Lokmat Sakhi >Health >Anemia > स्मृती इराणींच्या घरी बनणारं 'हे' सूप प्या, हिमोग्लोबिन भरपूर मिळेल, रक्त वाढेल-थकवा दूर,

स्मृती इराणींच्या घरी बनणारं 'हे' सूप प्या, हिमोग्लोबिन भरपूर मिळेल, रक्त वाढेल-थकवा दूर,

Iron Deficiency Smriti Irani Share Drumstick Soup Recipe : महिला या आजाराच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात ज्यामुळे समस्या अधिकच वाढत जाते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2025 16:40 IST2025-08-17T14:59:38+5:302025-08-17T16:40:40+5:30

Iron Deficiency Smriti Irani Share Drumstick Soup Recipe : महिला या आजाराच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात ज्यामुळे समस्या अधिकच वाढत जाते.

Iron Deficiency In Women Smriti Irani Share Drumstick Soup Recipe For Anemia | स्मृती इराणींच्या घरी बनणारं 'हे' सूप प्या, हिमोग्लोबिन भरपूर मिळेल, रक्त वाढेल-थकवा दूर,

स्मृती इराणींच्या घरी बनणारं 'हे' सूप प्या, हिमोग्लोबिन भरपूर मिळेल, रक्त वाढेल-थकवा दूर,

आजकाल महिलांमध्ये आयर्नची (Iron) कमतरता एक गंभीर समस्या बनली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या रिपोर्टनुसार १५ ते ४९ वयोगटातील ३० टक्के महिलांना रक्ताच्या कमतरतेचा सामना करावा लागत आहे. बऱ्याच महिला या आजाराच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात ज्यामुळे समस्या अधिकच वाढत जाते. पूजा जैन नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.  (Iron Deficiency In Women Smriti Irani Share Drumstick Soup Recipe For Anemia)

ज्यात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी एक खास सूपबद्दल सांगत आहे. जे महिलांसाठी रामबाण ठरू शकतं. स्मृती इराणी सांगतात की हे सूप प्यायल्यानं एनीमियाची समस्या उद्भवत नाही. शाकाहारी महिलांसाठी मोस्ट आयर्न रिच ऑप्शन आहे. घरच्याघरी तुम्ही हे सूप बनवू शकता. एनीमियाची समस्या टाळण्यासाठी सूपची सोपी रेसिपी पाहूया.

एनिमीया काय आहे?

एनिमीया एक अशी स्थिती आहे ज्यात शरीरात हिमोग्लोबीन किंवा लाल रक्त पेशींची संख्या कमी होते. हिमोग्लोबीन असे प्रोटीन असते जे शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये ऑक्सिजन पोहोचवण्याचे काम करते. शरीराला योग्य प्रमाणात ऑक्सिजन न मिळाल्यास थकवा येणं, कमकुवतपणा, जाणवतो. खासकरून महिलांमध्ये पाळी उशीरा येणं, प्रेग्नंसी, खराब खाण्यापिण्याच्या सवयी अशा समस्या वाढतात.


एनिमियाची लक्षणं

आळस येणं, श्वास घ्यायला त्रास होणं, चेहरा आणि ओठांचा पिवळेपणा, हात-पाय थंड पडणं, केस- नखं गळणं, छातीत वेदना, चक्कर येणं, अभ्यासात लक्ष नसणं.

रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी सूप कसं बनवायचं?

साहित्य

मसूरची डाळ- १ कप

शेवग्याच्या शेंगा- ३

कांदा- १ मोठा

आलं- १ इंच

टोमॅटो- १ मोठा

शेंगदाणे- ३ ते ४

पाणी- ४ कप

साजूक तूप- १ चमचा

मिरपूड- दीड चमचा

मीठ- गरजेनुसार

कृती

सर्व साहित्य प्रेशर कुकरमध्ये घालून,  गरजेनुसार पाणी घालून ३ शिट्ट्या काढून घ्या. कुकर थंड झाल्यानंतर हॅण्ड ब्लेंडरच्या मदतीनं सर्व पदार्थ व्यवस्थित ब्लेंड करा. हे मिश्रण गाळून कंसिस्टंसी एडजस्ट करा नंतर उकळवून घ्या. नंतर काळीमिरी आणि साजूक तूप घालून गरमागरम पदार्थ वाढा.

रोज भरपूर चालूनही सुटलेलं पोट तसंच गोलमटोल? कारण चुकलेली चाल, पाहा ‘चालण्याची’ योग्य पद्धत

हे सूप इतकं खास का आहे?

शेवग्याच्या सूपमध्ये आयर्न, कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते. मसूरच्या डाळीत प्रोटीन, आर्टन असते. कांदा, टोमॅटो यामुळे पदार्थाला चव येते आणि न्युट्रिशनल वॅल्यूसुद्धा वाढते. ज्या महिलांना थकवा, चक्कर येणं, केस गळणं, चेहऱ्यावर पिवळेपणा येणं अशी लक्षणं दिसत असतील तर आयर्नच्या कमतरतेची ही लक्षणं असू शकतात यासाठी एकदा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

Web Title: Iron Deficiency In Women Smriti Irani Share Drumstick Soup Recipe For Anemia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.