Join us   

करा फक्त ५ मिनिटे आणि बीपी कंट्रोलमध्ये ! श्वसनाचे 'हे' व्यायाम सांभाळतील तुमचे आरोग्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2021 7:33 PM

लहान मुलांशी खेळणे, तुमच्या पेट सोबत लांब वॉकला जाणे किंवा गार्डनिंग करणे यामुळे मन निरोगी राहते, हे आपण जाणून होतो. पण जर्नल ऑफ अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार श्वसनाचे काही व्यायाम केले, तर तुमच्या आरोग्यावर अधिक सकारात्मक परिणाम होतो, हे सिद्ध झाले आहे. 

ठळक मुद्दे या व्यायाम प्रकारात एक उपकरण तुमच्या तोंडात दिले जाते आणि नाकपुड्या बंद केल्या जातात. या उपकरणाला असलेल्या अगदी लहानश्या जागेतून तुम्हाला तोंडाद्वारे श्वास घ्यायचा असतो.

या संशोधनानुसार श्वसनाच्या काही व्यायामांद्वारे आपल्या हृदयाच्या स्नायूंची जी विशिष्ट हालचाल होते ती रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करते. रक्तदाब नियंत्रणासाठी एरोबिक व्यायाम किंवा ध्यानधारणेपेक्षाही हे व्यायाम उपयुक्त असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. हाय रेझिस्टन्स इन्स्पिरेटरी मसल्स स्ट्रेन्थ ट्रेनिंग म्हणजेच IMST असे या व्यायाम प्रकाराचे नाव आहे. 

 

हृदय व रक्तवाहिन्यांसंदर्भातील आजारांसाठी अनेक व्यायाम आहेत. पण ते एकतर खूप महागडे असतात किंवा खूप जास्त वेळ घेणारे असतात. त्यामुळे अनेकदा माहिती असूनही आपण ते व्यायाम करत नाही.  यासंदर्भात संशोधकांनी ३६ लोकांचे संशोधन केले. हे सर्व लोक ५० ते ७९ या वयोगटातील होते. या ३६ लोकांचे  दोन गटात विभाजन केले. यापैकी एका गटाला सहा आठवडे दररोज केवळ ५ मिनिटांसाठी IMST म्हणजेच हाय रेझिस्टन्स इन्स्पिरेटरी मसल्स स्ट्रेन्थ ट्रेनिंग देण्यात आली तर अन्य गटाला दुसरे व्यायाम देण्यात आले. 

यापैकी पहिल्या गटातील लोकांच्या सिस्टॉलिक ब्लड प्रेशरमध्ये कमालीचा फरक  जाणवला. साधारणपणे  आठवड्यातून पाच दिवस दररोज ३० मिनिट चालल्यावर किंवा दररोज बीपीच्या गोळ्या घेतल्यावर  जेवढा  फरक पडला असता, तेवढा फरक  पहिल्या गटातील लोकांच्या सिस्टॉलिक ब्लड प्रेशरमध्ये दिसून आला. एवढेच नव्हे तर रक्तवाहिन्यांच्या विस्तार होण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या नायट्रीक ऑक्साईडचे योग्य प्रमाणही या लोकांमध्ये आढळून आले. 

या व्यायाम प्रकारात एक उपकरण तुमच्या तोंडात दिले जाते आणि नाकपुड्या बंद केल्या जातात. या उपकरणाला असलेल्या अगदी लहानश्या जागेतून तुम्हाला तोंडाद्वारे श्वास घ्यायचा असतो. हा अगदी कमी मिळालेला श्वास हृदयाची कार्यशक्ती वाढविण्यासाठी मदत करताे.  हे मशिन न वापरताही तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हा व्यायाम करता येतो, असेही काही अभ्यासकांचे मत आहे. 

टॅग्स : आरोग्यहृदयरोगहेल्थ टिप्स