स्त्रियांच आयुष्य हे नेहमीच अनेक भूमिकांमध्ये विभागलं गेलं आहे. मुलगी, बहिण, पत्नी, आई, आजी अशा अनेक नात्यांमधून दिला जावम लागतं.(motherhood and age) यामध्ये तिच्या स्वत:च्या भावना, स्वप्नं आणि वेळ कुठेतरी हरवून जातो. करिअर, जबाबदाऱ्या, समाजाच्या अपेक्षा आणि स्वत:ची प्रगती करताना आपण लग्न यांसारख्या गोष्टींपासून दूर राहातो. ज्यामुळे मातृत्वाचा विचार देखील मागे पडतो.(Soha Ali Khan motherhood) पण वय वाढू लागलं की तू आता म्हातारी झालीस, असं कुणीतरी येऊन म्हटलं की, आपल्या मनात काळजीसह असंख्य प्रश्न उभे राहतात. (right age for motherhood)
वयाच्या पन्नाशीतही मलायका अरोरा दिसते तरुण- करते 'या' ३ साध्या गोष्टी- परफेक्ट फिगरचे सिक्रेट
बॉलिवू़ड अभिनेत्री सोबा अली खानने 'ऑल अबाउट हर' नावाचा नवीन पॉडकास्ट सुरु केला. यामध्ये ती सरोगसी, दत्तक आणि बाळंतपणाशी संबंधित अनेक गोष्टींवर चर्चा करते. (pregnancy after 35) नुकत्याच झालेल्या मुलाखतीत सनी लिओनीसह फर्टिलिटी तज्ज्ञ डॉ. किरण कोएल्हो या देखील होत्या. त्यावेळी तिने म्हटलं की, वयाच्या ३५ व्या वर्षी मी आई होण्याचा निर्णय घेतला आणि फर्टिलिटीसाठी गेले असताना मला असं सांगण्यात आले की, माझं वय झालं आहे.(women fertility age) तर काहींनी सांगितलं तु खूप लहान आहे, पण डॉक्टर असं ही म्हणाले की, अंडाशय तुमचा चेहरा पाहू शकत नाही. प्रत्येक स्त्रीसाठी आई होणं हा खूप मोठा आणि भावनिक प्रवास असतो. पण समाज आणि प्रगत होणारं तंत्रज्ञान पाहता खरंच आई होण्यासाठी योग्य वय कोणतं असावं?
फर्टिलिटी तज्ज्ञ डॉ. किरण कोएल्हो म्हणतात महिलांसाठी फर्टिलिटी अर्थात एग्ज फ्रीज करण्याचे योग्य वय हे २८ ते ३४ दरम्यानचे आहे. या वयात एग्जचे प्रमाण चांगले मानले जाते. पण ३० व्या वर्षाच्या आधी म्हणजेच २० ते २५ वयोगटात असणाऱ्या स्त्रियांनी एग्ज फ्रीज करावे. वय वाढलं की, प्रजननक्षमता कमी होत जाते. पण प्रत्येक स्त्रीची शारीरिक आणि मानसिक स्थिती ही वेगळी असते. काहींना करिअर घडवायचं असतं तर काहींना स्थिरता हवी असते. तर काही जण योग्य जोडीदाराच्या शोधात असतात. सनी लिओनी म्हणते की तिला गर्भधारणा करायची नव्हती त्यासाठी तिने सरोगसीचा पर्याय निवडला. सोहाने म्हटलं की, मला सध्या ७ वर्षांची मुलगी आहे आणि आम्ही सध्या पालकत्वाची जबाबदारी सांभाळत आहोत.