ज्यांना गार्डनिंगची आवड असते किंवा ज्यांनी आपल्या घराच्या आसपास, बाल्कनीमध्ये थोडी रोपं लावलेली असतात, त्यांना असा अनुभव नेहमीच येतो की पुरेशी काळजी घेऊनही रोपाची चांगली वाढ झालेली दिसत नाही. एवढंच नाही तर काही दिवसांत रोप सुकायलाही लागतं. सुरुवातीला त्याची पानं पिवळी पडतात आणि नंतर ती गळायलाही लागतात. पुरेसं ऊन, पाणी देऊनही रोपाची अशी अवस्था होत असेल तर शेवटी आपण कंटाळून जातो आणि त्याकडे दुर्लक्ष करतो. पण असं करू नका. कारण पुढे सांगितलेला एक घरगुती उपाय जर तुम्ही केला तर अगदी काही दिवसांतच तुमचं सुकत चाललेलं रोप हिरवंगार होऊन फुलू शकतं. त्यासाठी नेमकं काय करायचं ते पाहूया..(what to do if leaves of plants getting dried?)
रोपांची पानं पिवळी पडून ते सुकत चाललं असेल तर काय करावं?
१. रोपांची पानं पिवळी पडत असतील तर त्यामागचं एक कारण असंही असू शकतं की रोपांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नाहीये. जर रोपांना गरजेपेक्षा जास्त पाणी होत असेल तर रोपांची पानं चमकदार पिवळ्या रंगाची दिसू लागतात.
साडी नेसल्यावर जाडजूड काकूबाई दिसता? साडीत स्लिम दिसण्यासाठी ३ टिप्स, दिसाल सुडौल-सुंदर
आणि जर त्याला पाणी कमी पडत असेल तर पानं वाळलेली आणि थोडीशी चाॅकलेटी रंगाची दिसायला लागतात. त्यामुळे एकदा रोपाला पाणी घालायचं प्रमाण बदलून पाहा आणि त्यासोबतच पुढे सांगितलेला एक उपायही करा.
२. हा उपाय करण्यासाठी १ ग्लास पाणी घ्या. त्या पाण्यामध्ये १ चमचा तांदूळ १० ते १२ तास भिजत घाला. यानंतर त्या पाण्यात अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि १ चमचा व्हिनेगर घाला.
३ मिनिटांत ३ व्यायाम, रात्री झोपण्यापूर्वी करा एवढंच काम-वजन आणि शुगर कणभरही वाढणार नाही
सगळं पाणी व्यवस्थित हलवून घ्या आणि ते २- ३ दिवसांतून एकदा रोपांवर शिंपडा. या तिन्ही पदार्थांमध्ये असणारे काही घटक रोपांची वाढ चांगली होण्यासाठी मदत करतात. अगदी पहिल्याच प्रयोगात तुम्हाला रोपामध्ये खूप छान बदल झालेला दिसेल.
