Join us
Daily Top 2 Weekly Top 5

Summer Special: उसाच्या रसाविषयीचे ३ मोठे गैरसमज, रणरणत्या उन्हात वाट्टेल तेव्हा रस पिण्याआधी 'हे' वाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2026 16:16 IST

3 Big Misuderstandings About SugarCane Juice: उन्हाळ्यामध्ये रसवंती गाठून वाटेल तेव्हा उसाचा रस पित असाल तर हे एकदा वाचाच...(who should avoid drinking sugar cane juice?)

फेब्रुवारी महिना संपत आला की ठिकठिकाणी रसवंती उभ्या राहू लागतात. खरंतर उन्हाळा आता सुरू झाला आहे, याची जाणीवही बऱ्याचदा रसवंतीमुळेच व्हायला लागते. उसाचा रस हा अनेकांचा अतिशय आवडीचा पदार्थ. काही जणं तर उन्हाळ्यात अगदी सकाळ- संध्याकाळ उसाचा रस घेतात. दुपारी रणरणत्या उन्हात घराबाहेर पडण्याची वेळ आलीच, तर अशावेळी हमखास उसाचा रस पिण्याची इच्छा होते. आवडत असेल तर उन्हाळ्यात उसाचा रस नक्की प्या. पण तो तुम्ही समजता तेवढा हेल्दी मात्र आहे की नाही याविषयी शंकाच आहे. आहारतज्ज्ञांनी उसाच्या रसाविषयीचे काही गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. बघा तुमचंही तेच मत आहे का (Summer Special SugarCane Juice)

 

उसाचा रस पिण्याआधी 'या' काही गोष्टी लक्षात ठेवाच...

१. बऱ्याचदा असं सांगितलं जातं की सनस्ट्रोक किंवा हिटस्ट्रोकचा त्रास होऊ नये म्हणून उसाचा रस उपयुक्त ठरतो. पण असं काहीही नाही. उसाचा रस प्यायल्याने उष्माघाताचा त्रास होत नाही, यात काही तथ्य नाही.

केस झाडूसारखे कोरडे, रुक्ष झाले? १ सोपा उपाय- ८ दिवसांत केस होतील रेशमासारखे मऊ- सुळसुळीत

२. काही जणांच्या मते उसाचा रस म्हणजे नैसर्गिक पद्धतीने बॉडी डिटॉक्स करण्याचा एक चांगला पर्याय आहे. पण असं नाही. उसाचा रस पिऊन शरीर डिटॉक्स होत नाही.

३. काविळचा त्रास कमी करण्यासाठी उसाचा रस अजिबात उपयोगी ठरत नाही. त्यामुळे उसाचा रस आणि काविळ किंवा लिव्हरचे आरोग्य यांचा काहीही संबंध नाही..

 

उसाच्या रसामुळे 'या' गोष्टींचा त्रास होण्याचा धोका

१. उसाच्या रसामध्ये साखरेचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे मधुमेह असणाऱ्या लोकांनी उसाचा रस जपूनच प्यायला हवा. उसाचा ग्लासभर रस नेहमीच पित असाल तर त्यामुळे रक्तातली साखर वाढू शकते.

वय वाढलं तरी राहाल धडधाकट आणि फिट! सकाळी उठल्यावर ३ गोष्टी करा, वजनही राहील कंट्रोलमध्ये

२. हल्ली उसाच्या रसामध्ये गोड पाणी किंवा बर्फ मिसळला जातो. पुर्णपणे शुद्ध उसाचा रस आपल्यापर्यंत येत नाही. अशावेळी उसाचा रस पिऊन पाण्यामधून होणारे डायरियासारखे आजार होण्याचा धोकाही असतोच.. उसाच्या रसाविषयीची ही सगळी माहिती आहारतज्ज्ञांनी amitagadre या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Sugarcane Juice: Myths and Risks to Know This Summer

Web Summary : Sugarcane juice, a popular summer drink, is often misunderstood. It doesn't prevent heatstroke or detox the body, and it's not helpful for jaundice. High sugar content poses risks for diabetics, and unhygienic preparation can cause diarrhea. Consume wisely!
टॅग्स : आरोग्यसमर स्पेशलऊसमधुमेह