Join us

सतत थकवा, झोपून राहावेसे वाटते? महिलांमध्ये वाढतोय गंभीर आजार, ३ लक्षणे दिसल्यास काळजी घ्या..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2025 19:19 IST

Fatigue and weakness in women: Hormonal imbalance symptoms: डॉक्टर सांगतात महिलांमध्ये गंभीर आजार वाढताय, ३ लक्षणे दिसल्यास वेळीच सल्ला घ्या.

सकाळी झोपेतून उठल्यानंतर शरीर आपल्याला काही प्रमाणात संकेत देते.(Women Health Issue) अनेकदा उठल्यानंतरही शरीरात आळस शिरलेला राहतो, काम करावेसे वाटत नाही, सतत थकल्यासारखे वाटते. असं वारंवार का होते आपल्यापैकी अनेकांना माहित नाही.(Women Health Problem) ही समस्या जास्त प्रमाणात महिलांमध्ये पाहायला मिळते. आपल्याला शरीराला व्हिटॅमिन्स, मिनरल्स, लोह यांची सगळ्यात जास्त गरज असते.(Hormonal Imbalance symptoms) महिलांमध्ये सध्या अनेक गंभीर आजारांचा धोका वाढतो आहे. ऑस्टियोपोरोसिस, स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाच्या ग्रीवेचा कर्करोग, मूत्रमार्गाचा संसर्ग आणि ऑटोइम्यून या आजारांची वाढ मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे.(Fatigue and weakness) मासिक पाळी किंवा हार्मोन्स बदलामुळे महिलांना अशक्तपणाचा त्रास जास्त होतो. शरीरात लोहाची कमतरता झाली की थकवा आणि इतर गोष्टींचा सामना करावा लागतो.(warning symptoms of fatigue) डॉक्टर सांगतात लोहाच्या कमतरतेमुळे महिलांमध्ये गंभीर आजार वाढताय त्यासाठी ३ लक्षणे दिसल्यास वेळीच सल्ला घ्या. 

सारखी चक्कर येते, चालताना धाप लागते? असू शकतात 'या ' गंभीर आजाराची लक्षणं, ५ गोष्टी तपासा

डॉक्टर म्हणतात महिलांच्या शरीरात ३ लक्षणे दिसल्यास लोहाची तपासणी केली जाते. फेरिटिन चाचणी करताना लोहाची कमतरता ओळखता येत नाही. कधीकधी लोहाची पातळी योग्य असते, परंतु फेरिटिनची पातळी बिघडते. हे एक प्रथिने आहे जे शरीरात लोह साठवते. शरीरातील लोह कमी झाल्यास लाल रक्तपेशा तयार होत नाही. ज्यामुळे हिमोग्लोबिन देखील कमी होते. 

जर आपल्याला सतत झोपावेसे वाटत असेल किंवा थकल्यासारखे वाटत असेल तर शरीरातील लोहाचे प्रमाण कमी असू शकते. बऱ्याचदा ही लक्षणे आपल्याला ओळखता येत नाही. डॉक्टर म्हणतात शरीरात ऊर्जा कमी निर्माण झाल्यामुळे थकवा येऊ शकतो. कधी कधी हे जास्त ताण किंवा झोपेच्या अभावामुळे देखील होते. 

पोषकतत्वांच्या कमतरतेमुळे बहुतेक लोकांना वारंवार चक्कर येते. उभे राहताना किंवा कोणत्याही शारीरिक हालचाली करताना या गोष्टी होतात. हे कमी हिमोग्लोबिनचे लक्षण असू शकते. ज्यामुळे शरीरात ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते. 

व्हायरल व्हिडिओ पाहून स्वयंपाकघरातील ४ गोष्टी चेहऱ्याला चोपडता? १००% पिंपल्स वाढतील-काळे डाग पडतील

सतत हात-पाय थंड पडणे हे शरीरातील रक्ताभिसरण खराब झाल्यामुळे होऊ शकते. पुरेसे लोह शरीराला न मिळाल्याचे लक्षण आहे. त्यासाठी वेळीच काळजी घ्यायला हवी. ही ३ लक्षणे दिसल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.   

टॅग्स : आरोग्यअ‍ॅनिमियामहिला