>आरोग्य >वंध्यत्व > मूल होत नाही, गर्भधारणेत अडचणी येतात? -‘फर्टाइल विंडो’चं गणित समजून घ्या

मूल होत नाही, गर्भधारणेत अडचणी येतात? -‘फर्टाइल विंडो’चं गणित समजून घ्या

बीजधारणा चक्र असतं, त्याची शास्त्रीय माहिती समजून घ्यायला हवी.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 09:19 PM2021-03-22T21:19:29+5:302021-03-22T21:48:38+5:30

बीजधारणा चक्र असतं, त्याची शास्त्रीय माहिती समजून घ्यायला हवी.

pregnancy problems- fertile window | मूल होत नाही, गर्भधारणेत अडचणी येतात? -‘फर्टाइल विंडो’चं गणित समजून घ्या

मूल होत नाही, गर्भधारणेत अडचणी येतात? -‘फर्टाइल विंडो’चं गणित समजून घ्या

Next
Highlightsशरीरातील हार्मोन्सनी ओव्हयुलेशनच्या काळात खरोखरच उच्छाद मांडलेला असतो. या सगळ्याचा ट्रॅक ठेवून प्रेगन्सी नियोजन खरोखर शक्य आहे.

प्रेग्नन्सीबाबतीत काळजीत आहात? प्रयत्न करूनही गरोदर होत नाही आहात? - तर मग आधी तुम्ही मासिक पाळी नि बीजधारणेचं चक्र समजून घ्यायला हवं. आपली ‘फर्टाइल विंडो’ कशी आहे हे एकदा समजलं की गरोदरपणाची शक्यता वाढते व या काळाचं यशस्वी नियोजन करता येतं.
ओव्हयुलेशन म्हणजे बीज उत्सर्जन. हा मासिक पाळी प्रक्रियेचा एक अविभाज्य भाग. त्यावेळी बीजकोश म्हणजे ओव्हरीतून बीजं सुटतात नि फॅलोपियन ट्यूबमधून गर्भाशयापर्यंत पोहोचतात. मासिक पाळीच्या चक्रात नियमितता असेल तर साधारण बारा ते सोळा दिवसांच्या दरम्यान ही क्रिया घडते. (प्रत्येक पाळीनंतर 30+2 दिवस मागेपुढे असणारं हे चक्र) बीज उत्सर्जन झालं की साधारण 24 ते 36 तास बीजं जिवंत असतात. स्त्रीच्या शरीराच्या विशिष्ट भागात शुक्राणू जिवंत राहाण्याचा कालावधी 48 ते 72 तासांचा असतो. या काळात स्त्रीच्या फॅलोपियन ट्यूबमध्ये शुक्राणूंचा प्रवेश होऊन ते जिवंत राहिले तर प्रेग्नंसीची शक्यता वाढते. ज्या स्त्रियांचं मासिक पाळी चक्र काही कारणांनी अनियमित असतं त्यांनी स्वत:च्या ‘फर्टाइल विंडो’वर लक्ष ठेवलं तर नीट ठरवून बाळाचं नियोजन करता येऊ शकतं.

ओव्हयुलेशन सुरू झालं का हे कसं तपासावं?


1. सर्व्हायकल म्युकस

 ओव्हयुलेशनची सुरूवात झाली की चिकट पांढरा स्राव म्हणजेच व्हाईट डिसचार्ज जाणवू लागतो. असं होणं अगदी नॉर्मल आहे. उलट या डिसचार्जमुळं शुक्राणूंचा फॅलोपियन ट्यूबपर्यंतचा प्रवास अधिक सहज व चांगला होतो. मात्र जर या स्रावामुळं चरचरणं, विचित्र वास येणं अशी लक्षणं जाणवली तर समजावं की इन्फेक्शन झालंय नि डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.


2. शरीराचं तापमान (बेसिल बॉडी टेम्परेचर)
ओव्हयुलेशन सुरू झाल्यानंतर प्रोजेस्टेरॉन या संप्रेरकाचं प्रमाण वाढल्यामुळं शरीराच्या मूळ तापमानात वाढ होते. ती झालीय का हे बघायचं तर सकाळी बेडवरून उतरण्यापूर्वी उठल्या उठल्या ताबडतोब तपासावं. अशावेळी वाढणार्‍या तापमानावर काही दिवस लक्ष ठेवलंत तर कळेल की ओव्हयुलेशन सुरू झालेलं आहे.

 


3. ओव्हयुलेशन स्ट्रीप 
प्रेग्नंसी स्ट्रीप असते तशीच ही ओव्हयुलेशन स्ट्रीप. ओव्हयुलेशनपूर्वी सुमारे 24 ते 36 तास आधी युरिनमध्ये ल्युटिनायझिंग या हार्मोनचं प्रमाण वाढतं. ही स्ट्रीप आपल्याला ओव्हयुलेशन सुरू झालेलं आहे अथवा नाही हे समजून घेण्यासाठी मदतीची ठरते. स्ट्रीपवरच्या पहिल्या दोन रेघा लाल झाल्या की समजावं, पुढच्या 24 ते 36 तासांमध्ये ओव्हयुलेशन सुरू होणार आहे. ही तपासणी दुपारच्यावेळी केली तर अधिक चांगलं!

4. ओव्युलेशन कॅल्क्युलेटर

हाताशी सहजपणे उपलब्ध असणार्‍या स्मार्टफोनचा वापर करून ओव्हयुलेशनचा नेमका काळ तुम्हाला कळू शकतो. या काळात सेक्सच्युअली सक्रिय राहाण्यातून प्रेग्नंसीची शक्यता वाढते. मात्र तुमचं मासिक पाळीचं चक्र मुळातच अनियमित असेल तर स्मार्टफोनमधल्या अ‍ॅपकडून विश्‍वासार्हतेची अपेक्षा कमी असते. तरीही अ‍ॅपच्या आधारे ओव्हयुलेशनचा काळ कळणं, महिन्यातल्या विशिष्ट वेळचे मूड स्विंग्ज समजून घेणं याचा फायदा होतोच. शरीरातील हार्मोन्सनी ओव्हयुलेशनच्या काळात खरोखरच उच्छाद मांडलेला असतो. या सगळ्याचा ट्रॅक ठेवून प्रेगन्सी नियोजन खरोखर शक्य आहे.

Web Title: pregnancy problems- fertile window

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

संबंधित बातम्या

युटेरिन फायब्रॉईड्स अर्थात गर्भाशयातल्या गाठी हा आजार कशाने होतो? - Marathi News | uterine fibroids causes types symptoms, treatment | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :युटेरिन फायब्रॉईड्स अर्थात गर्भाशयातल्या गाठी हा आजार कशाने होतो?

वयाच्या पन्नाशीला पोहोचेपर्यंत युटेरियन फायब्रॉइड्स म्हणजे गर्भाशयात गाठी होणार्‍या स्त्रियांचं प्रमाण २० ते ८० इतकं आहे. ...

तुळस-कोरफड-गावठी गुलाब यांना तुमच्या घरातल्या कोपऱ्यात जागा द्या, मग पहा आरोग्य - बहार! - Marathi News | Holy basil-aloe vera- rose- helps for healthy habits and diet. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तुळस-कोरफड-गावठी गुलाब यांना तुमच्या घरातल्या कोपऱ्यात जागा द्या, मग पहा आरोग्य - बहार!

आपल्या आहार-घरगुती औषधात सहज उपयोगी पडेल अशी घरातल्याच हिरव्या कोपऱ्यातली सोपी जादू.    ...

गरोदर मातेला कोरोनाचा संसर्ग झालाच तर काय काळजी घ्याल? कोणत्या चुका टाळता येतील? - Marathi News | What to do if a pregnant mother is infected with corona? avoid these common mistakes | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गरोदर मातेला कोरोनाचा संसर्ग झालाच तर काय काळजी घ्याल? कोणत्या चुका टाळता येतील?

गरोदरपणात कोरोना संसर्गाचं भय वाटणं साहजिकच आहे, मात्र योग्य देखभाल, काळजी आणि तज्ज्ञ मार्गदर्शन घ्या, काळजी घेणं हाच उत्तम बचाव आहे. ...

‘गर्भधारणा नको? त्यात काय एवढे, खा गोळ्या!’- या बेदरकार वृत्तीच्या बायका बळी ठरतात तेव्हा.. - Marathi News | pregnant women abortion pills, dangerous for health, take medical help | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :‘गर्भधारणा नको? त्यात काय एवढे, खा गोळ्या!’- या बेदरकार वृत्तीच्या बायका बळी ठरतात तेव्हा..

अनेकजण मात्र चुकीच्या पद्धतीने गोळ्या खाऊन, महिनाभर रक्तस्त्राव अंगावर काढून, मग डॉक्टरकडे जातात. अनेकदा खोटेच सांगतात कि आपोआप गर्भ पडला. ...

कोरोनाकाळात गर्भावस्थेची जास्त जोखीम वाटतेय? मग तज्ज्ञांचा सल्ला वाचा अन् तब्येत सांभाळा  - Marathi News | Feeling high risk of pregnancy during corona pandamic advice of experts and take care of your health | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कोरोनाकाळात गर्भावस्थेची जास्त जोखीम वाटतेय? मग तज्ज्ञांचा सल्ला वाचा अन् तब्येत सांभाळा 

अप्रतिम वैद्यकीय सुविधा आणि नियमित जन्मपूर्व आरोग्यसेवांचा विकास झाल्यामुळे, जास्त जोखीम असूनही तुमचे बाळ सुदृढ होऊ शकते आणि प्रसूती देखील सुरक्षित होऊ शकते. ...

आईकडून बाळाला HIVचा संसर्ग होण्याचा धोका कसा कमी झाला ? ती ही झिरो संसर्ग कथा - Marathi News | Although the success in preventing mother transmission HIV to her baby , but there are still challenges ! ! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आईकडून बाळाला HIVचा संसर्ग होण्याचा धोका कसा कमी झाला ? ती ही झिरो संसर्ग कथा

जागतिक आरोग्य संघटनेचं घोषवाक्यच ‘झीरो व्हर्टीकल ट्रान्समिशन’ (शून्य वारसा/ शून्य पिढीजात संसर्ग) असं आहे. औषधांच्या साहाय्यानं गेल्या दहा वर्षांत, सुमारे दीड ते दोन दशलक्ष मुलांनी हे एचआयव्ही पार केलं आहे. ...