Join us

नजर तेज हवी, डोळ्यांना चष्मा नको? आहारात हवेतच ५ पदार्थ, डोळे सांभाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2023 16:14 IST

5 Foods That Are Good for Your Eyes नजर कमजोर होण्यापूर्वी डोळे देतात संकेत, डोळ्यांची दृष्टी वाढवायची असेल तर, आहारात समावेश करा ५ पदार्थ

आपल्या शरीरातील सर्वात नाजूक अवयव म्हणजे डोळे. सध्या लोकांमध्ये स्क्रीन टायमिंग वाढत चाललं आहे. ज्यामुळे डोळ्यांची दृष्टी कमी होत चालली आहे. दृष्टी कमजोर होण्यापूर्वी डोळे काही संकेत देतात. डोळे दुखणे, पाणावलेले डोळे, कोरडे डोळे, दूरची दृष्टी कमी होणे, जवळ दिसण्यात अडचण, डोकेदुखी, या समस्या निर्माण होतात. ही लक्षणे वेळीच ओळखून डोळ्यांवर उपचार केल्यास डोळ्यांचा त्रास पुन्हा उद्भवणार नाही.

आहारतज्ज्ञ मनप्रीत यांनी डोळ्यांची दृष्टी तीक्ष्ण करण्यासाठी, काही गोष्टींचा आहारात समावेश करणे गरजेचं आहे, असं सांगितलं आहे. या आहारातून डोळ्यांची दृष्टी वाढण्यास मदत होईल. व डोळ्यांच्या समस्या देखील कमी होतील(5 Foods That Are Good for Your Eyes).

दृष्टी तीक्ष्ण करण्यासाठी काय खावे?

रताळे आणि बदाम

डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी सकाळी बदाम व सायंकाळी रताळे खा.  आहारतज्ज्ञांच्या मते, नाश्ता करण्यापूर्वी भिजवलेले बदाम, व सायंकाळी नियमित रताळे खा. यामुळे डोळ्यांची दृष्टी तीक्ष्ण होते.

संत्री व गाजर

आहारात संत्री आणि गाजराचा समावेश करा. संत्री आणि गाजराचा ज्यूस प्यायल्याने डोळ्यांची समस्या कमी होते. यातील गुणधर्म नजर तीक्ष्ण करण्यास मदत करते. आपण जेवणादरम्यान संत्र्याचा रस आणि संध्याकाळी गाजराचा रस पिऊ शकता.

उन्हाळ्यात पिवळंट रंगाची लघवी होते? हा आजार की गंभीर आजाराची लक्षणे..

सूर्यफुल आणि मेथीचे दाणे

आहारात सूर्यफूल आणि मेथीच्या दाण्यांचा समावेश करा. आपण  सकाळी रिकाम्या पोटी मेथीच्या दाण्यांपासून तयार पाणी पिऊ शकता. किंवा सॅलड आणि स्मूदीमध्ये सूर्यफुलांच्या बिया टाकू शकता.

पालक व बीटरूट

दुपारच्या जेवणात पालक करी किंवा चीला जरूर खा, कारण हिरव्या पालेभाज्यांमध्ये डोळे तीक्ष्ण करणारे गुणधर्म आढळतात. नाश्त्यापूर्वी बीटरूट किंवा आवळा-बीटरूट रायता खा, हे पदार्थ डोळ्यांसाठी उत्तम मानले जातात.

ना एसी ना फॅन फक्त एक आयुर्वेदिक ड्रिंक, भर उन्हाळ्यातही शरीर राहील कुल - हायड्रेट

शेंगदाणे आणि हिरवे वाटाणे

संध्याकाळी मूठभर शेंगदाणे खाल्ल्याने दृष्टी सुधारते. त्याचबरोबर हिरवे वाटाणे खाल्ल्याने डोळ्यांच्या अनेक समस्या सुटतात. आपण मटार आणि शेंगदाण्यांचा वापर इतर पदार्थात करू शकता.

टॅग्स : डोळ्यांची निगाहेल्थ टिप्स