>आरोग्य >वंध्यत्व > PCOS ही समस्या नेमकी काय? PCOSमुळे वंध्यत्व येण्याचा धोका असतो?

PCOS ही समस्या नेमकी काय? PCOSमुळे वंध्यत्व येण्याचा धोका असतो?

PCOS ही समस्या जीवनशैली आणि अनुवंशिकता दोन्हीमुळे निर्माण होते, त्यामुळे वेळीच काळजी घ्या.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2021 06:56 PM2021-12-03T18:56:07+5:302021-12-03T18:59:08+5:30

PCOS ही समस्या जीवनशैली आणि अनुवंशिकता दोन्हीमुळे निर्माण होते, त्यामुळे वेळीच काळजी घ्या.

What exactly is PCOS? Is PCOS a risk factor for infertility? what's treatment | PCOS ही समस्या नेमकी काय? PCOSमुळे वंध्यत्व येण्याचा धोका असतो?

PCOS ही समस्या नेमकी काय? PCOSमुळे वंध्यत्व येण्याचा धोका असतो?

Next
Highlightsआई होण्याची इच्छा असलेल्या अनेकींना पीसीओएसमुळे गर्भधारणेस अडचणी येतात. ते कशामुळे होते. 

डॉ. ऋषिकेश पै

आजकाल बऱ्याच तरुण मुलींमध्ये PCOS ची मोठी समस्या दिसते. जीवनशैलीमुळे तर पीसीओएस (PCOS) होतोच पण अनेकदा काहींना अनुवांशिक घटकांमुळे होतो. आई होण्याची इच्छा असलेल्या अनेकींना पीसीओएसमुळे गर्भधारणेस अडचणी येतात. ते कशामुळे होते. 

PCOS म्हणजे काय?


पॉलीसिस्टिक ओव्हरीज सिंड्रोम (पीसीओएस) ही महिलांमध्ये प्रजननक्षमतेच्या अंतःस्रावी समस्या आहे. आजकाल सुमारे ५-१० टक्के तरुण स्त्रिया या समस्येने त्रस्त असून, त्यामुळे त्यांना गर्भधारणेमध्ये अडचणी येतात. अनियमित मासिक पाळी, केसांची असामान्य वाढ, मुरुम तसेच ओवेरियन सीस्ट म्हणजे गर्भाशयात गाठ येणे यांसारखी लक्षणे दिसतात.

(Image : Google)

हा त्रास होतो कशाने?

पीसीओएस होण्यामागचे नेमके कारण काय, हा प्रश्न प्रत्येकांना पडला आहे. खरं तर अजूनतरी या समस्येचे ठोस कारण सांगता येत नसले तरी, ही समस्या अनुवंशिकता आणि जीवनशैलीमुळे उद्भवते. या संदर्भातील अभ्यासानुसार पीसीओएसग्रस्त महिलांमध्ये इन्शुलीन प्रतिरोधक प्रमाण जास्त असते. रक्तातील इन्शुलीनची पातळी वाढल्याने, गर्भाशय अधिक टेस्टोस्टेरॉन हे हार्मोन बाहेर काढतात. या अतिरिक्त टेस्टोस्टेरॉनमुळे अनियमित मासिक पाळी आणि केसांची अवांछित वाढ होते.  काही स्त्रियांमध्ये पीसीओएस शरीराच्या इतर संप्रेरकांमधील असंतुलनामुळे उद्भवते. पीसीओएस होण्याचे कारण माहित नसले, तरी त्याकाही ठळक लक्षणं दिसतात.

पी.सी.ओ.एस.ची लक्षण काय आहेत?


पीसीओएसमध्ये अँड्रोजनच्या (पुरुष हार्मोन्स)  अतिरिक्त प्रभावामुळे दुष्परिणाम होतात.  वजन वाढ, अनियमित मासिक पाळी, केसांची वाढ तसेच मुरुमांसारखी लक्षणे दिसू लागतात. 

पीसीओएसने वंध्यत्व येतं का?


पीसीओएसचा प्रजनन क्षमतेवर नकारात्मक परिणाम होतो.  पीसीओएसग्रस्त महिलांमध्ये स्त्री बीजाची उत्पत्ती होऊ शकत नाही. गर्भाशयामधील एस्ट्रोजेनच्या अतिउत्पादनामुळे, प्रजननासाठी महत्वपूर्ण असलेले बीजांडच जर नियमित तयार होत नसेल, तर गर्भधारणा अशक्य आहे.  
१.मासिक पाळी अनियमित. 
२. टेस्टोस्टेरॉनसारखे हार्मोन्सची पातळी वाढल्याने अंड्याची गुणवत्ता कमी होते. 
३. इन्शुलीन पातळी प्रतिरोधक समस्यांची वाढ. मधुमेहाचा धोका वाढतो. 

(Image : Google)

पीसीओएसग्रस्त स्त्री आई होऊ शकते का?

गर्भधारणा पीसीओएसमुळे अशक्य जरी असली तरी, काहीप्रमाणात प्रजनन तज्ज्ञांकडून उपचार घेता येतील.
पीसीओएसवर कोणताही उपचार नाही, परंतु, योग्य काळजी घेतली तर ही समस्या कमी होऊ शकते. 
उदाहरणार्थ, वजन कमी केल्याने काही प्रमाणात पीसीओएसची लक्षणे कमी होऊ शकतात. तसेच, कुटुंब नियोजन आणि अँटी-एंड्रोजनच्या गोळ्या घेतल्याने पीसीओएसच्या लक्षणांमध्ये सुधारणा येऊ शकतात. 
आपण गर्भधारणा करण्याचा प्रयत्न करीत असल्यास, पीसीओएस उपचारातील पहिली पायरी म्हणजे आपल्या जीवनशैलीत बदल घडवून आणणे, सकस आहार आणि व्यायामाचा त्यात समावेश करणे.
कर्बोदके आणि ग्लायसेमिकचा भार कमी करणारे जिन्नस आहारात केव्हाही चांगले!
आठवड्यातील किमान ३० मिनिटे आणि तीन वेळा व्यायामासाठी नियोजित करू शकता. शक्यतो, दररोज नियमित व्यायाम करण्याचा प्रयत्न करा. 
जीवनशैलीत बदल करून देखील गर्भाशयची समस्या असल्यास, तज्ञांच्या सल्ल्याने फर्टिलिटी औषधांचे सेवन करू शकतात. प्रजननासाठी काही निवडक इस्ट्रोजेन रिसेप्टर मॉड्युलेटर औषधे उपलब्ध आहेत.
औषधांचे सेवन करूनदेखील जर गर्भधारणा होत नसेल तर बीजांड सोडण्यासाठी फर्टिलिटी इंजेक्शनची आवश्यकता लागते. फर्टिलिटी इंजेक्शन्समध्ये समप्रमाणात असणारी संप्रेरक, आपल्या मेंदूला गर्भाशयाला बीजांड बनविण्यासाठी सिग्नल देतात. 
फर्टिलिटी डॉक्टर ट्रान्सव्हॅजिनल अल्ट्रासाऊंड आणि रक्त चाचण्यांद्वारे या प्रक्रियेवर बारीक लक्ष ठेवतात. कारण, या चाचण्यांद्वारे त्यांना एस्ट्रॅडिओल पातळीची (अंडाशयात तयार होणारे हार्मोन) नोंद ठेवण्यास मदत होते. मात्र,कधी क़़धी फर्टिलिटी इंजेक्शन्सचा नकारात्मक परिणाम  असा होतो की त्यामुळे बहुविध जन्माचा धोका वाढतो.
वर नमूद केलेल्यांपैकी कोणत्याही ट्रीटमेंटनंतर देखील गर्भधारणा झाली नाही तर इन विट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ) चा मार्ग अवलंबता येतो. 
आयव्हीएफचा पर्यायही असतोच.
 
(लेखक स्त्रीरोगतज्ज्ञ आणि वंध्यत्व उपचार तज्ज्ञ आहेत.)

 

Web Title: What exactly is PCOS? Is PCOS a risk factor for infertility? what's treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.