Join us
Daily Top 2Weekly Top 5

जास्वंदाच्या रोपावर पांढरट बुरशी आली? तातडीने 'हा' उपाय करा- रोपांवरची कीड लगेच निघून जाईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2026 17:41 IST

Gardening Tips: जास्वंदाच्या रोपावर पांढरा बुरशीसारखा पदार्थ दिसत असेल तर पुढे सांगितलेला एक उपाय लगेचच करून पाहा..

ठळक मुद्दे हे काही उपाय तुम्ही एक- दोन आठवडे नियमितपणे केले तर नक्कीच जास्वंदाच्या रोपावरचा रोग निघून जाईल. 

रोपांची पुरेशी काळजी घेतली तरी कधी कधी त्यांच्यावर एखादा रोग पडतोच. आता बऱ्याचदा जास्वंदासारख्या फुलझाडांच्या बाबतीत असं दिसून येतं की त्याच्या फांद्यांवर, फुलाच्या खालच्या भागात पांढरा बुरशीसारखा पदार्थ दिसतो. हा पदार्थ म्हणजे एक प्रकारची किड असते. त्यावर जर तुम्ही वेळीच उपाय केला नाही तर ती किड सगळं रोप खराब करून टाकते. यामुळे रोपांची पानं गळून जातात. या किडीमुळे मग रोपाला फुलंही येत नाहीत. शिवाय हा रोग वेळीच कंट्रोल केला नाही तर तो आजुबाजुच्या रोपांवरही पडू शकतो. म्हणूनच अशा पद्धतीची पांढरी बुरशी किंवा मावा तुमच्या घरातल्या एखाद्या रोपावर दिसला तर लगेच पुढे सांगितलेले काही उपाय करून पाहा..

 

जास्वंदाच्या रोपावर पांढरा रोग पडल्यास काय करावे?

१. जर रोपाच्या काही भागातच पांढरा बुरशीसारखा पदार्थ दिसत असेल आणि तो खूप कमी प्रमाणात असेल तर सगळ्यात आधी जिथे रोग दिसतो आहे तो रोपाचा भाग कापून टाका. त्यानंतरही बुरशी अन्य ठिकाणी दिसू लागली किंवा खूपच वाढली तर पुढे सांगितलेला एक उपाय करा.

मीरा कपूरने चेहऱ्यावर टोचून घेतल्या कित्येक सुया! सौंदर्य वाढविण्याचा हा कोणता नवा प्रकार?

२. यानंतर आता तुम्हाला तुमच्या घरातला कोणताही डिओ वापरायचा आहे. जिथे पांढरा बुरशीसारखा पदार्थ दिसेल तिथे डिओ शिंपडा. डिओ रोपावर शिंपडताच तुम्हाला पांढरी बुरशी गळून गेल्यासारखी आणि तिचा रंग उडाल्यासारखी दिसेल. यानंतर त्याठिकाणी भरपूर पाणी घाला. जेणेकरून ती सगळी बुरशी निघून जाईल.

३. आता घरच्याघरी तयार केलेले एक किटकनाशक रोपांवर शिंपडा. त्यासाठी थोड्या पाण्यामध्येआणि लिक्विड डिशवॉश एकत्र करा. यानंतर हा स्प्रे संपूर्ण रोपावर शिंपडा. आठवड्यातून दोन वेळा ही क्रिया करा.

व्यायामाचा कंटाळा येतो? स्वयंपाक घरातलं काम 'या' पद्धतीने करा, जीमला न जाताच उतरेल वजन

तसेच मुंग्यांसाठी असणारा खडूही कुंडीतल्या मातीच्या वरच्या भागात थोडासा घाला. हे काही उपाय तुम्ही एक- दोन आठवडे नियमितपणे केले तर नक्कीच जास्वंदाच्या रोपावरचा रोग निघून जाईल. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : White fungus on hibiscus? Quick remedies to eliminate plant pests.

Web Summary : White fungus on hibiscus indicates pests. Cut affected parts. Apply deodorant, then water. Spray dish soap solution weekly. Use ant chalk. Repeat for complete removal.
टॅग्स :बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्सपाणीफुलं