Lokmat Sakhi >Health >Family Planning > IVF: नेहमी विचारले जाणारे ८ प्रश्न, आयव्हीएफ प्रक्रियेपूर्वी तुम्हाला हे नक्की माहिती हवं..

IVF: नेहमी विचारले जाणारे ८ प्रश्न, आयव्हीएफ प्रक्रियेपूर्वी तुम्हाला हे नक्की माहिती हवं..

IVF- frequently asked questions : IVF संदर्भात नेहमी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची खरीखुरी उत्तरं..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2025 08:05 IST2025-07-21T08:00:00+5:302025-07-21T08:05:01+5:30

IVF- frequently asked questions : IVF संदर्भात नेहमी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची खरीखुरी उत्तरं..

IVF preparation tips IVF procedure explained Common IVF myths and facts IVF doubts cleared | IVF: नेहमी विचारले जाणारे ८ प्रश्न, आयव्हीएफ प्रक्रियेपूर्वी तुम्हाला हे नक्की माहिती हवं..

IVF: नेहमी विचारले जाणारे ८ प्रश्न, आयव्हीएफ प्रक्रियेपूर्वी तुम्हाला हे नक्की माहिती हवं..

आईबाबा होण्याची आस असते. गर्भधारणेसाठी अनेक महिने प्रयत्न करूनही यश न मिळाल्यास भावनिकदृष्ट्याही थकवा येतोच. अनिश्चितता असते, आर्थिक ताण येतो, भीतीही वाटते.(IVF preparation tips) आणि आयव्हीएफ सारखा प्रयत्नही फसला तर पुढे काय या विचारानेही अधिक ताण येतो. डॉक्टर जेव्हा आयव्हीएफचा विचार करा असं सांगतात तेव्हा अनेक जोडप्यांना बरेच प्रश्न असतात. तर त्यातल्याच काही नेहमी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची ही उत्तरं.. (IVF- frequently asked questions)


नेहमी विचारले जाणारे प्रश्न..

१. नैसर्गिकरित्या गर्भधारणेची किती काळ वाट पाहिल्यानंतर आयव्हीएफचा विचार करावा?

वय ३५ पेक्षा कमी असल्यास १२ महिने,
३५ पेक्षा जास्त असल्यास ६ महिने वाट पाहावी.
त्यानंतर योग्य वैद्यकीय सल्ला घेऊन आयव्हीएफचा विचार करावा.


२. शारीरिक, भावनिक, आर्थिक तयारी काय आवश्यक?

निरोगी जीवनशैली राखणे, ताणतणाव कमी करण्यासाठी उपाय शिकणे.
आणि गरज पडल्यास समुपदेशन घेणं.
पोषक आहार, व्यायाम, जीवनशैली बदल यासह ही प्रक्रिया आपल्याला काही वेदना देऊ शकेल
याची मानसिक तयारी करावी.


३. लाइफस्टाइलचा प्रभाव पडतो का आयव्हीएफ प्रक्रियेवर?

धूम्रपान, जास्त मद्यपान, चुकीचाआहार, झोपेची कमतरता आणि खूप कमी किंवा जास्त वजन असणे यासारखे घटक फार महत्वाचे.
महिलांची एग क्वालिटी  आणि पुरुषांच्या शुक्राणूंच्या गुणवत्तेवर ते परिणाम करतेच.
त्यामुळे हे सारंही चांगलं असणं गरजेचं.


४. आयव्हीएफला किती वेळ लागतो?


आयव्हीएफ सायकल साधारणपणे ४ ते ६ आठवडे घेते. मात्र त्यासाठी योग्य मार्गदर्शन तज्ज्ञ करतात, ऑनलाइन माहितीपेक्षा आपल्या व्यक्तिगत प्रक्रियेला कितीवेळ लागेल हे डॉक्टरांना विचारणे

५. एग फ्रिज केलेले असतील तर आयव्हीएफ करता येतं का?

काही क्लिनिकमध्ये एग फ्रिजिंगचा सल्ला दिला जातो. 
IVF उपचार त्यानुसारही केले जातात.

६. आयव्हीएफद्वारे बाळाची लिंगनिदान चाचणी करता येते का?
नाही. भारतात लिंगनिदान चाचणीवर बंदी आहे. त्यामुळे तशी चाचणी करणं बेकायदा आहे. आयव्हीएफ प्रक्रियेतही ती केली जात नाही.

 

७. एकदा आयव्हीएफ असफल झाले तर परत प्रयत्न करता येतो का, तो यशस्वी होतो का?

एकदा अपयश आले तरी पुन्हा प्रक्रिया करता येते. दुसऱ्यांदा-तिसऱ्यांनाही यशस्वी गर्भधारणा शक्य आहे. मात्र आयव्हीएफ पुन्हा केव्हा करायची याचा निर्णय तज्ज्ञांचा असतो, त्यांच्या सल्ल्यानेच करणं योग्य.

८. आयव्हीएफ उपचारांचा खर्च किती येतो?

प्रत्येक क्लिनिक, सुविधा उपचार यानुसार तो बदलतो. मात्र दिड लाखाहून अधिक खर्च येतो.
 

Web Title: IVF preparation tips IVF procedure explained Common IVF myths and facts IVF doubts cleared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.