lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Gardening > बाटल्यांमध्ये झाडं लावण्याची 'ही' बघा एकदम वेगळी पद्धत- हिरव्यागार चेंडूंनी फुलून जाईल बाग 

बाटल्यांमध्ये झाडं लावण्याची 'ही' बघा एकदम वेगळी पद्धत- हिरव्यागार चेंडूंनी फुलून जाईल बाग 

How To Decorate Garden Using Plastic Bottles: बाटल्यांमध्ये झाडं लावण्याची ही पद्धत खूपच वेगळी आणि युनिक आहे.... एकदा बघाच नेमक्या कशा पद्धतीने बाटल्यांमध्ये झाडं लावली आहेत ते....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2024 11:17 AM2024-01-06T11:17:18+5:302024-01-06T11:18:00+5:30

How To Decorate Garden Using Plastic Bottles: बाटल्यांमध्ये झाडं लावण्याची ही पद्धत खूपच वेगळी आणि युनिक आहे.... एकदा बघाच नेमक्या कशा पद्धतीने बाटल्यांमध्ये झाडं लावली आहेत ते....

Very unique way for planting in bottles, Use of empty water bottles for plantation, how to decorate garden using plastic bottles | बाटल्यांमध्ये झाडं लावण्याची 'ही' बघा एकदम वेगळी पद्धत- हिरव्यागार चेंडूंनी फुलून जाईल बाग 

बाटल्यांमध्ये झाडं लावण्याची 'ही' बघा एकदम वेगळी पद्धत- हिरव्यागार चेंडूंनी फुलून जाईल बाग 

Highlightsयात तुम्ही एकाच पद्धतीची रोपं लावू शकता किंवा मग वंडर ज्यू, मनीप्लांट असे वेगवेगळ्या रंगाचे रोप लावून तिला रंगबेरंगी करू शकता. 

पाण्याच्या प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्यांचा छोटी छोटी झाडं लावण्यासाठी कसा वापर करायचा, ते आपल्याला माहिती आहेच. अनेकजणी त्या बाटल्यांना छान रंग देतात, त्याला आकर्षक दोऱ्या बांधून सजवतात आणि त्यात छानसे रोप लावतात. पण ही पद्धत आता खूपच कॉमन झाली आहे. आता तुमची बाग सजविण्यासाठी बाटल्यांचा हा खूप वेगळा प्रयोग करून पाहा (Use of empty water bottles for plantation). या पद्धतीने जर तुम्ही बाटल्यांमध्ये छोटी छोटी रोपं लावली तर तुमच्या बागेत छान हिरवेगार झाडांचे बॉल तयार होतील आणि बघणारे सगळेच तुम्हाला या ट्रिकविषयी विचारतील... (how to decorate garden using plastic bottles) बाटल्यांचा उपयोग करून एकदम हटके स्टाईलने बाग कशी सजवायची ते पाहा. (Very unique way for planting in bottles)

 

झाडं लावण्यासाठी बाटल्यांचा उपयोग

बाटल्यांचा उपयोग झाडं लावण्यासाठी कशा पद्धतीने करायचा, याचा एक छानसा व्हिडिओ pro_planting या पेजवर शेअर करण्यात आला आहे. यासाठी तुम्हाला एक प्लास्टिकची बाटली लागणार आहे.

केस गळणं कमी करणारा सोपा उपाय, केस होतील घनदाट- वाढतील भराभर, करून पाहा

सगळ्यात आधी तर या बाटलीला थोड्या थोड्या अंतराने लहान लहान छिद्र पाडून घ्या.

आता त्या बाटलीमध्ये माती, खत टाकून घ्या. यानंतर आता तुम्हाला त्या बाटलीमध्ये रोपं लावायची आहेत.

यासाठी तुम्ही मनी प्लांट, वंडर ज्यू प्लान्ट, स्पायडर प्लान्ट, चिनी गुलाब, ऑफिस टाईम अशी रोपं घेऊ शकता.

 

आता या रोपंची एकेक काडी बाटलीमध्ये केलेल्या छिद्रामध्ये टाका. अशा पद्धतीने सगळ्या छिद्रांमध्येच रोप लावा. बाटलीचे तोंड जिथे असते, तिथून पाणी घाला. म्हणजे मग ते पाणी हळूहळू सगळ्याच रोपट्यांना मिळेल.

उपमा करताना त्यात रव्याच्या गाठी- गुठळ्या होतात? ४ टिप्स लक्षात ठेवा- परफेक्ट जमेल उपमा

आता हळूहळू जशी या रोपांची वाढ होईल, तशी तशी तुमची सगळी बाटली वेगवेगळ्या रोपट्यांनी बहरून जाईल आणि तिला छान चेंडूचा आकार येईल. 

यात तुम्ही एकाच पद्धतीची रोपं लावू शकता किंवा मग वंडर ज्यू, मनीप्लांट असे वेगवेगळ्या रंगाचे रोप लावून तिला रंगबेरंगी करू शकता. 

 

Web Title: Very unique way for planting in bottles, Use of empty water bottles for plantation, how to decorate garden using plastic bottles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.