Join us   

जास्त स्ट्रेस घेतल्यास मूल होण्यात अडचण येते? जोडप्यांमधलं वंधत्व टाळण्यासाठी तज्ज्ञ सांगतात....

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2023 3:12 PM

Can stress cause permanent infertility : जेव्हा आपण एखाद्या गोष्टीसाठी खूप प्रयत्नशील असतो तेव्हा कॉर्टिसॉल आणि एपिनेफ्रिन यासारखे स्ट्रेस हार्मोन्स वाढतात आणि त्यामुळे व्यक्तीच्या प्रजनन क्षमतेवर नकारात्मक प्रभाव पडू शकतो.

गर्भधारणा करू न शकणे किंवा वंध्यत्व या समस्येबद्दल फारसे मोकळेपणाने बोलले जात नाही. या समस्येचा सामना करणाऱ्या व्यक्ती नैराश्य, चिंता आणि एकटेपणा असे त्रास देखील सहन करत असतात. ताणतणाव आणि वंध्यत्व यामधील संबंधांवर गेले अनेक वर्ष चर्चा, विचारविनिमय केला जात आहे. गर्भधारणा करू न शकणाऱ्या महिलांमध्ये चिंता आणि नैराश्य यांचे प्रमाण वाढलेले असते (सायकोजेनिक वंध्यत्व). त्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की वंध्यत्वामुळे ताणतणाव निर्माण होतात. पण ताणतणावांमुळे वंध्यत्व येते की नाही हे मात्र पुरेसे स्पष्ट झालेले नाही (Can stress cause permanent infertility)

जेव्हा आपण एखाद्या गोष्टीसाठी खूप प्रयत्नशील असतो तेव्हा कॉर्टिसॉल आणि एपिनेफ्रिन यासारखे स्ट्रेस हार्मोन्स वाढतात आणि त्यामुळे व्यक्तीच्या प्रजनन क्षमतेवर नकारात्मक प्रभाव पडू शकतो. पुनरुत्पादक अवयवांकडे रक्ताचा प्रवाह वाढवण्यासाठी ताणतणाव कमी करणे हा अतिशय उत्तम उपाय ठरू शकतो. डॉ हितेशा रोहिरा (कन्सल्टन्ट आयव्हीएफ (IVF)), कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, मुंबई यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे.

गर्भधारणा दरावर मानसिक घटकांचा संभाव्य प्रभाव हा प्रजनन वैद्यक क्षेत्रातील एक सर्वात मोठा वादाचा मुद्दा आहे. ताणतणावांमुळे प्रजनन क्रियेवर विपरीत परिणाम होतो असे पूर्वापारपासून मानले जात असले तरी ही बाब खात्रीलायकरीत्या सिद्ध करणे आव्हानात्मक आहे.

वंध्यत्वामुळे खूप मोठ्या प्रमाणावर त्रास होतो हे नक्की. हल्लीच करण्यात आलेल्या संशोधनामध्ये आढळून आले आहे की, मानसिक त्रास कमी करण्यात तसेच गर्भधारणा दरामध्ये लक्षणीय वाढ करण्यात मानसिक उपाययोजना मोलाची भूमिका बजावू शकतात. ताणतणाव कमी करण्याची अनेक तंत्रे आहेत; गर्भधारणेसाठी प्रयत्न करत असलेल्या व्यक्तींसाठी प्रभावी ठरणाऱ्या काही पद्धती पुढीलप्रमाणे आहेत:

ऍक्युपंक्चर 

ताणतणाव कमी करण्यात तज्ञ मंडळींसोबत सहयोग 

 संगीत, गाणी ऐकणे 

मसाज थेरपी 

ध्यान 

माईंड-बॉडी ग्रुप्स 

मनातील भावभावनांविषयी जागरूक राहणे. 

प्रोग्रेसिव्ह मसल रिलॅक्सेशन 

सायकोथेरपी आणि कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी 

स्वयं-सहायता शिकवणारी पुस्तके 

सहायता/शैक्षणिक समूह 

चालणे

 योगसाधना

याबाबत तुमचे काही प्रश्न किंवा शंका असतील तर, वैद्यकीय तज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. तुमचे डॉक्टर तुमची नेमकी समस्या समजून घेतील आणि त्यावर प्रभावी उपाय सुचवतील. जीवनशैली जर निरोगी असेल तर वंध्यत्वाचा धोका कमी होतो. प्रभावी प्राथमिक देखभाल व्यवस्था, डॉक्टरांसाठी पूर्णकालीन मॉडेल उपलब्ध असल्यास विनाअडथळा उपचार करवून घेता येतात.

टॅग्स : गर्भवती महिलाप्रेग्नंसीहेल्थ टिप्स