Join us   

PCOD एकदा झाला की आयुष्यभर राहतो का? डॉक्टर सांगतात, हा आजार नसून...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2023 5:32 PM

Is PCOD Curable or Not Doctor Says : या समस्येने शारीरिक त्रआस तर होतोच पण मानसिक त्रासही होतो.

PCOD ही सध्या सगळ्याच वयोगटांतील महिलांना भेडसावणारी अतिशय महत्त्वाची समस्या आहे. PCOD हा आजार नसून ती जीवनशैलीविषयक समस्या आहे हे लक्षात घ्यायला हवे. हार्मोन्समध्ये झालेल्या बदलांमुळे PCOD होतो. मूळात पाळीची अनियमितता, रक्तस्त्रावाचे प्रमाण कमी-अधिक होत राहणे, वेळेच्या आधी पाळी येणे आणि थोडं थोडं रक्त जाणं किंवा वेळेच्या खूप उशीरा पाळी येणे आणि प्रमाणाबाहेर रक्तस्त्राव होणं अशी लक्षणे दिसतात (Is PCOD Curable or Not Doctor Says). 

पीसीओडीमुळे वजन वाढते, चेहऱ्यावर अनावश्यक केस, पिंपल्स येतात? यात कितपत तथ्य? तज्ज्ञ सांगतात...

या समस्येत वजनाच्या समस्या प्रकर्षाने जाणवतात. याबरोबरच चेहऱ्यावर अनावश्यक केस येणे, पिंपल्स येणे, मान किंवा काखेत काळेपणा निर्माण होणे अशा समस्यांनाही महिलांना तोंड द्यावे लागते. सौंदर्यात बाधा येत असल्याने तरुणींना वेगळ्या प्रकारचा ताण येतो. वजन वाढीमुळे आत्मविश्वास कमी होण्यासारख्या मानसिक समस्यांनाही सामोरे जावे लागते.

PCOD ही समस्या पूर्णपणे बरी होते की नाही?

(Image : Google)

मुंबईच्या हिंदूजा हॉस्पिटलमधील डॉ. रंजना धानू सांगतात, एकदा PCOD डीटेक्ट झाला की आयुष्यभर ही समस्या आपल्या सोबत असते. बरेचदा महिला अॅलोपॅथीचे उपचार घेत असतात पण इतर पॅथीच्या लोकांकडून आमच्या औषधांनी PCOD पूर्ण बरा होईल असा दावा केला जातो आणि मग आपण त्या पॅथीच्या मागे लागून ही समस्या पूर्ण कशी बरी होईल यासाठी प्रयत्न करत राहतो. पण कोणत्याही प्रकारच्या पॅथीने PCOD पूर्ण जाऊ शकत नाही. 

पाळी येण्याच्या गोळ्या घेतल्याने पीसीओडीचा त्रास कमी होतो किंवा बंद होतो का? तज्ज्ञ सांगतात...

वजन कमी केल्याने किंवा नियमित व्यायाम आणि संतुलित आहाराने PCOD ची लक्षणे कमी होऊ शकतात आणि तो नियंत्रणात येऊ शकतो. पण ही समस्या पूर्णपणे बरी कधीच होऊ शकत नाही. त्यामुळे PCOD असणाऱ्यांनी त्याददृष्टीने आपली मानसिक तयारी करुन तो आटोक्यात राहील यासाठी जरुर प्रयत्न करायला हवेत.   

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सपीसीओएस