Join us   

पोट साफ होत नाही, जोर लावावा लागतो? बद्धकोष्ठतेवर घरगुती ५ उपाय, पोट होईल साफ-सकाळी एकदम ओके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2023 3:24 PM

5 home remedies to relieve constipation naturally : सद्गुरू सांगतात वेळीच पोटाची काळजी घ्या, अन्यथा होईल मुळव्याध..

बिघडलेली जीवनशैली, खाण्याच्या वेळापत्रकात बदल, उलट सुलट खाण्यामुळे पोटाचे विकार (Stomach Health) वाढत जातात. मुख्य म्हणजे पोट व्यवस्थित साफ होत नाही. जर आपले पोट आठवड्यातील २ ते ३ दिवसही व्यवस्थित साफ होत नसेल तर, आपल्याला बद्धकोष्ठतेचा (Constipation) त्रास होईल हे समजून जा. काही लोकं अनेक वर्षांपासून या समस्येने ग्रासलेले आहेत. ज्यामुळे मूळव्याध होण्याचाही धोका वाढतो.

बद्धकोष्ठतेमध्ये आतड्यांमध्ये घाण साचते. ज्यामुळे पोट लवकर साफ होत नाही. ज्यामुळे शौचेच्या जागी जखम होऊन मूळव्याध (Piles) होण्याचा धोका वाढतो. या समस्येकडे वेळीच लक्ष न दिल्यास ऑपरेशन करण्याची देखील वेळ येते. जर यातून सुटका हवी असेल तर, अध्यात्मिक गुरू जग्गी वासुदेव (Sadhguru jaggi vasudev) यांनी शेअर केलेल्या घरगुती ५ उपाय फॉलो करून पाहा. त्यांनी याबद्दलची माहिती आपल्या यूट्यूब चॅनेलवर शेअऱ केली आहे(5 home remedies to relieve constipation naturally).

पाण्याचे प्रमाण जास्त असणारे पदार्थ

सद्गुरूंनी फास्ट फूड्सला सुखं अन्न म्हटलंय. या पदार्थांमध्ये पाण्याचे प्रमाण खूप कमी असते. आपल्या अन्नात पाण्याचे प्रमाण जास्त असायला हवे. त्यामुळे फळ आणि भाज्या खा. भाज्यांमध्ये ७० टक्क्यांहून अधिक पाणी असते, तर फळांमध्ये ९० टक्क्यांहून अधिक पाणी असते. हेल्दी पदार्थ खाल्ल्याने नक्कीच आपल्याला पोटाचे विकार होणार नाही.

डाळ शिजताना त्यावर फेस तयार होतो? आरोग्यासाठी चांगला की वाईट? ठेवावा की फेकून द्यावा?

दोन जेवणांच्यामध्ये खाणं टाळा

अनेकांना सतत काही न काही खाण्याची सवय असते. पण ही सवय पोटाच्या आरोग्यासाठी चांगली नाही. एक जेवण आणि दुसरं जेवण यामध्ये पुरेसं अंतर ठेवा. शिवाय नाश्ता आणि दुपारच्या जेवणामध्येही अंतर ठेवा. यामुळे आपल्याला बद्धकोष्ठतेचा त्रास होणार नाही, व सकाळी व्यवस्थित पोटही साफ होईल.

तुपाने करा दिवसाची सुरुवात

भारतीय पदार्थांमध्ये तुपाचा वापर होतोच. तुपामुळे वेट लॉस, त्वचा, केस आणि पोटाचे विकार दूर होतात. तूप खरंतर एक ल्युब्रिकेंट आहे, जे डायजेस्टिव्ह सिस्टममधील अन्न पुढे पास करण्यासाठी चिकटपणा देते. त्यामुळे दिवसाची सुरुवात एक चमचा तुपाने करण्याचा सल्ला सद्गुरूंनी दिला आहे. दररोज एक चमचा तूप खाल्ल्याने खाणं पचण्याचा मार्ग सोपा होतो.

१ चमचा मध रोज खा, चेहऱ्यावर येईल ग्लो-वजन होते कमी; वाढत्या वजनावरुन टोमणे होतील बंद

कडूलिंब आणि हळद

जर पोट व्यवस्थित साफ होत नसेल तर, कडूलिंब आणि हळदीचा वापर करून गोळे तयार करा. तयार गोळे रोज सकाळी खा. या उपायामुळे पचनक्रिया सुधारेल. शिवाय पोटातील मायक्रो हानिकारक बॅक्टेरिया नष्ट होतील.

१ चमत्कारी उपाय

सद्गुरुंनी आवळा, बहेडा आणि हरितकी या फळांना चमत्कारी फळ म्हटलंय. हे तिन्ही पदार्थ एकत्र मिसळल्यास त्रिफळा तयार होते. आपण या पावडरचे सेवन दूध किंवा मधासोबत करू शकता. त्यातील गुणधर्मांमुळे पचनक्रिया सुधारते. आपण एरंडेल तेलाचे देखील सेवन करू शकता. रोज रात्री एरंडेल तेल थोडेसे गरम करून पाण्यात किंवा दुधात घालून पिऊ शकता. यामुळे पोट साफ होईल.

टॅग्स : जग्गी वासुदेवहेल्थ टिप्सआरोग्य