Join us

भर पावसाळ्यात कुंडीतल्या रोपांची पानं पिवळी होऊन सुकू लागली? १ सोपा उपाय-रोपं हिरवीगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2025 20:06 IST

Gardening Tips About Yellow Leaves Of Plants: रोपांची पानं पिवळी पडून सुकायला लागली असतील तर घरच्याघरी हा एक सोपा उपाय करून पाहा..(why leaves of the plants turn yellow?)

ठळक मुद्देरोपांची पानं पिवळी पडू नयेत म्हणून काय घरगुती उपाय करता येईल ?

आपण आपल्या बाल्कनीतल्या, बागेतल्या रोपांची भरपूर काळजी घेतो. त्यांना पुरेसं ऊन, सुर्यप्रकाश मिळतो आहे की नाही, याकडेही लक्ष देतो. तसेच काही लोक तर रोपांना नियमितपणे खत देण्याच्या बाबतीतही अगदी शिस्तशीर असतात. पण तरीही कधी कधी रोपांच्या काही तक्रारी सुरूच असतात. यापैकी एक मुख्य तक्रार म्हणजे रोपांची पानं पिवळी पडायला लागतात. रोपांची पानं पिवळी पडायला लागली की हळूहळू ती सुकून जातात आणि आपोआप गळून पडतात. त्यामुळे मग रोपांचा टवटवीतपणा कमी होऊन ती सुकल्यासारखी दिसू लागतात (Gardening Tips About Yellow Leaves Of Plants). अशावेळी रोपांची पानं पिवळी पडू नयेत म्हणून काय घरगुती उपाय करता येईल ते पाहूया..(why leaves of the plants turn yellow?)

 

रोपांची पानं पिवळी पडत असतील तर काय उपाय करावा?

आपण एक अतिशय सोपा आणि घरगुती उपाय पाहणार आहोत. हा उपाय करण्यासाठी साधारण १ ग्लास गरम  पाणी घ्या. त्या पाण्यामध्ये १ चमचा तंबाखू आणि १ चमचा ग्रीन टी ८ ते १० तासांसाठी भिजत घाला.

ऑपरेशन सिंदूरनंतर वाढली महेश्वरी सिंदूरी साडीची मागणी! बघा नेमकी कशी असते ही साडी...

यानंतर हे पाणी थोडं पिवळसर रंगाचं होईल. ते पाणी गाळून घ्या आणि त्यामध्ये त्याच्या साधारण अर्धे म्हणजेच अर्धा ग्लास व्हाईट व्हिनेगर घाला. हे दोन्ही व्यवस्थित एकत्र करून एका स्प्रे बॉटलमध्ये भरून घ्या.

 

आता हे पाणी संपूर्ण रोपावर शिंपडा. अगदी प्रत्येक पानावर ते पाणी शिंपडलं गेलं पाहिजे. यामुळे पानांवर जर काही इन्फेक्शन असेल आणि त्यामुळे ते पिवळे पडत असतील तर तो रोग किंवा इन्फेक्शन निघून जाण्यास मदत होईल.

केस हेल्दी असतील तरच ते भराभर वाढतील! त्यासाठी गरजेच्या आहेत फक्त 'या' ४ गोष्टी..

यानंतर तयार केलेलं मिश्रण आणि साधं पाणी हे दोन्ही १: २ या प्रमाणात एकत्र करा आणि ते पाणी कुंडीतल्या मातीमध्ये टाका. यामुळे मातीची गुणवत्ता सुधारण्यासही मदत होईल. हा उपाय आठवड्यातून एकदाच करा. कुंडीतल्या रोपाची पानं पुन्हा हिरवीगार होऊन रोप टवटवीत होईल. 

 

टॅग्स :बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्सपाणीखतेहोम रेमेडी