चष्मा आता खूपच कॉमन झाला आहे. वय वाढलं की चष्मा लागतो... असा एकेकाळचा नियम आता आपण पार विसरून गेलो आहोत. अगदी प्राथमिक विभागातल्या विद्यार्थ्यांनाही आता चष्मा लागलेला असतो. स्क्रिनचा वाढलेला वापर, आहारात पौष्टिक पदार्थांचा अभाव ही त्यामागची काही कारणं आहेत. मोठ्या माणसांनाही कामाच्या निमित्ताने सतत स्क्रिन पाहावी लागते. त्याचाही डोळ्यांना त्रास होतो आणि डोळ्यांचा नंबर वाढतो (4 exercises to reverse weak eyesight). म्हणूनच पुढे सांगितलेले काही व्यायाम दररोज करून पाहा. या व्यायामांमुळे दृष्टी चांगली होण्यास निश्चितच मदत होईल.(how to improve eye sight?)
दृष्टी चांगली होण्यासाठी डोळ्यांचे कोणते व्यायाम करावे?
दृष्टी चांगली राहण्यासाठी कोणते व्यायाम केले पाहिजेत, याविषयीची माहिती सांगणारा व्हिडिओ डॉक्टरांनी triaanyashealthmantra या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.
१. यामध्ये सांगितलेला पहिला व्यायाम म्हणजे नाकाने दिर्घ श्वास घ्या आणि तो जलद गतीने नाकानेच बाहेर सोडा. असं साधारण २० वेळा करावे.
कॅन्सरचा धोका कमी करणारे ७ पदार्थ रोजच खा, कॅन्सर सेल्सची वाढही होईल कमी
२. यानंतरचा दुसरा व्यायाम म्हणजे नाकाने दिर्घ श्वास घ्या आणि तो तोंडावाटे सोडा. ही क्रियादेखील २० वेळा करावी.
३. यानंतर दिर्घ श्वास घ्या आणि तुम्हाला शक्य होईल तेवढा वेळ तसेच राहा. त्यानंतर हळूहळू श्वास सोडा. असं साधारण ५ ते १० वेळा करा.
४. नजर चांगली होण्यासाठी नियमितपणे भ्रामरी प्राणायाम करणेही खूप फायदेशीर ठरते. यासाठी दोन्ही हातांचे अंगठे कानावर ठेवून कान बंद करा. यानंतर करंगळी, अनामिका आणि मधले बोट डोळ्यांवर ठेवून डोळे बंद करा. दोन्ही हातांच्या तर्जनी कपाळावर ठेवून डोळे बंद करा.
पाण्यात उकळलेल्या हिरव्या मिरच्यांची झणझणीत चटणी! मिळमिळीत जेवणाला रंगत आणणारा चवदार पदार्थ
दिर्घ श्वास घ्या. डोळे बंद करा आणि हम्म्म असा आवाज काढत हळूवारपणे श्वास सोडा. अशा पद्धतीने सकाळी १० वेळा आणि संध्याकाळी १० वेळा प्राणायाम करावे. वरील सगळे व्यायाम नियमितपणे केल्यास काही दिवसांतच दृष्टी चांगली झाल्यासारखे जाणवेल.