Join us

बघा कशी बहरलीये प्रिती झिंटाची 'घर की खेती'! बागेत पिकलेल्या संत्रीविषयी म्हणाली.... 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2022 15:36 IST

Preity Zinta's ghar ki kheti: बॉलीवूडपासून दूर असलेली प्रिती झिंटा सध्या तिच्या दोन बाळांमध्ये आणि घरातल्या बागबगिच्यामध्ये चांगलीच रमली आहे.. त्याचाच हा एक व्हिडिओ

ठळक मुद्देयाच झाडाचे मागच्या वर्षीचे फोटोही तिने शेअर केले होते. त्यावेळी ते झाडंही खूप छोटं होतं आणि त्याला तेव्हा मोजकीच फळं आली होती..

बॉलीवूड अभिनेत्री प्रिती झिंटाच्या (Preity Zinta) गालावर पडणाऱ्या खळीचे आणि तिच्या मोहक हास्याचे अनेक दिवाने आहेत. ती गोड हसली की तिच्या गालावर खळी चमकून जातेच.. सध्या मोठ्या पडद्यापासून ती दूर असल्याने तिचे चाहते तिला खूप मिस करत आहेत. पण तरीही सोशल मिडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या कनेक्टमध्ये राहण्याचा तिचा प्रयत्नही अनेकांना आवडतो आहे. ती नेहमीच तिच्या वेगवेगळ्या पोस्ट सोशल मिडियावर शेअर करत असते. आता सध्या तिची गार्डनिंग (gardening tips by Preity Zinta) विषयीची पोस्ट चांगलीच  गाजते आहे (Preity Zinta's "ghar ki kheti"). 

 

प्रितीने तिच्या अमेरिकेतील घराच्या अंगणात छान बाग फुलवली आहे. त्याविषयीचे काही व्हिडिओ ती नेहमीच सोशल मिडियावर शेअर करत असते आणि वेगवेगळ्या झाडांची माहिती देत असते.

केसांसाठी नॅचरल टॉनिक!! फक्त २ गोष्टी वापरा, केसगळती आणि कोंडा दोन्हीवर उत्तम उपाय 

आता नुकतीच तिने जी पोस्ट शेअर केली आहे त्यात तिने तिच्या अंगणातलं संत्र्याचं झाड दाखवलं आहे. या झाडाला आलेली भरपूर फळं पाहून प्रिती चांगलीच खुश झाली आहे. याच झाडाचे मागच्या वर्षीचे फोटोही तिने शेअर केले होते. त्यावेळी ते झाडंही खूप छोटं होतं आणि त्याला तेव्हा मोजकीच फळं आली होती, असं तिने सांगितलं.

 

पण आता मात्र झाडाची चांगलीच वाढ झाली असून यावेळी त्याला संत्रीही भरपूर लागली आहेत. शिवाय फळाचा आकारही अतिशय मोठा असून फळ चांगलंच रसरशीत आहे, असंही तिने मोठ्या आनंदात सांगितलं आहे.

आजीबाईंनी हौशीने करून घेतला सुंदर मेकअप! बघा आजींच्या मेकअपचा व्हायरल व्हिडिओ 

पुर्णपणे ऑर्गेनिक पद्धतीने तिने या झाडाची काळजी घेतली असून त्याचीच छान- छान फळं आता तिला चाखायला मिळत आहे. कोरोना काळात जेव्हा आपण आपल्या घरात बंदिस्त झालेलो होतो, तेव्हा मन रमविण्यासाठी तिने गार्डनिंगचा आधार घेतला आणि आता मात्र तिला त्याची चांगलीच आवड लागली, असंही तिने तिच्या एका व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. 

 

टॅग्स :बागकाम टिप्ससोशल व्हायरलप्रीती झिंटा