धावपळीच्या जीवनशैलीत, कामाच्या गडबडीमुळे आपल्यापैकी अनेकांना इन्स्टंट फूड खाण्याची सवय लागली आहे. त्यात नूडल्स, पास्ता, पिझ्झा, बर्गर यांसारखे फास्ट फूड प्रत्येकाच्या आहाराचा भाग झालेला दिसतात.(noodles side effects) कमी वेळा बनणारा आणि पोटभरीचा पदार्थ अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आवडीचा. बाजारातही विविध फ्लेव्हर, पॅकिंग आणि जाहिरातीमुळे नूडल्स सहज मिळतात.(noodles health risk) पण या चटकदार पदार्थांच्या चवीमुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. (instant noodles dangers)
अनेकांना नूडल्स इतके आवडतात की, ते आठवड्यातून २ ते ३ वेळा खाल्ले जातात. पण हे आपल्या पोटासाठी हानिकारक आहेत. कारण हे रिफाइंड पिठापासून बनवले जातात, शिवाय ते वजन देखील वाढवतात.(noodles and pregnancy) नवी दिल्लीत जनरल फिजिशियन डॉ. पियुष मिश्रा यांच्या मते इन्स्टंट नूडल्स खाल्ल्याने आरोग्याचे नुकसान होते. हे आधी शिजवलेले असतात आणि त्यात फ्लेवरिंग पावडर किंवा मसाला, तेल घातले जाते. तसेच दीर्घकाळ टिकवण्यासाठी उच्च दर्जाचे सोडियम, कमी पौष्टिक मूल्यामुळे ते आरोग्यासाठी हानिकारक ठरते. (unhealthy foods women) जास्त प्रमाणात नूडल्स खाल्ल्याने आरोग्यावर कसा परिणाम होतो पाहूया.
जीवनसत्त्व B-12 कमी झालं की शरीर देतं ५ सिग्नल, होतं नसांचे नुकसान- वेळीच घ्या काळजी
1. जास्त प्रमाणात इन्स्टंट नूडल्स खाल्ल्याने महिलांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. यामुळे गर्भधारणा होण्यास त्रास होतो. याचा परिणाम महिलेच्या हार्मोनल संतुलनावर होतो. गर्भवती महिलांनी इन्स्टंट नूडल्स खाणे टाळावे.
2. नूडल्स खाल्ल्याने शरीरात अनावश्यक चरबी वाढते, ज्यामुळे लठ्ठपणा येतो. यात असलेले अस्वास्थ्यकर चरबी आणि ट्रान्स फॅट्स शरीरातील चरबी वाढवते. आपल्याला भूक लागल्यावर खाल्ले तर आपल्याला पोट दीर्घकाळ भरल्यासारखे वाटते. परंतु, पोषक तत्वाच्या कमतरतेमुळे आपल्याला पुन्हा भूक लागू शकते.
3. नूडल्स हे रिफाइंड पिठापासून बनवले जातात. रिफाइंड पीठ आरोग्यदायी नसते. त्यात प्रिझर्व्हेटिव्हज आणि इतर पदार्थ असतात जे अत्यंत हानिकारक असू शकतात.यामुळे पोटफुगी, गॅस आणि अपचन यासारख्या पचन समस्यांचा धोका वाढतो. जास्त इन्स्टंट नूडल्स खाल्ल्याने आतड्यांसंबंधी समस्या देखील उद्भवू शकतात.
4. यात आवश्यक जीवनसत्त्वे, प्रथिने, खनिजे किंवा फायबरची कमतरता असते. त्यामुळे ते खाल्ल्याने शरीराला योग्य पोषण मिळत नाही. ते खाल्ल्याने आपली प्रतिकारशक्ती कमकुवत होते. ज्यामुळे आपण आजारांना बळी पडू शकता.
5. जर आपण रोज इन्स्टंट नूडल्स खाल्ले तर हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक ठरु शकते. यात उच्च सोडियम, अतिप्रमाणात चरबी आणि कमी पौष्टिक घटकांमुळे उच्च रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलची पातळी वाढू शकते. ज्यामुळे स्ट्रोक आणि हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.