Join us   

योनीमार्गात प्रचंड कोरडेपणा, सतत आग - जळजळ होण्याची ५ कारणं, त्रास कमी करण्यासाठी तज्ज्ञ सांगतात..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2023 4:28 PM

Causes of Vaginal Dryness : योनीमार्गातला कोरडेपणा अत्यंत त्रासदायक असतो, वेळीच त्याकडे लक्ष देणं गरजेचं....

स्त्रियांच्या शरीरातील 'व्हजायना' हा अतिशय नाजूक भाग आहे. काहीवेळा काही महिलांना या नाजूक भागाविषयी अनेक समस्या उद्भवताना दिसतात. व्हजायनामध्ये कोरडेपणा जाणवणं ही त्यापैकीच एक साधी समस्या आहे. काही स्त्रिया या व्हजायना ड्रायनेसच्या (Vaginal Dryness) समस्येने अधिक त्रस्त असतात. योनीमार्गाचा  कोरडेपणा (Common Reasons For Vaginal Dryness) ही समस्या असली तरीही या समस्येमुळे स्त्रियांना पुढे अनेक प्रॉब्लेम्स येऊ शकतात. असे असले तरीही बरेचदा लाजेमुळे किंवा कसे सांगावे हे कळत नसल्यामुळे अशा समस्या सांगितल्या जात नाहीत(5 Things That Can Cause Vaginal Dryness).

शक्यतो सर्वच वयोगटातील स्त्रियांमध्ये, कमी - अधिक प्रमाणांत योनीमार्गात कोरडेपणा (Vaginal dryness: Why it happens) दिसून येतो. बरेचदा महिलांना प्रश्न पडतो की योनीमार्ग नेमका कसा कोरडा पडतो. सतत खाज येत असेल तर समजून जावे की योनीमार्ग कोरडा पडला आहे. पण याची नक्की (5 major causes of vaginal dryness) कारणे शोधून घेण्याचा कोणीच प्रयत्न करत नाही. त्यामुळे त्याची कारणे आधी जाणून घ्यायला हवीत. अनेक स्त्रियांना होणारा त्रास व्यक्त करता येत नाही. पण सतत कोरडेपणा जाणवत असेल तर त्यामुळे पुढे गंभीर समस्या (Don't ignore vaginal dryness and pain) उद्भवू शकतात. त्यामुळे वेळीच यावर माहिती करून उपचार घेणे गरजेचे असते. Nurture IVF च्या स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. अर्चना धवन - बजाज यांनी व्हजायनामध्ये ड्रायनेस जाणवण्याची मुख्य कारणं नेमकी कोणती याबद्दल सांगितले आहे(5 Reasons You’re Experiencing Vaginal Dryness).  

व्हजायनामध्ये ड्रायनेस जाणवण्याची मुख्य कारणं नेमकी कोणती ? 

१. मेनोपॉज (रजोनिवृत्ती) :-

तज्ज्ञांच्या मते शरीरातील इस्ट्रोजेनची पातळी कमी झाल्यावर योनीमार्गात कोरडेपणा येतो. जेव्हा आपण आपल्या रजोनिवृत्तीच्या काळात असता तेव्हा असे होते. रजोनिवृत्तीच्या काळात कमी इस्ट्रोजेन पातळीमुळे, योनी आणि तिची त्वचा आणि ऊती पातळ आणि कमी लवचिक बनतात, ज्यामुळे योनी कोरडी होऊ शकते. रजोनिवृत्तीनंतर व्हजायनामध्ये ड्रायनेस येण्याची ही समस्या अधिक जाणवते. फक्त रजोनिवृत्तीच नाही तर रजोनिवृत्ती येण्याआधी ज्याला Perimenopause असं म्हटलं जातं तेव्हाही योनीमार्गात कोरडेपणा जाणवण्याची शक्यता अधिक असते.  

२. औषधे :- 

जर आपण बराच काळ एखाद्या आजाराने ग्रस्त असाल आणि त्यावर उपचार म्हणून औषधे घेत असाल, तर या औषधांचा देखील योनीमार्गाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते, ऍलर्जी, सर्दी आणि दम्यावरील औषधे ज्यामध्ये अँटीहिस्टामाइन्स नावाचे घटक अधिक असतात. या घटकाचे प्रमाण शरीरांत अधिक झाले की योनीमार्गात कोरडेपणा जाणवण्याची शक्यता अधिक वाढते. काही अँटीडिप्रेसंट औषधे देखील योनिमार्गात कोरडेपणा आणू शकतात.

न्हाळ्यात नाजूक जागेचे इन्फेक्शन टाळा, योनी मार्गाची स्वच्छता राखण्यासाठी ४ गोष्टी विसरू नका...

३. स्मोकिंग :- 

जर आपल्याला स्मोकिंग करण्याची सवय असेल तर ती देखील व्हजायनासाठी हानिकारक ठरू शकते. ज्या महिलांना धूम्रपान किंवा मद्यपानाचे व्यसन असते  त्यांनाही योनीमार्गाच्या कोरडेपणाच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते. धूम्रपानामुळे शरीरातील इस्ट्रोजेनचे उत्पादन आणि संतुलन प्रभावित होते, यामुळे योनीमार्गाच्या कोरडेपणाची समस्या अधिक वाढू शकते.

नाजूक जागेचे केस काढल्यानंतर पुळ्या, खाज येते? रेजर बम्प्स टाळण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला...

४. प्रेग्नंन्सी :-  

गर्भधारणेमुळे योनीमार्गात कोरडेपणाची समस्या देखील असू शकते. खरं तर, बाळाला जन्म दिल्यानंतर काही दिवसांतच महिलांमध्ये इस्ट्रोजेनची पातळी ही खूपच कमी होते. त्यामुळे योनीमध्ये कोरडेपणा जाणवू शकतो.

व्हजायनल डिस्चार्जचा बदललेला रंग सांगतो गंभीर आजारांचा धोका, ४ लक्षणांकडे दुर्लक्ष करणं अत्यंत धोक्याचं!

५. स्ट्रेस :- 

वेब एमडी यांच्या रिपोर्टनुसार डिप्रेशन, अति ताण याचाही आपल्या व्हजायनावर परिणाम होतो. आपले धकाधकीचे व स्ट्रेसफुल जीवनही योनीमार्गाच्या कोरडेपणाला कारणीभूत ठरू शकते. जेव्हा आपण तणावाखाली असता तेव्हा रक्तप्रवाहावर याचा परिणाम होतो ज्यामुळे योनीमध्ये पुरेसे रक्त पोहोचत नाही. खराब रक्ताभिसरणामुळे, नैसर्गिक साखळी विस्कळीत होते, ज्यामुळे योनिमार्गाच्या कोरडेपणाची समस्या उद्भवू शकते.

व्हजायना ड्रायनेसचा अनेक महिलांवर परिणाम होताना दिसून येतो. असे असले तरीही आपल्याला हा त्रास जास्त होत असेल, तुमच्या लाइफस्टाईलवर, सेक्स लाइफवर, रिलेशनशिपवर याचा परिणाम होत असेल तर मात्र डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.

टॅग्स : योनीहेल्थ टिप्सआरोग्य