Lokmat Sakhi >Gardening > गणपती बाप्पाला दुर्वा वाहताय की नुसतेच गवत? अस्सल दुर्वा ओळखण्याची भन्नाट ट्रिक - पूजा होईल मंगलमय...

गणपती बाप्पाला दुर्वा वाहताय की नुसतेच गवत? अस्सल दुर्वा ओळखण्याची भन्नाट ट्रिक - पूजा होईल मंगलमय...

What is the difference between Durva and Grass : durva vs grass identification : how to identify real durva plant : durva plant gardening at home : आपण बाजारातून दुर्वा विकत घेतो, परंतु दुर्वा अस्सल आणि चांगल्या आहेत हे ओळ्खण्यासाठी टिप्स..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2025 09:35 IST2025-08-29T09:30:00+5:302025-08-29T09:35:02+5:30

What is the difference between Durva and Grass : durva vs grass identification : how to identify real durva plant : durva plant gardening at home : आपण बाजारातून दुर्वा विकत घेतो, परंतु दुर्वा अस्सल आणि चांगल्या आहेत हे ओळ्खण्यासाठी टिप्स..

What is the difference between Durva and Grass durva vs grass identification how to identify real durva plant durva plant gardening at home | गणपती बाप्पाला दुर्वा वाहताय की नुसतेच गवत? अस्सल दुर्वा ओळखण्याची भन्नाट ट्रिक - पूजा होईल मंगलमय...

गणपती बाप्पाला दुर्वा वाहताय की नुसतेच गवत? अस्सल दुर्वा ओळखण्याची भन्नाट ट्रिक - पूजा होईल मंगलमय...

सगळ्यांच्याच घरी आत्तापर्यंत गणपती बाप्पांचे आगमन झाले असेल. गणपती बाप्पा पुढील दहा दिवस आपल्याच घरात असल्याने, आपण त्याचे खूप लाड करतोच. गणपती (durva vs grass identification) बाप्पाच्या आवडत्या काही खास गोष्टी आहेत, यात जास्वंदीचे फुल, मोदक, दुर्वा या तीन गोष्टींचा प्रामुख्याने समावेश होतो. गणपती बाप्पांच्या पूजेत दुर्वा असायलाच हव्यात, पूजेत दुर्वांचा मान पहिला असतो. गणपती बाप्पाला दूर्वा अर्पण करणे खूप शुभ मानले जाते आणि हे खरे आहे की दूर्वाशिवाय त्यांची पूजा अपूर्ण मानली जाते(What is the difference between Durva and Grass).

गणपती बाप्पांसाठी आपण अनेकदा बाजारांतून दुर्वा विकत आणतो, परंतु खरंतरं, दुर्वा या जरा हिरव्यागार गवताप्रमाणेच दिसतात. गवताप्रमाणेच दिसणाऱ्या दूर्वांमुळे अनेकदा त्या विकत घेताना आपली गल्लत होते. एवढंच नाही तर सणासुदीच्या काळात सर्रास हिरव्यागार पातीचे  गवत दुर्वा म्हणून विकले जाते. यासाठीच दूर्वा आणि सामान्य गवतातील (how to identify real durva plant) फरक ओळखणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून आपण दुर्वा (durva plant gardening at home) घेताना कोणतीही चूक करणार नाही. या दोन्हीमध्ये काही खास फरक आहेत, जे समजून घेतल्यास तुम्ही योग्य निवड करू शकता.    

अस्सल दुर्वा ओळखण्यासाठी खास टिप्स... 

१. दुर्वांची पाने टोकदार असतात आणि ती तीन पानांच्या समूहात वाढतात. तिच्या फांद्या थोड्या कडक आणि हिरव्या असतात. विशेष म्हणजे ती जमिनीवर पसरून वाढते, पण तिची मुळे खोलवर जात नाहीत. याउलट, गवताची पाने दूर्वांपेक्षा वेगळी असतात. त्यांचा आकार आणि पोत एकसारखा नसतो. ती सहसा विखुरलेली आणि मऊ असतात.

२. खरी दूर्वा ही साधारणपणे लहान आणि पातळ असते. तिच्या पानांची टोके टोकदार नसून थोडीशी गोलसर असतात. प्रत्येक दूर्वाच्या काडीवर तीन पानांचा गुच्छ असतो, ज्याला 'दूर्वा' म्हणतात. त्यामुळे, दूर्वा घेताना तीन पानांचे गुच्छ आहेत की नाही हे नक्की पहा.

हार- फुले फ्रिजशिवायही राहतील ताजी! ८ सोप्या ट्रिक्स - फुले न कोमेजता राहतील टवटवीत...

३. ताजी आणि खरी दूर्वा ही चमकदार हिरव्या रंगाची असते. जर दूर्वा सुकलेली, पिवळट किंवा काळसर दिसत असेल तर ती शिळी किंवा खराब असण्याची शक्यता असते. शक्यतो, ताजी दूर्वाच घ्यावी.

४. दूर्वाला एक नैसर्गिक, मातीचा आणि थोडासा गोडसर सुगंध असतो. जर तिला कोणताही विशिष्ट वास येत नसेल किंवा रासायनिक वास येत असेल तर ती कृत्रिम असण्याची शक्यता आहे.

इडली पात्रात करा मऊसूत इन्स्टंट रवा मोदक! बाप्पाचा प्रसाद आणि नैवेद्य होईल खास - पाहा इन्स्टंट रेसिपी... 

५.  खरी दूर्वा ही थोडीशी मऊ आणि लवचिक असते. जर ती खूप कडक किंवा प्लास्टिकसारखी वाटत असेल तर ती कृत्रिम असू शकते.

६. दूर्वा तुम्ही कुंडीत देखील लावू शकता, यासाठी तुम्हाला रुंद कुंडीची गरज लागेल. दुर्वा कोणत्याही प्रकारच्या मातीत वाढू शकते. दूर्वा गवताला कटिंगने  लावणे सोपे आहे. कोणत्याही मैदानातून दुर्वा कटिंग आणा आणि कुंडीत माती टाकल्यानंतर ती कटिंग लावा आणि पाणी घाला.

प्लास्टिकच्या बादल्या-मग- आंघोळीचे पाट तुटले? १ इन्स्टंट ट्रिक - तुटलेले प्लास्टिकही चिकटेल मस्त...

७. दुर्वा लावलेली कुंडी तुम्ही पूर्ण सूर्यप्रकाश असलेल्या ठिकाणी ठेवू शकता. तुम्हाला रोज पाणीही घालावे लागेल, जेणेकरून बियांमधून लावलेली दूर्वा अंकुरल्यानंतर सुकणार नाही. आणखी एक गोष्ट म्हणजे, दुर्वांची बियाणे ऑनलाइन सहज मिळतात. त्यामुळे, तुम्ही दूर्वा आणि गवतातील फरक ओळखण्यासोबतच ती घरी देखील छोट्याशा कुंडीत लावू शकता.


Web Title: What is the difference between Durva and Grass durva vs grass identification how to identify real durva plant durva plant gardening at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.