हल्ली कॅन्सरचे रुग्ण खूप वाढले आहेत. आपल्या परिचित लोकांपैकी कोणाला ना कोणाला कॅन्सर झाल्याचे वारंवार ऐकू येते. त्यातही काही कॅन्सरचे प्रमाण खूप जास्त असून त्यापैकीच एक आहे महिलांमध्ये दिसून येणारा सर्व्हायकल कॅन्सर. यालाच आपण गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर असंही म्हणतो. राज्य कर्करोग संस्थेच्या अहवालानुसार या प्रकारच्या कर्करोगाचे प्रमाण सध्या प्रचंड वाढले आहे. शिवाय बहुतांश रुग्णांमध्ये असं आढळून येत आहे की जेव्हा हा कर्करोग चौथ्या स्टेजला येतो, तेव्हाच त्याचे निदान होत आहे. कारण याची लक्षणं सौम्य असून महिला त्याकडे दुर्लक्ष करतात. या आजाराविषयी जनजागृती व्हावी म्हणूनच जानेवारी महिना हा गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविषयी जनजागृती करणारा महिना म्हणून साजरा केला जातो.(reasons and symptoms of cervical cancer)
गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होण्याची कारणं
ह्यूमन पॅपिलोमा व्हायरसमुळे हा कर्करोग होतो. वैयक्तिक शारिरीक स्वच्छता योग्यप्रकारे ठेवल्यास या आजाराचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतो, असं तज्ज्ञ सांगतात.
गुलाबाच्या कुंडीत खोचून ठेवा कांदा, गुलाबाला येतील फुलंच फुलं, पाहा नेमकं काय करायचं...
ज्या महिला वर्षांनुवर्षांपासून गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर करतात, त्यांच्यातही हा कॅन्सर होण्याचा धोका सामान्य महिलांपेक्षा जास्त असतो.
याशिवाय रोगप्रतिकारक शक्ती कमी असणे, तंबाखूचे सेवन, कमी वयात झालेले लग्न, असुरक्षित लैंगिक संबंध, कुपोषण ही देखील सर्व्हायकल कॅन्सर होण्यामागची काही कारणं आहेत.
टाळता येणारा आजार
याविषयी स्त्री कर्करोग विभागप्रमुख डॉ. अर्चना राठोड सांगतात की हा टाळता येणारा आजार आहे. त्यासाठी ९ ते १४ या वयोगटातील मुलींचे एचपीव्ही लसीकरण होणे गरजेचे आहे.
जेवणानंतर तुम्हीही बडिशेप किंवा खडीसाखर खाता? बघा या दोन्हींचा तुमच्या शरीरावर काय परिणाम होतो
तसेच वयाच्या तिशीनंतर प्रत्येक महिलेने वर्षातून एकदा या आजारासंबंधीची चाचणी करून घ्यायला हवी. शरीरात काहीही बदल जाणवल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता त्वरीत डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा.
सर्व्हायकल कॅन्सरची लक्षणं
१. पाळीची तारीख नसताना अचानकच केव्हाही ब्लिडिंग होणे.
२. संबंधांदरम्यान किंवा त्यानंतरही खूप त्रास होणे. पोट दुखणे, जळजळ होणे.
साधा ढोकळा नेहमीच खाता; आता मटार ढोकळा खाऊन पाहा.. थंडीच्या मौसमातला खमंग पदार्थ
३. व्हाईट डिस्चार्ज खूप जास्त प्रमाणात होणे तसेच त्याला खूप दुर्गंधी असणे किंवा त्यातूनही रक्तस्त्राव होणे.
४. हातापायांवर सूज येणे, लघवीच्यावेळी त्रास होणे.
Web Summary : Cervical cancer cases are rising, often diagnosed late due to subtle symptoms. HPV, prolonged contraceptive use, and weak immunity are risk factors. Vaccination and regular screening are crucial for prevention. Watch for unusual bleeding, pain during intercourse, and abnormal discharge; consult a doctor promptly.
Web Summary : सर्वाइकल कैंसर के मामले बढ़ रहे हैं, अक्सर सूक्ष्म लक्षणों के कारण देर से निदान होता है। एचपीवी, लंबे समय तक गर्भनिरोधक उपयोग और कमजोर प्रतिरक्षा जोखिम कारक हैं। टीकाकरण और नियमित जांच रोकथाम के लिए महत्वपूर्ण हैं। असामान्य रक्तस्राव, संभोग के दौरान दर्द और असामान्य स्राव पर ध्यान दें; तुरंत डॉक्टर से परामर्श करें।