजबूत करते

काळ्या मनुक्यांमध्ये मुबलक प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे आढळते. याच्या नियमित सेवनाने रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. मुख्य म्हणजे बदलत्या ऋतूमुळे होणारे आजार, शिवाय संसर्गापासून शरीराचे संरक्षण करते. ज्यामुळे बदलत्या ऋतूमुळे होणाऱ्या आजारांपासून आपला बचाव होतो. 

डाळ-तांदूळ कशाला? कपभर सोया चंक्स घ्या अन् वेट लॉस डोसा करा! क्रिस्पी डोसा-१० मिनिटात

उर्जा वाढते

काळ्या मनुक्यांमध्ये ग्लुकोज आणि फ्रक्टोज सारखे नैसर्गिक उर्जा प्रदान करणारे गुणधर्म असतात. शिवाय यामुळे मनुक्यांमध्ये नैसर्गिक गोडवा येतो. हे दोन्ही घटक गुल्कोजची पातळी राखतात, ज्यामुळे दिवसभर काम करण्याची आपल्याला उर्जा मिळते.

अशक्तपणावर मात

काळ्या मनुक्यांमध्ये आयर्नचे प्रमाण जास्त असते, आणि आयर्न लाल रक्त पेशींच्या निर्मितीसाठी मदत करते. त्यामुळे जर आपल्या शरीरात कमतरता असेल किंवा होऊ नये असे वाटत असेल तर, नियमित ५ ते ६ काळे मनुके खा. यामुळे आयर्नच्या कमतरतेमुळे होणारी अॅनिमियाचा त्रास कमी होईल.

दृष्टी सुधारते

काळ्या मनुक्यांमध्ये इतर पौष्टीक घटकांसोबत व्हिटॅमिन ए सह पॉलीफेनॉलिक फायटोन्युट्रिएंट्ससारखे अँटी-ऑक्सिडंट्स आढळतात. ज्यामुळे दृष्टी सुधारते, आणि नजर तीक्ष्ण करण्यास मदत करते. ज्यांना चष्मा लागला आहे, त्यांनी नियमित काळे मनुके खावे.

'वो स्त्री है...' महिलेने सांगितलं साडी सावरत बस कशी पकडायची? नेटकरी म्हणाले..

हाडे मजबूत करते

काळ्या मनुक्यांमध्ये असलेले कॅल्शियम आणि बोरॉन हाडं मजबूत आणि हाडांच्या निगडीत समस्या सोडवण्यास मदत करते. ऑस्टिओपोरोसिस आणि संधिवात होण्याता धोका  टळतो.

हृदय निरोगी राहते

काळ्या मनुक्यांमधील अँटी-ऑक्सिडंट्स बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यास आणि गुड कोलेस्टेरॉल वाढवण्यास मदत करते. ज्यामुळे ब्लड सर्क्युलेशन सुधारते आणि हृदय निरोगी राहते. 

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य